


चित्री प्रकल्प १००% भरला… आजरा, गडहिंग्लज तालुक्याला दिलासा

चित्री प्रकल्प पुर्ण क्षमतेने आज दि.५ रोजी सकाळी भरला. सांडव्यातून पाणी वाहत आहे. गतवर्षी हा प्रकल्प १३ ऑगस्टला भरला होता. यंदा प्रकल्प ८ दिवस लवकरच भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस समाधानकारक असल्याने प्रकल्प लवकर भरला आहे. आजरा, गडहिंग्लज या दोन तालुक्याला वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे दोन तालुक्यातील शेतकरी व जनतेचे लक्ष असते. हा प्रकल्प भरण्याची उत्सुकता असते. चित्री प्रकल्प परिसरात यावर्षी आजपर्यंत १९२७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पाणी पातळी लक्षात घेऊन विद्युत गृहातून विसर्ग सुरू करण्यात येत असल्याचे पालक बंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सतर्कतेचा इशारा…
चित्री मध्यम प्रकल्प १००% भरला असून सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे चित्री नदी तसेच हिरण्यकेशी नदीच्या सद्यस्थितीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
चित्रीबरोबरच आंबेओहोळ प्रकल्पही भरण्याच्या स्थितीत असून कोणत्याही क्षणी सांडव्यावरून विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
………………………………….



छाया वृत्त :-

सुळेरान,धनगरमोळा व घाटकरवाडी परिसरातील पिकांच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.
…………..,……………………………………

केंद्र शासनाच्या PM SRI(Schools for Rising India)योजने अंतर्गत शाळा इमारतशैक्षणिक गुणवत्ता,शाळेतील भौतिक सुविधा,स्वच्छतागृह संगणक कक्ष, इत्यादी सुविधा बाबत गुणदान होऊन उर्दू विद्यामंदिर आजरा ही शाळा या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. यानिमित्त शिक्षकांचे व येथील शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे खिदमत ग्रुप मार्फत अभिनंदन करण्यात आले.
…………………………………………..


