
सुधाकर चव्हाण यांचे निधन

येथील व्यंकटराव हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक व आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक सुधाकर दत्तात्रय उर्फ एस.डी. चव्हाण (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

दारूच्या नशेत पडून एकाचा मृत्यू
विद्यानगर,आजरा येथील अंगणवाडी आवारात मद्यधुंद अवस्थेत कट्ट्यावर झोपलेल्या कान्हा पांडू पोवार ( वय ४२, रा. कुडाळ) यांचा कट्ट्यावरून खाली पडून जखमी होऊन मृत्यू झाला.
सदर घटना बुधवार दिनांक २४ मे रोजी दुपारी दोन वाजण्यापूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची वर्दी संतोष पांडू निकम (रा. कडगाव, ता. भुदरगड) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.


कानोली येथे भटक्या कुत्र्याचा ५ जणांना चावा….
कानोली (ता.आजरा) येथे पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने गावातील ५ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले आहे. यातील जखमी नागरिकांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे.
या भटक्या कुत्र्याने दुपारी १२ वाजल्यापासून ५ नागरिकांचा चावा घेऊन जखमी केलेआहे .


आमदार आबीटकर यांना गिरणी कामगारांच्या शुभेच्छा…

आजरा तालुका गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्या वतीने आमदार श्री.प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन गिरणी कामगार समितीवर नेमणूक करण्यात आले बद्दल त्यांना कोल्हापूर जिल्हा कार्यकारी कमिटी व आजरा तालुका कमिटी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्याबरोबर गिरणी कामगारांच्या वतीने लेखी निवेदन देऊन पुढील वाटचाली बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार श्री.संजय मंडलिक , श्री.विजयकुमार पाटील,व संस्थेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री.अर्जुन भादवणकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री.भिमराव साळगावकर, आजरा तालुका उपाध्यक्ष श्री.सुरेश कांबळे ,आजरा तालुका सेक्रेटरी श्री.प्रतिक पाटील ,
मुरुडे कार्यकारी कमिटी उपाध्यक्ष श्री.गणेश भादवणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्यथा आंदोलन करणार…-संग्राम सावंत

अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा संस्था व डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दु हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा येथील भ्रष्टाचार आणि शैक्षणिक कामातील गैरव्यवहार व बोगस रेकॉर्ड व कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आजारात तहसीलदारांना देण्यात आला आहे.
यासंदर्भात मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने पूर्वी आजरा तहसिलदार कार्यालयावर “संघर्ष मोर्चा” काढण्यात आला.त्यानंतर दि.८/०३/२०२३ रोजी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.त्यांच्या समोर मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने संग्राम सावंत यांनी पुराव्यानिशी लेखी व तोंडी युक्तीवाद केलेला आहे.तसेच मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेल्या तिन्ही निवेदनाबाबतीत व तक्रारदार यांच्या अर्जाची शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अधिकारामध्ये येणाऱ्या मागण्यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी व चौकशी समितीने केलेली आहे.हे करताना चौकशी समितीने मागण्यांची ही चौकशी केलेली आहे.सर्व बाबी तपासून त्यानुसार प्रोसेंडिंग/इत्तिवृत्त तयार केलेले आहे.याबाबतीत ठोस निर्णय घेऊन संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे होता.मात्र त्यांच्या कडून असे काही झालेले नाही.
अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा संस्था व डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दु हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा येथील भ्रष्टाचार आणि शैक्षणिक कामातील गैरव्यवहार व बोगस रेकॉर्ड व कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.
डी.डी.कोळीसो,नायब तहसीलदार, तहसिलदार कार्यालय आजरा आणि प्रशासक,अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज,आजरा ता.आजरा. कोल्हापूर यांना निलंबित करा.यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली झाली पाहिजे.
प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून योग्य ती कारवाई केली नाही. तर जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यालयासमोर पुढील १५ दिवसात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत.असा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई केली नाही तर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय, गारगोटी येथे येत्या १५ दिवसात बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी गारगोटी व तहसिलदार, आजरा यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत,बशीर खेडेकर, अबुसईद माणगावकर, समीर खेडकर, मजीद मुल्ला,दिंगबर विटेकरी,संजय कांबळे, युसुफ मुल्ला,मोसीन तगारे,ताहिर ख. माणगावकर यांच्यासह मुस्लिम समाजबांधव व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



