

देव कांडगाव येथे खाजगी ट्रॅव्हलर्स गाडीला अपघात
१९ जखमी, तीन गंभीर

आजरा : प्रतिनिधी
देवकांडगाव ता. आजरा येथे गारगोटी मार्गावर खाजगी ट्रॅव्हलर्स कंपनीच्या गाडीला अपघात होऊन गाडी पलटी झाली. यामध्ये शहापूर, ठाणे येथील १९ जण जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खाजगी ट्रॅव्हलर्स कंपनी मार्फत शहापूर ठाणे मुंबई येथील काही कुटुंबीय कोल्हापूर मार्गे गोव्याला सहली निमित्त चालले होते. दरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास देवकांडगाव जवळ असणाऱ्या रस्त्यावर ट्रॅव्हलर्स पलटी झाली. वेगात असणारी ही ट्रॅव्हलर् पलटी झाल्याने गाडीतील तब्बल १४ जण जखमी झाले. यापैकी तीन शाळकरी मुले गंभीर जखमी आहेत.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे पल्लवी प्रकाश अधिकारी(वय १८) प्रतीक्षा प्रकाश अधिकारी (वय ४८) विहान योगेश चण्णे( वय १०) योगेश गजानन चण्णे (वय ३८) वृषाली प्रदीप चव्हाण(वय ३२), आरोही प्रदीप चव्हाण( वय ९ ) अक्षता संदीप चव्हाण (वय १३) नेहा नितीन मळपेकर (वय ३१) परीदी नितीन मळपेकर (वय ११) पार्थ नितीन मळपेकर (वय ७) विद्या शिवाजी ठमके (वय ३८), आर्य शिवाजी ठमके(वय ६) अंतरा सुखदेव वलटे(वय ११), श्रेयस ज्ञानेश्वर मगर ((वय १०) ज्ञानेश्वर कदिदास मगर (वय ३४) अनुराधा ज्ञानेश्वर मगर (वय ३०) कांचन योगेश चण्णे (वय ३०) अवंती योगेश चण्णे (वय ४) अंतरा प्रकाश अधिकारी (वय ५०) अशी जखमींची नावे आहेत.

गंभीर जखमी असणाऱ्या रुग्णांना महागाव व उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात येत आहे. इतर रुग्ण आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Welcome to AJARA…?
खुदाई,धूळ,पाणी गळत्या आणि वाहतूक खोळंबा पहाण्यासाठी…

आजरा : प्रतिनिधी
कित्येक वर्षांपासून निसर्गरम्य आजरा अशी ओळख असणाऱ्या आजरा शहरांमध्ये सर्वत्र खुदाई, वाहतुकीची कोंडी,धूळ व पाण्याच्या गळत्यांमुळे शहरात यायचं की नाही ? असा सवाल आता पै-पाहुण्यांसह पर्यटक उपस्थित करू लागले आहेत.
नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व्हिक्टोरिया पुलापासून ते पुढे गवसे पर्यंत प्रचंड खुदाई सुरू आहे. त्यातच शहरभर नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने गल्लीबोळात खोदकाम सुरू आहे. यामुळे सर्वत्र मातीच माती, धूळ असा प्रकार पहावयास मिळत आहे. भरीस भर म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला ठीक- ठिकाणी लागलेली गळती धुळीचे चिखलात रूपांतर करण्यास कारणीभूत ठरत आहे. धूळ आणि वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी यामुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
विशेषत: आजरा- महागाव मार्गावर वाहतुकीची पुन्हा-पुन्हा कोंडी होत असल्याने स्थानिक रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे,धुळीचे साम्राज्य पाणीपुरवठा योजनेच्या गळत्या, वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी या सर्वांचा परिणाम म्हणून आता पर्यटक निसर्गरम्य अशी ओळख असणाऱ्या आजरा तालुक्याला भेट देण्याचे टाळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
श्वसन व घशाच्या विकारात वाढ
शहरभर धुळीचे साम्राज्य असल्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्धांना श्वसन व घशाच्या विकारांचा त्रास होऊ लागला आहे. अनेक जण यावर उपचार घेत असल्याचे स्थानिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी सांगत आहेत.
शहरात पाण्याची बोंब…
गेले वर्षभर शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या तर नवीन महामार्गाच्या खुदाईमुळे अनेक ठिकाणची पाईपलाईन फुटल्याने शहरभर पाणीपुरवठ्याची बोंब सुरू आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे.



जयवंतराव शिंपी यांनी स्वतःचा इतिहास तपासून पहावा :सुधीर देसाई

आजरा : प्रतिनिधी
आम्हाला आजरा साखर कारखान्यातील दरोडेखोर म्हणणाऱ्या जयवंतराव शिंपी यांच्या ते कारखान्यात येण्यापूर्वी व कारखान्यातून बाहेर पडताना स्थावर मालमत्तेत किती वाढ झाली हे सर्वसामान्य सभासदांनी जाणल्यामुळे कारखाना निवडणुकीत सलग दोन वेळा त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आमच्यावर आरोप करून वातावरण गढूळ करू नका अन्यथा आमच्याकडेही सांगण्याजोगे खूप आहे असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिला आहे.
कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार बैठकीत शिंपी यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावे यासाठी आपली व आपल्या नेत्यांची इच्छा आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केवळ कर्मचाऱ्यांचा आग्रह म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
२००९ पासून आपण लोकशाही मार्गाने कारखान्यात संचालक म्हणून निवडून गेलो आहोत. या कालावधीपासून ते आजतागायत आहे ती आपल्या वडिलोपार्जित संपत्ती वगळता अन्य संपत्तीत काडीचीही वाढ झाली नाही, याची माहिती आपण जरूर घ्यावी.खरे दरोडेखोर कोण ? हे त्यानंतरच कळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.



