मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५





गव्याच्या हल्ल्यात घोडा ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेंढ्या चारवण्याच्या उद्देशाने साळगाव ता. आजरा येथून जायकवाडी येथून आलेल्या निंगोजी रामा धनगर यांच्या साळगाव गावातील शेतात बांधलेल्या घोड्यावर गव्याने केलेले हल्ल्यात घोड्याचा मृत्यू झाला.
साळगाव ता. आजरा येथील शेतात मेंढ्या चारवण्यासाठी धनगर बांधव आले होते त्यांनी आपल्या मेंढ्या शेतात सोडून घोडे शेतामध्ये झाडाला बांधले होते. दरम्यान आज मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बांधलेल्या घोड्यावर गव्याने हल्ला केला यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला.


निधन वार्ता
अहंमद मुल्ला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमराई गल्ली आजरा येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अहमद मोहम्मद मुल्ला ( वय ७७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ते माजी सरपंच आसलम खेडेकर यांचे सासरे व नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांचे आजोबा होत.










