mrityunjaymahanews
अन्य

आजऱ्यात मारामारी…

आजऱ्यात मारामारी…
चौघे जखमी

पंधरा जणांवर गुन्हा नोंद

आजरा येथे किरकोळ कारणTवरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये चौघेजण जखमी झाले असून पोलिसांनी परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून पंधरा जणांवर गुन्हा नोंद केला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की…

मॉफिस असलम खेडेकर व सादिक रहीमबक्ष सिराज (दोघे रा.आमराई गल्ली ) यांच्यामध्ये किरकोळ वादावादी सुरू झाली. सीड फार्म नजीक सुरू झालेली ही वादावादी आजरा येथील संभाजी चौकात येईपर्यंत सुरूच होती.संभाजी चौकात हे दोघे आल्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी या वादावादीत भाग घेतला व वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. एकमेकांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून झालेल्या या मारामारीमध्ये मॉफिस असलम खेडेकर,राहील असलम खेडेकर, अल्ताफ सादिक सिराज(सर्व रा.आमराई गल्ली,आजरा) व मोहसीन शौकत लष्करे(रा.गांधीनगर,आजरा) असे चौघेजण जखमी झाले.

 राहील असलम खेडेकर व अल्ताफ सादिक सिराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी राहील खेडेकर, तौसीफ खेडेकर, आशिष खेडेकर, मॉफिस खेडेकर, अमित खेडेकर, इलियास मुल्ला, गुड्डू सलीम खेडेकर, मोहसीन लष्करे, आफताब सादिक सिराज, इरफान रहीमबक्ष सिराज, ताहीर तकिलदार, सादिक रहीमबक्ष सिराज, आरिफ मोहम्मद शिराज, शकील शिराज, मंजूर मुजावर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.
……………………………………….

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

शिवाजीरावांनंतर मानसिंगरावांची भूमिका स्पष्ट

mrityunjay mahanews

आजऱ्यात अशोकअण्णा चराटींचा वाढदिवस उत्साहात– येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांचा वाढदिवस आ. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!