mrityunjaymahanews
अन्य

तणाव निवळला… बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद...
तणाव निवळला

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचे संदेश प्रसारित केल्याबद्दल आजरा शहरामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण बऱ्यापैकी निवळले असून आजरा बंदला सर्व धर्मीयांनी पाठिंबा दर्शवत झाल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

सोशल मीडिया वरून अल्पवयीन तरुणाने मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचा संदेश प्रसारित केल्यानंतर शहरामध्ये संतापाची लाट उसळली. संबंधित तरुणावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी या मागणीसाठी नागरिकांनी बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत आजरा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारती समोर ठिय्या मांडला होता. दरम्यान गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते घरी परतले होते. मात्र या प्रकरणाचा निषेध म्हणून आजरा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सर्व धर्मीय बांधवांनी आज दुपारपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवून या आवाहनास प्रतिसाद दिला. दुपारनंतर व्यवहार सुरळीत झाले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलासह गृहरक्षक दलाचे जवान व जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

इथून पुढे जपून वागा… राजीव नवले

शांतता कमिटीची बैठक संपन्न

या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली. बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले म्हणाले, पक्ष व संघटनांच्या जीवावर कोणी शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. जमावाच्या मानसिकतेतून कार्यकर्त्यांनी बाहेर पडावे. जमावाच्या माध्यमातून केलेला कोणताही अनुचित प्रकार लपून राहील अशा भ्रमात कोणीही राहू नये. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शहरवासीयांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. तरुणाईच्या पालकांची जबाबदारी वाढली असून तरुणांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी आज-याचे तहसीलदार समिर माने म्हणाले, आजरा तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. अशावेळी एकमेकांविषयी द्वेष पसरवणे निश्चितच तालुक्याच्या परंपरेला गालबोट लावणारे ठरू शकते. शासनाला सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.

यावेळी नगरसेवक आनंदा कुंभार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, अबुसईद माणगावकर, मंजूर मुजावर यांनी सदर घटनेचा निषेध केला.

बैठकीस मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, बशीर खेडेकर,संभाजी पाटील, सुधीर कुंभार, अरुण देसाई, कुदरत लतीफ, म्हाळसाकांत देसाई, शिवराज देसाई, बापू टोपले, यशवंत इंजल, गौरव देशपांडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी मानले.

तालुका खरेदी विक्री संघात परिवर्तन अटळ… अशोकअण्णा चराटी

आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या एककली व मनमानी कारभाराला तालुक्यातील जनता कंटाळली आहे. सत्तेसाठी शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आपण हाणून पाडला आहे.यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य सभासदांना मतदान करता येणार आहे. हे सभासद निश्चितच आपल्या बाजूने कौल देतील असा विश्वास व्यक्त करत आता तालुका संघात परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले. ते आजरा येथे आयोजित मतदार कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

यावेळी बोलताना चराटी म्हणाले, केवळ स्वार्थासाठी अनेक ज्येष्ठ व अनुभवी संचालकांना डावलण्यात आले आहे. सत्ताधारी गटामध्ये प्रचंड नाराजी आहे.अनेकांनी आपणाला पाठिंबा दर्शवला आहे, त्यामुळे रवळनाथ परिवर्तन विकास आघाडी आता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, विजयाची चिंता करू नये असेही स्पष्ट केले.

जयवंतराव शिंपी म्हणाले, तडजोडीचा प्रस्ताव ऐनवेळी नाकारून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला होता. सर्वसामान्य सभासदांना हा विश्वासघात कदापीही रुचलेला नाही. त्यामुळे सभासद विरोधी आघाडीच्या पाठीशी असून सभासदांनीच आता सत्तांतर घडवण्याचा निर्धार केला आहे असेही स्पष्ट केले.

यावेळी आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, तानाजी देसाई, सखाराम केसरकर, उद्योजक रमेश रेडेकर, बशीर खेडेकर, किरण कांबळे, अनिरुद्ध केसरकर, राजू सावंत, मसनु सुतार, दशरथ अमृते, जी.एम. पाटील, राजू पोतनीस, अभिषेक शिंपी यांच्यासह मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवर्तन विकास आघाडीच्या आज-यातील रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद


  श्री रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीच्या आज-यातील रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशोकअण्णा चराटी,विलास नाईक,जनार्दन टोपले, जयवंतराव शिंपी,सुरेश डांग,अभिषेक शिंपी, बशीर खेडेकर,बापू पारपोलकर, एम.डी. दरवाजकर, दिलावर चांद,विक्रम पटेकर, अनिकेत चराटी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने मडीलगे येथे घर टू घर प्रचार मोहीम राबवण्यात आली. यावेळी श्री. हनुमान सहकारी संस्था समूह, श्री. भावेश्वरी सहकारी संस्था समूह, लोकमान्य संस्था समुहाच्या वतीने या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दर्शविण्यात आला.

संबंधित पोस्ट

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी गंभीर जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी येथे आमदार खासदारांना रोखले…

mrityunjay mahanews

आजऱ्यात एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!