संस्था व इतर संस्था गटात सत्ताधाऱ्यांची बाजी

आजरा तालुका खरेदी – विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विकास सेवा संस्था गट व इतर संस्था गटांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी व समर्थक आघाडीच्या मंडळींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये मतमोजणी सुरुवात झाली आहे एकूण २४ मतदान केंद्रांकरिता २२ टेबल ठेवण्यात आले असून सुरुवातीलाच संस्था व इतर संस्था गटाची मतदान मोजणीला घेण्यात आले सत्ताधाऱ्यांच्या बाजूने स्पष्ट कौल मिळाल्याचे स्पष्ट झाले.
सत्ताधारी श्री. रवळनाथ विकास आघाडीच्या उमेदवारांना विकास सेवा संस्था गटातून सरासरी ५२ तर इतर संस्था गटातून उमेदवार उदय पवार यांना ८७ मते मिळाली.
विकास सेवा संस्था गटातून आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व सन्मित्र संस्था समूह वाटंगीचे सर्वेसर्वा अल्बर्ट नातवेद डिसोझा(वाटंगी)४८मते, विठ्ठलराव रामराव देसाई (उचंगी)५५ मते, डी. ए./ दौलती अंतू पाटील (कोरीवडे)५४मते, महादेव पाटील- धामणेकर ५३मते, सुनील देसाई (खोराटवाडी)५४मते, राजाराम जोतिबा पाटील(गजरगाव)५३ मते, महादेव जोतिबा हेब्बाळकर (गवसे)५२ मते हे विजयी झाले.
या गटातून श्री रवळनाथ परिवर्तन विकास आघाडीचे डॉ. इंद्रजीत नानासाहेब देसाई -४०मते ,आनंदा गणपती कुंभार-३७ मते, पांडुरंग केसरकर-४१ मते, विजय बाबुराव देसाई-३९ मते,मनोहर गोपाळ पाटील-३७ मते,उत्तम रेडेकर -४७मते , सुरेश शंकर सावंत-३९ मते पडली या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले.
इतर संस्था गटातून माजी सभापती उदय बाबासाहेब पवार यांनी ८७ मतांसह विष्णू भाऊ पाटील यांना २२ मते मिळाली.
निकालाचा कल स्पष्ट होतात सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली.
(निकालाचे इतर अपडेटस लागलीच देत आहोत.)



