mrityunjaymahanews
अन्य

आजरा शहराला वादळी पावसाने झोडपले

वादळी पावसाने आजरा शहरासह परिसराला झोडपले

 

दिवसभराच्या उकाड्यानंतर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आजरा शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरवासियांची चांगलीच धांदल उडाली.

आज दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास किरकोळ पावसाने हजेरी लावली. रात्री साडेआठ वाजता मात्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस सुरू होता. बळीराजाही पावसाच्या प्रतीक्षेत होता.

पावसामुळे आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेस तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुमारे अर्धा तास आजरा बाजारपेठेत वाहतूक खोळंबली होती.

पावसामुळे शहरातील गटर्स स्वच्छतेचा प्रश्न निश्चितच ऐरणीवर आला आहे.

तालुका खरेदी विक्री संघासाठी २४ मतदान केंद्रे

आजरा तालुका खरेदी- विक्री संघाच्या मतदान प्रक्रियेकरीता एकूण २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे एकूण पाच मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर सेवा संस्था व इतर सहकारी संस्था प्रवर्गाचे मतदानही होणार आहे. केंद्र क्रमांक एक ते चार पैकी प्रथम क्रमांकाच्या केंद्रावर सेवा संस्था गटाचे तर दुसऱ्या मतदान केंद्रावर इतर सहकारी संस्था गटाचे मतदान होणार आहे. केंद्र क्रमांक तीन व चार वर प्रत्येकी ५७३ स्थानिक सभासद मतदान करतील तर केंद्र क्रमांक पाचवर साळगाव, सुलगाव, चांदेवाडी व परोली येथील ४८५ मतदारांना मतदान करता येणार आहे.

हात्तीवडे येथे प्राथमिक विद्यामंदिर हे मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर बूरूडे,मुरूडे, भटवाडी, चित्रा नगर बोलकेवाडी, मेंढोली, होनेवाडी, हात्तीवडे येथील एकूण ३९६ मतदारांना मतदान करता येईल.

केंद्र क्रमांक सात व. आठ हे पोळगाव येथील प्राथमिक विद्यामंदिर असून येथे पो, एरंडोळ, कासारकांडगाव, गणेशवाडी, देऊळवाडी येथील ४४५ मतदार मतदान करतील तर पोळगाव येथील केंद्र क्रमांक आठवर जेऊर, भावेवाडी, विटे, खानापूर, आवंडी, सातेवाडी, लाटगाव, रायवाडा, आहेत चितळे येथील ४२५ मतदार मतदान करतील.प्राथमिक विद्यामंदिर केंद्रावर वेळवट्टीसह पारेवाडी, पेठेवाडी व मसोली येथील ४८८ मतदार मतदान करतील.

देवर्डे येथील प्राथमिक विद्यामंदिर केंद्र क्र.१० या मतदान केंद्रावर देवर्डेसह हाळोली,मेढेवाडी, माद्याळ अशा ३९० मतदारांकरिता मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र क्रमांक ११ व १२ हे गवसे येथील प्राथमिक विद्यामंदिर असून येथे गवसे, आल्याची वाडी, शेळप, खेडगे, पारपोली, गावठाण व दर्डेवाडी येथील ४४६ मतदार केंद्र क्र.११ वर मतदान करतील. गवसे येथील केंद्र क्रमांक १२ वर दाभील, सुळेरान, धनगरमोळा, घाटकरवाडी, किटवडे, लिंगवाडी, अंबाडे येथील ४७३ मतदारांकरीता मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पेरणोली प्राथमिक विद्यामंदिरामध्ये दोन केंद्रे ठेवण्यात आली असून केंद्र क्रमांक तेरावर स्थानिक ५४७ सभासदांना मतदान करता येईल तर केंद्र क्रमांक १४ वर हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, वझरे, घागरवाडी, सोहाळे येथील ४५८ मतदार मतदान करतील.

मडिलगे येथेही केंद्र क्रमांक १५ व १६ अशी दोन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र क्रमांक पंधरा वर मडिलगे, खेडे,हाजगोळी खुर्द, हाजगोळी बुद्रुक, मुंगूसवाडी, मासेवाडी व खोराटवाडी येथील ४५७ मतदारांकरिता मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तर केंद्र क्रमांक १६ वर वडकशिवाले, महागोंड, हालेवाडी, भादवणवाडी व भादवण येथील ४६६ सभासद मतदान करतील.

केंद्र क्रमांक १७ प्राथमिक विद्यामंदिर उत्तुर हे असून येथे होन्याळी, करपेवाडी, चिमणे,अर्दाळ, पेंढारवाडी, मुम्मेवाडी, बहिरेवाडी, या गावातील ५७९ मतदारांची मतदान व्यवस्था करण्यात आली आहे तर केंद्र क्रमांक १८ या उत्तूर येथील केंद्रावर उत्तुर, बेलेवाडी, झुल, धामणे, चव्हाणवाडी येथील ५७८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

केंद्र क्रमांक १९ हे कोवाडे असून प्राथमिक विद्यामंदिर कोवाडे येथे कोवाडे व सरोळी येथील ४७५ मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोवाडे येथील केंद्र क्रमांक २० वर पेदरेवाडी, निंगुडगे, कानोली, दाभेवाडी, मलिग्रे येथील ४७२ मतदार मतदान करतील.

सुळे प्राथमिक विद्यामंदिर हे केंद्र क्रमांक २१ असून या केंद्रावर सुळे, गजरगाव, हारूर, सरंबळवाडी व लाकूडवाडी येथील ४६० मतदारांची मतदान व्यवस्था करण्यात आली आहे.

