



तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर…? लवकरच करणार प्रवेश

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा नगरपंचायतीचे तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार गट) वाटेवर असून लवकरच ते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
समोर असणारी नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक, तालुका संघ, आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला प्रतिसाद व कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे हे तीनही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.याबाबत संबंधित नगरसेवक व त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील स्थानिक नेते मंडळी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत .
यापैकी एका महिला नगरसेविकेला तालुका महिला आघाडीत महत्त्वाचे पद निश्चित झाल्याचे समजते.
येत्या सहा महिन्यात नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर मोठ्याच राजकीय घडामोडी होणार असल्याचे हे संकेत आहेत.



मलिग्रे येथील चाळोबा डोंगरावर, महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन

आजरा: प्रतिनिधी
मलिग्रे ता.आजरा येथील श्री चाळोबा देवाची डोंगरावरील यात्रा शनिवार दिनांक ९ मार्च रोजी होत आहे. या यात्रेनिमित्ताने मलिग्रे ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. याचा लाभ गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व मलिग्रे ग्रामपंचायत च्या माध्यमातून केले आहे.
मलिग्रे गावच्या पश्चिमेला डोंगरावर महादेवाचे व चाळोबाचे जागृत देवस्थान आहे. या देवाची यात्रा पिढ्यान् पिढ्या दरवर्षी महाशिवरात्रच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या ऊत्साह संपन्न होत असते. शुक्रवार महाशिवरात्र दिवसी यात्रेच्या निमित्ताने रात्री जागर/ संगीत भजनाचा कार्यक्रम होईल शनिवार डोंगरावर विधीवत पुजा झाल्यावर भाविकांना देवदर्शन खुले होईल, दुपारी साडेबारा वाजता प्रभात फेरी नंतर मानकरी व हक्कीमदारांकडून गा-हाणे होवून मानाचा बार काढला जाईल व महाप्रसादाचे वाटप सुरू होईल, यासाठी गावातील सर्व भाविक, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक याना मलिग्रे ग्रामपंचायत देवस्थान कमिटी यांनी या वर्षी होणाऱ्या यात्रेत महाप्रसादाचा लाभ घ्यावा व यात्रा शांततेने पार पाडावी असें आवाहन केले आहे.




