mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार ८ जून २०२६

पावसाबरोबर हत्तीची दहशतही सूरु…
पिकांचे मोठे नुकसान


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पावसाच्या आगमनाबरोबरच आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील धनगरमोळा घाटकरवाडी परिसरात हत्तीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. हत्तीने ऊस पिकासह मका, मेस काट्या व इतर झाडांचे मोठे नुकसान सत्र सुरू केले आहे.

दररोज सायंकाळच्या वेळी हत्ती खुलेआम फिरताना दिसत आहे. सध्या शेतीची कामे सुरू झाल्याने शेतामध्ये जाताना शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणी येत आहेत.

डोंगरवाडी नावाचे शेतामध्ये संभाजी शंकर पाटील यांच्या मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

वनविभाग हत्तीचा बंदोबस्त करणार तरी कधी ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आजरा परिसरात पुन्हा जोरदार पाऊस

हालेवाडीत घरांचे छप्पर उडाले 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान मौजे हालेवाडी ता.आजरा येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह व पाऊस पडून हरी भाऊ पाटील यांचे कौले व पत्रे फुटून अंदाजे १४०००/- रुपयांचे,शिवाजी भिवा कटाळे २०००/- रुपयांचे,शंकर दादू पाटील यांचे ४०००/- रुपयांचे व सखाराम संभाजी येसादे यांचे ४०००/- रुपयांचे नुकसान झाले आहे.

महसूल विभागाकडून झाल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे छप्पर उडून गेले आहे.

उत्तूर भागात पावसाची दमदार हजेरी ; बळीराजा सुखावला

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर परिसरात अखेर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यातून दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र पाऊस केवळ हुलकावणी देत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. अखेर शनिवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली.  पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग केली. तर लहान मुले आणि युवकांनी पावसाचा आनंद घेतला.

या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या कामांना आता गती मिळणार असून नांगरणी, मशागत तसेच पेरणीपूर्व तयारीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाळा सुरू झाला… रस्त्यांची बोंबही सुरु

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नव्याने सुरू होत असलेला महागाव – हात्तिवडे- चंदगड रस्ता म्हणजे वाहन चालकांच्या दृष्टीने ठरत आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे लांबलेले व अपूर्ण काम अपघातास आमंत्रण देणारे ठरू लागले आहे.

सध्या पावसाला सुरुवात झाली असल्याने व खुदाईमुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य दिसत आहे. यातून वाहने चालवताना दुचाकी स्वारांसह चारचाकीस्वारांची मोठी कुचंबणा होत आहे.

एखादा मोठा अपघात झाल्यावरच संबंधित ठेकेदारासह या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्यांचे डोळे उघडणार का ? असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे. वारंवार येथे अपघात होऊ लागले आहेत.

तुषार पाटील यांचे निधन

राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट-५, दौंडचे समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते.

तुषार पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक म्हणून काम पाहिले होते. तसेच त्यांनी पीसीआरचे अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

भैरू कुकडे यांचे निधन 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 
पेरणोली येथील भैरू तुकाराम कुकडे ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक रमेश कुकडे व भाऊ कुकडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या मंगळवारी सकाळी आहे.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाकडून वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.

मोरजकर महाराज समाधी स्थळ, घाट तसेच लिंगायत समाज स्मशान भूमी येथे, वड, पिंपळ, जांभूळ, बेल, मोह गनी, कारंजी इत्यादी वृक्षांच रोपण केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे,उपजिल्हाध्यक्ष सी. आर. देसाई, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, उपाध्यक्ष शंकरराव शिंदे, सरचिटणीस प्रकाश देसाई, खजिनदार सूर्यकांत आजगेकर , शेती विकास उपाध्यक्ष सी. डी.सरदेसाई, उद्योजक महादेव पोवार, आजी माजी सैनिक वेलफेअर अध्यक्ष दत्तात्रय मोहिते , बँकिंग विभाग प्रमुख शिवाजी इंजल, सुपल , माजी सरपंच शिवाजीराव गुडुळकर ,सहकार विभाग भाऊ निर्मळे, आनंदराव गावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

चितळे येथे आगीत गवत गंजींचे नुकसान


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चितळे (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत शेतकरी युवराज मारुती घुरे यांच्या गवत गंजीचे नुकसान झाले आहे. सुमार तीन हजार गवत जळाले आहे. अंदाजे बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बरोबर कृषी साहित्याचेही नुकसान झाले आहे.

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगीतले जात आहे. काल दु‌पारी साडेतीनच्या सुमाराला आग लागली. आग पसरत गेली. यामध्ये गवत गंजी व शेतीचे साहित्य जळाले. ग्रामस्थांनी टँकरने पाणी मागवून घेतले व आग विझवली. 

आजचे पंचांग 

दिनांक : ८ जून २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी (९ जून पहाटे ०३.२३ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (सकाळी ०९.०९ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (सकाळी ०९.२७ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : बलवा करण (दुपारी ०३.२९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कुंभ राशी (९ जून पहाटे ०३.३६ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४० ते सकाळी ०९.२० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी 1१२.११ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत:: २०८३ विक्रम संवत
शक संवत : १९४९ शक संवत

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा छडा लागणार कधी….? ऐन निवडणूक तोंडावर सदर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!