शिरसंगी येथील आदर्श हायस्कूल मध्ये केंद्र क्रमांक २२ व २३ असून केंद्र क्रमांक २२ मध्ये कोळींद्रे, हंदेवाडी, पोश्रातवाडी, यामेकोंड येथील ५११ तर केंद्र क्रमांक २३ वर शिरसंगी व कीणे येथील ४७२ सभासद मतदान करतील केंद्र क्रमांक २४ प्राथमिक विद्यामंदिर वाटंगी या केंद्रावर वाटंगी, चाफवडे, मोरेवाडी उचंगी शृंगारवाडी येथील ४५८ मतदार मतदान करतील.

संचालक पदाच्या एकूण १९ जागांकरिता सदर मतदान होणार असून यामध्ये सेवा संस्था गटातून सात, प्रतिनिधी इतर संस्था गटातून एक प्रतिनिधी, व्यक्ती सभासद गटातून सहा प्रतिनिधी तर राखीव प्रवर्गातून पाच प्रतिनिधींना मतदान करण्याची सुविधा आहे. व्यक्ती सभासदांना एकूण 11 मतांचा अधिकार राहणार आहे. यामध्ये व्यक्ती सभासद गट सहा मते व राखीव प्रवर्गातील पाच मते अशी अकरा मते राहणार आहेत.

संस्था गटाकरिता ९४ इतर संस्था गटाकरता १११ तर व्यक्ती सभासद गटाकरिता १०६२७ सभासद मतदानास पात्र ठरले आहेत.

 


जनता बँकेच्या गडहिंग्लज शाखेचे स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर

आजरा जनता बँकेच्या, गडहिंग्लज शाखेचे स्वमालकीच्या वास्तुत स्थलांतर झाले. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. जयवंतराव शिंपी व बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन श्री.महादेव टोपले, संचालक श्री. रणजित देसाई, श्री. बाबाजी नाईक, श्री. जयवंत कोडक, श्री. शशिकांत नार्वेकर, श्री. अमित सामंत, श्री. शिवाजी पाटील, श्री. विक्रमसिंह देसाई, श्री. महेश कांबळे, श्री. पांडुरंग तोरगले, श्री. संतोष पाटील, सौ. रेखा देसाई, सौ. नंदा केसरकर, बँकेचे सीईओ श्री. एम.बी. पाटील, शाखाधिकारी श्री. एस. एस. चुंगडे व बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

२ जून १९६३ इ रोजी स्थापन झालेल्या व रिझर्व बँकेचा आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन हा क्रायटेरिया बँकेने पूर्ण केलेल्या या बँकेच्या १७ शाखा कार्यरत असून त्यापैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे व मुंबईची उपनगरे आहे. गडहिंग्लज शाखेचा रु. ३२ कोटी ७७ लाखाच्यावर व्यवसाय आहे.

बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये रु. ७ कोटी ७७ लाखाचा नफा झाला असून, बँकेकडे रु. ३१७ कोटीच्या ठेवी व रु. २१० कोटीची कर्जे, तसेच रु. १२८ कोटीची गुंतवणूक केलेली आहे. बँकेने रु. ५२६ कोटीचा व्यवसाय केलेला आहे. बँकेचा नेट एन.पी.ए. ० टक्के आहे.

अद्यावत टेक्नॉलोजीने परिपूर्ण असणाऱ्या बँकेकडे स्वतःचे डी.सी व डी. आर सेंटर असून, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रो ए टी एम. आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी. .इ. सुविधा आहेत. तसेच बँकेने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व आण्णासाहेब आर्थिक विकास मागास व्याज सवलत योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा चालू केलेला असून बँकेने रु. ३० कोटीचे वर कर्ज पुरवठा केलेला आहे.

बँक समाजातील सर्व स्तरामधील तरुण उद्योजकांना शासनाच्या सबसिडीची कर्जे मंजूर करुन त्यांना उभारी देणेचे काम करत आहे. बँकेचा मुंबई येथे शाखा सुरु करणेचा मानस असलेची माहिती बँकेचे चेअरमन व सीईओ यांनी दिली.

सावंत- किल्लेदार विवाह सोहळा उत्साहात

आजरा येथील संजयभाऊ सावंत व नगरसेविका सौ संजीवनी सावंत यांचे सुपुत्र वैभव उर्फ गुरु आणि निगवे खालसा येथील विनायक किल्लेदार यांची कन्या मृणाली यांचा शुभविवाह आजरा येथे उत्साहात पार पडला.

या विवाह सोहळ्यास श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, आमदार प्रकाश आबीटकर,आमदार राजेश पाटील, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले,पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता रेडकर,फत्तेसिंह सावंत, राहुल देसाई,नगरसेवक विलास नाईक,विजयकुमार पाटील,मारुती देशमुख, सौ,शुभदा जोशी, आनंदा कुंभार, जी.एम. पाटील, अनिरुद्ध केसरकर, सौ.सूमैय्या खेडेकर,सौ. सीमा पोवार, मारुती मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, राजेंद्रसिंह सावंत, विजय थोरवत,अशोक जांभळे, राजू पोतनीस,सौ.रेश्मा सोनेखान,अनिकेत कवळेकर,देवदास बोलके,रणजीत देसाई,सौ.भैरवी सावंत,सौ.गीता पोतदार,सौ.नंदा घोरपडे,मलिककुमार बुरुड,निसार दरवाजकर, दयानंद भुसारी,अभिषेक शिंपी,आश्विन डोंगरे,संभाजी इंजल,सौ.यासिरबी लमतूरे,अरुण देसाई,प्रभाकर कोरवी,धनाजी परपोलकर,संभाजी सरदेसाई,बंडोपंत चव्हाण,सौ.अनुसया पाटील,अतुल पाटील,रवी तळेवाडिकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या -१

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!