mrityunjaymahanews
अन्य

आज-यात तणाव…

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट…
आज-यात तणावपूर्ण वातावरण

आज आजरा बंदची मुस्लिम बांधवांची हाक

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारा संदेश बुधवारी सायंकाळी प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास येताच मुस्लिम बांधवांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निषेध म्हणून आज आजरा बंदची हाक देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी… आजरास्थित पण सध्या बाहेरगावी असणाऱ्या एका तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. ही बातमी संपूर्ण शहरभर पसरल्यानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने आजरा पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीसमोर एकत्र आले व संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी करू लागले.

पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्यासह आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना पाचारण केले गेले.उपविभागीय अधिकारी राजीव नवले व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित असणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळीसोबत बैठकही घेतली. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन वातावरण बिघडेल अशी कृती करू नका असे आवाहनही त्यांनी केले. संबंधित तरुणास अटक करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. आजरा बंद न करण्यावर उपस्थितांनी सहमती दर्शवली. चर्चा सकारात्मक झाली असतानाच कांही अतिउत्साही मंडळींनी आजरा बंदची हाक देत जोरदार घोषणाबाजी केली.

अखेर पोलिसांनी सदर जमावाला पांगवले.

जादा पोलीस कुमक तैनात

शहरामध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जादा पोलीस बळ मागवण्यात आले असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले.

बंदबाबत संभ्रम…

एकीकडे आजरा बंद न करण्याबाबत चर्चा झाली असतानाच दुसरीकडे मात्र बंदबाबत ठाम असणाऱ्या कांहीं तरुणांकडून घोषणाबाजी केली जात होती.रात्री अचानकपणे सदर घटना घडून आजरा बंदची हाक दिली गेली असल्याने व बहुतांशी स्थानिक मंडळींना याबाबत कल्पना नसल्यामुळे आजच्या आजरा बंदबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू नका…राजीव नवले

घडलेली घटना ही निश्चितच चुकीची आहे. संबंधितांवर कारवाई होणारच. परंतु कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे वर्तन कोणाकडूनही होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केले.

 

तालुका खरेदी विक्री संघात कांटे कि टक्कर…

 

सत्ताधा-यांविरोधात रवळनाथ परिवर्तन विकास आघाडी आक्रमक

 

ज्योतीप्रसाद सावंत

 

आजरा तालुका खरेदी विक्री संघाकरिता शनीवार दिनांक १३ मे रोजी मतदान होत असून सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीमध्ये विरोधी रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत प्रचारात आघाडी घेतल्याने कांटे की टक्कर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

त्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विद्यमान अध्यक्ष एम. के. देसाई, आजरा कारखान्याचे माजी संचालक अल्बर्ट डिसोझा, उदय पवार वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील ही मंडळी करीत आहेत.

 

विरोधी श्री रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी,गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजू पोतनीस, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, उद्योजक रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, जनार्दन टोपले ही मंडळी करीत आहेत.

 

बिनविरोधच्या पार्श्वभूमीवर तडजोडीची बोलणी विस्कटल्यानंतर सत्ताधारी मंडळी सहजपणे ही निवडणूक जिंकतील असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये असणारे रुसवे- फुगवे विरोधी आघाडीच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसू लागले आहे.संस्था गटासह इतर संस्था गटात सत्ताधारी वरचढ ठरतील असे दिसत आहे, तर व्यक्ती गटासह राखीव पाच संचालक पदाच्या जागेची निवडणूक मोठ्या चुरशीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही विरोधी परिवर्तन रवळनाथ विकास आघाडीने सेवा संस्था व इतर संस्था गटांमध्येही जोरदार प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. विरोधी गटाकडून सत्ताधाऱ्यांमध्ये असणारे अनेक माजी संचालक आपल्या बाजूने असल्याचा दावाही केला जात आहे.सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात मात्र चुरशीची दिसत आहे. सत्ताधारी गटाने नऊ संचालकांना विश्रांती दिली असल्याने याचा फायदा उठवण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.

 

आमदार आबीटकरांची हजेरी तर आमदार हसन मुश्रीफ अद्याप ‘वेट अँड वॉच ‘च्या भूमिकेत

आमदार प्रकाश आबिटकर,गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी विरोधी आघाडीच्या विभागवार मेळाव्यांना हजेरी लावली आहे तर सत्ताधाऱ्यांचे नेते आमदार हसन मुश्रीफ अद्यापही वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसत आहेत.

स्वाभिमानी सह भाजपाचे कार्यकर्ते विभागले….?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्ते दोन्हीही आघाडीमध्ये विभागले असून पक्षाचे लेबल बाजूला ठेवून ही मंडळी वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!