


आजऱ्याच्या प्रारुप आराखड्यावरील ७३ तक्रारीवर सुनावणी
आजरा शहराच्या प्रारुप विकास आराखड्यावर नागरीकांतून आलेल्या ७३ तक्रारीवर सोमवार (ता.८) आजरा नगरंपचायत कार्यालया मधील (कै) काशिनाथअण्णा चराटी सभागृहात नियोजन समितीसमोर सूनावणी झाली. प्रारुप विकास आराखड्याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे शहरातून ७४ तक्रारी आल्या होत्या. सोमवारी दिवसभर सुनावणी झाली. एक तक्रारदार मात्र सुनावणीसाठी उपस्थित राहीले नव्हते.आजरा शहराचा प्रारुप विकास आराखडा अधिसुचना (ता. ९) फेब्रुवारीला राज्य शासनाच्या राज्यपत्र पुणे विभाग पुरवणी भाग १ मध्ये प्रसिध्द केली होती. आजरा नगरपंचायतीने प्रारुप आराखडा नगरपंचायत कार्यालयात प्रसिध्द केला होता. सदर आराखड्याबाबत नागरीकांकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या.
सदर हरकती व सुचना बाबत नियोजन समिती समोर सोमवारी दिवसभर सुनावनपाणीपार पडली. या वेळी सूनावणीसाठी ७३ हरकतदार आवश्यक कागदपत्रासह उपस्थित होते. नियोजन समिती सदस्य निशिकांत गोरुले ( आर्किटेक्ट), आर. व्ही. पाटील , एम. टी. यादव ( निवृत्त सहसंचालक) या नियोजन समिती सदस्यासमोर सूनावणी पार पडली.
या वेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अशोक चराटी, किरण कांबळे, अशासकीय सदस्य उपस्थित होते.