घरफाळा वाढ रद्द करा…
शहवासीय व भाजपची मागणी आजरा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आजरा: प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीने अतिरिक्त घरफाळा वाढवलेला आहे. शहरातील नागरिकांवर आर्थिक अरिष्ट कोसळणार आहे. त्यामुळे घरफाळा वाढ रह करावी, अशी मागणी शहरवासीय व आजरा तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे
निवेदनात म्हंटले आहे …
आजरा नगरपंचायतीने वाढीव घरफाळा व अन्य कर आकारणी केलेली आहे. अतिरिक्त वाढवलेला घरफाळा व अन्य करवाढ हा शहरातील नागरीकांवर अन्याय असून ही अन्यायकारक करवाढ आहे. शहरात राहणाऱ्या बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. वाढीव कर आकारणी भरणे शक्य नसल्याने अन्यायकारक कर वाढ रह करावी.
निवेदनावर जहीद अब्दुल रहीम दरवाजकर, नजीर अब्दुल दरवाजकर, अंकुश रामचंद्र चाग्ले, रिजवान दस्तगीर पटेल, महादेव बिरजे, राजाराम चौगुले, मनोज बघाटे, अमजद दरवाजकर, सुशील लतिफ, सलिम लतीफ,गौतम भोसले, एम. के. नहवळे, बाळू पोवार यांच्यासह नागरीकांच्या सह्या आहेत.



ऊस वाहतूकी बाबत स्वाभिमानीची तक्रार… कारवाईसाठी वहाने रोखली…

आजरा: प्रतिनिधी
कायद्याचा धाक दाखवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे.गतसाली गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये प्रमाणे प्रति टन दुसरी उचल मिळावी व चालू गळीत हंगामा करता उसाला प्रति टन ३५००/- भाव मिळावा या मागणीसाठी आपण आग्रही आहोत. यासाठी संघटनेमार्फत आंदोलन सुरू आहे. परंतु आंदोलकांना कायद्याचा धाक दाखवला जात आहे. मग बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक होणाऱ्या उसाची वाहनांवर कारवाई का होत नाही ? असा सवाल स्वाभिमानी संघटनेने उपस्थित करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोखले.
खरोखरच कायद्याने तुम्ही जाणार असाल तर क्षमतेपेक्षा गाड्यांमध्ये जादा ऊस भरणे, परवानगी नसतानाही छकडा गाड्यांचा वापर करणे, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, विमा पिऊसी यासारखी कागदपत्रे असणे यासारख्या कायद्याच्या भंग करणाऱ्या अनेक गोष्टी ऊस वाहतूक करणाऱ्या मंडळींकडून होत आहे. अशावेळी तुमचा कायदा कोठे आहे ? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अशा गाड्या रोखल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तानाजी देसाई, निवृत्ती कांबळे, कृष्णा पाटील, सखाराम केसरकर यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते.



कानोली येथे दीपमाळ उदघाटन सोहळा संपन्न…

आजरा : प्रतिनिधी
कानोली (ता.आजरा) येथे भैरवनाथ मंदिर परिसरात आजी- माजी सैनिक पोलिस संघटना आणि कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ यांचे वतीने बांधण्यात आलेल्या दीपमाळ उदघाटन लोकार्पण सोहळा आजरा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस उपनिरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमच्या अध्यक्षतेस्थानी आमदार राजेश पाटील होते.
स्वागत सेवानिवृत्त पो.उपनिरीक्षक अरविंद आपगे यांनी केले,त्यानंतर मान्यवर यांचा सत्कार सरपंच सौ.सुषमा पाटील आणि आजी-माजी पोलीस व सैनिक यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, आजी -माजी पोलीस सैनिक यांनी दीपमाळ बांधून गावच्या वैभवात भर घातली आहे,त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,यापुढेही गावासाठी त्यांनी काम करावे.गावच्या विकासासाठी नेहमी आमचा हातभार असेल .

यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर,आणि प्रकाश पाटील आजरा कारखाना चेअरमन सुनील शिंत्रे,संचालक जितेंद्र टोपले,दशरथ अमृते,रमेश रेडेकर यांच्यासह सरपंच सौ.सुषमा पाटील माजी सनदी अधिकारी जे .टी. पाटील, संघटनेचे सचिव चंद्रकांत आ. पाटील वसंतराव देसाई, जयसिंग पाटील बाजीराव पाटील,श्रीपतराव देसाई,दिलीप पाटील,सुधीरकुमार पाटील, अनिल पाटील चंद्रकांत पाटील,सौ.सारिका पंडितराव पाटील, विनायक सावरतकर ,दीपक देसाई प्रकाश पाटील बळवंत पाटील दिनकर पाटील परशुराम आपगे, यांच्यासह गावातील आजी -माजी पोलीस सैनिक पोलीस व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार सुभाष पाटील यांनी मानले.



निवड…
रवींद्र मुंगुर्डेकर

दाभिल ता. आजराच्या उपसरपंचपदी रवींद्र तुकाराम मुंगुर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.




