


तोबा गर्दी…
भक्तांनी अनुभवला डोक्यावरील आरतीचा थरार…

आजरा – प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाचे आजरा तालुक्यातील भाविकांचे खास आकर्षण असणारी रवळनाथ मंदिर येथील डोक्यावरची आरती तोबा गर्दीत पार पडली.याची देही,याची डोळा अनेकांनी हा थरार अनुभवला.

सायंकाळी साडेसातनंतर रोहन गुरव याच्या मुंडण केलेल्या डोक्यावर आरती ठेवण्यात आली होती.हजारो भाविक, पंचमंडळी,मानकरी यांची उपस्थिती, पारंपारीक वाद्यांचा गजर या पार्श्वभूमीवर आरती पार पडली.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना चराटी, तहसीलदार सुरज माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे,संजयभाऊ सावंत,संभाजीराव सावंत,विजयकुमार पाटील, डॉ.दीपक सातोसकर आनंदा कुंभार,दीपक कुरुणकर,सुजित देसाई,सागर देसाई,दिलीप गुरव,जनार्दन टोपले,संभाजी पाटील, विलास नाईक, अनिरुद्ध केसरकर,धनाजी पारपोलकर,सुभाष नेवगी,सुरेश कांबळे,आनंदा नाईक,सचिन भोई,दशरथ अमृते,बंडोपंत चव्हाण, ओंकार माद्याळकर,गौरव देशपांडे,एस.पी.कांबळे
यांच्यासह प्रमुख व भाविक मंडळी उपस्थित होती.
(सर्व छायाचित्रे : विक्रांत वाळके )



आज छाननी…
इच्छुकांचे लक्ष लागून

आजरा :प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी एकूण २७० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.आज सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी आहे.
दाखल करण्यात झालेल्या अर्जामध्ये सदस्य पदासाठी २२६ तर सरपंचपदासाठी ४४ अर्ज दाखल करण्यातआलेआहेत.खोराटवाडी,
चांदेवाडी येथील सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीकरीता प्रत्येकी १ दाखल झाल्याने या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग खुला झाला आहे . जाधेवाडी येथील एका जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पेरणोली व मेंढोली येथे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने येथे निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



पं. दीनदयाळ विद्यालयात संस्कारचे जीवनातील महत्त्व या विषयावर व्याख्यान

आजरा – प्रतिनिधी
पंडित दीनदयाळ विद्यालयात संस्कारचे जीवनातील महत्त्व या विषयावर व्याख्यान पार
पडले.
या कार्यक्रमासाठी सौ. वर्षाताई डहाळे , देवराज डहाळे आणि माधव कुंभोजकर ,पुणे उपस्थित होते सुरुवातीला सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी स्वागत केले. संस्कारचे आपल्या जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करताना सौ. वर्षताई डहाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले त्यांच्यावर जिजाऊ यांनी कसे संस्कार केले ते उदाहरणे देऊन सांगितले जिजाऊ यांनी देव, देश ,धर्म आणि स्त्री आपल्या राज्यामध्ये सुरक्षित राहिले पाहिजेत असेही स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक सुधीर कुंभार, विद्यार्थी – विद्यार्थिनी,शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत बुरुड यांनी तर विजय राजोपाध्ये यांनी आभार मानले.



रास्त भाव धान्य दुकानदारा विरोधात ग्रामपंचायत आक्रमक

आजरा – प्रतिनिधी
चव्हाणवाडी ता. आजरा येथील स्वस्त धान्य दुकान वितरण व्यवस्थेबद्दल ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने दुकानाशी संबंधित मंडळींना वारंवार सूचना केल्या आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारीबाबत कोणतीही कार्यवाही संबंधितांकडून होत नसल्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी चव्हाणवाडीच्या सरपंच सौ. मंगल भोळे यांच्यासह ग्रामपंचायतीने आजरा तहसीलदारांकडे केली आहे.



वाहतुकीची कोंडी…
गाड्या रस्त्यावर मावेनात

आजरा :- प्रतिनिधी
आजरा शहरातून जाणाऱ्या गडहिंग्लज – आंबोली मार्गावर वाहतुकीची वारंवार कोंडी होऊ लागली आहे. रस्ता नूतनीकरणाचे सुरू असलेले काम, त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली खुदाई, सुट्टीमुळे गोव्यात कोकणात झालेल्या पर्यटकातील वाढ या सर्वांचा परिणाम आजरा शहरातील वाहतुकीवर होऊ लागला आहे. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनचालक त्रस्त होत आहेत. मुळातच गाड्यांची संख्या भरमसाठ व अपुरा रस्ता या कोंडीस कारणीभूत ठरत आहे.
आजरा पंचायत समिती ते नूतन न्यायालयीन इमारतीपर्यंत वाहतूकीचा वारंवार खोळंबा होत असताना दिसतो. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव जोरात सुरू असल्यामुळे पोलीस व गृह रक्षक दलाच्या जवानावर बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीकडे पोलीस प्रशासनाला लक्ष देताना मर्यादा येताना दिसत आहेत.
असे जरी असले तरी याचा त्रास वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना निश्चित होत आहे.


आज शहरात
नवरात्र विशेष
🟣◼️🟣 श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समिती :- बामणादेवी भाजनियांदल जेऊर यांचे भजन व रास दांडिया( वेळ- रात्री ९ वाजता )
🟣◼️🟣 लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ:- महिलांसाठी पाककला स्पर्धा (वेळ- रात्री ८ वाजता)
🟣◼️🟣 भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ :- महाराष्ट्राची लोकपरंपरा (वेळ- रात्री.९ वाजता )
🟣◼️🟣 छत्रपती शिवाजीनगर तरुण मंडळ नवरात्र उत्सव :- महा रासदांडिया (वेळ – रात्री ८ वाजता )
🟣◼️🟣 क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ – महाआरती व रासदांडिया (वेळ – रात्री ८ वाजता)
दुर्गामाता दर्शन
शारदीय नवरात्र उत्सव मंडळ, पारेवाडी

अध्यक्ष:- नारायण गुंडू घेवडे
उपाध्यक्ष :- पांडुरंग कृष्णा निर्मळे
सचिव :- अजित भाऊसो निर्मळे
खजिनदार :- आनंदा गुंडू गावडे
मूर्ती देणगीदार :- लक्ष्मण गुंडू घेवडे
शारदीय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, उत्तूर

अध्यक्ष :- सुनील सावंत
उपाध्यक्ष :- प्रणय आरेकर
सचिव :- अमित जाधव
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, शिरसंगी

अध्यक्ष : उमेश देसाई.
उपाध्यक्ष : युवराज सुतार
खजिनदार : योगेश बोडके
सेक्रेटरी : निवृत्ती बोडके.
मूर्ती देणगीदार :
सौ:वनिता मनोहर देसाई व मनोहर शंकर देसाई



.

