


सुलगाव येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह रामतीर्थ येथील नदी पात्रात सापडला..?

सुलगाव (ता. आजरा)) येथून गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असणाऱ्या राजाराम अंतू लांडे (वय 48) या व्यक्तीचा मृतदेह रामतीर्थ परिसरात असणाऱ्या नदीपात्रातील झाडीमध्ये आढळून आला.गेल्या आठवडाभरापासून तो बेपत्ता होता. अतिवृष्टी काळात सदर व्यक्ती बेपत्ता झाल्याने त्याची शोधाशोध सुरू होती. दरम्यान आज दुपारी काही स्थानिक नागरिकांना नदीपात्राच्या काठी असणाऱ्या झाडांमध्ये एक मृतदेह अडकलेल्या स्थितीत दिसून आला. स्थानिक पोलिसांना सदर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली व अधिक माहिती घेतली असता सदर राजाराम याचा नदीपात्रात पडून बुडून मृत्यू झाला असल्याचे आढळून आले.मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवन्याचे काम सुरु होते.अखेर् कुटुंबियांना त्याची ओळख पटली.
राजाराम यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.






