mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

चक्का जाम…

स्वाभिमानीच्या २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद


                      आजरा:प्रतिनिधी

        उत्तूर येथे  चक्काजाम आंदोलन करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        गतसाली गाळप झालेल्या ऊसाला चारशे रुपये अधिक उचल मिळावी व चालू गळीत हंगामाकरिता प्रति टन ३५००/- रुपये पहिली एक रकमी उचल मिळावी या मागणीसाठी उत्तूर-गारगोटी रोडवर चक्काजाम आंदोलन करून वाहतुकीस अडथळा केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        यामध्ये सदानंद विनायक व्हनबट्टे, संभाजी राजाराम कुराडे, मुकुंद संताजी पाटील, बाळासो विष्णू सावंत, व्यंकटेश बंडेराव मुळीक, संताजी पाटील , विलास कृष्णा भादवणकर , राजु उर्फ अनंत रामचंद्र देशपांडे रा होन्याळी, ता आजरा, अनिल धामणकर, अरुण पाटील , हर्षवर्धन कुराडे, धनाजी उत्तुरकर, दिपक गोपाळ रावण, सुरेश कृष्णा राजाराम,भिकाजी आनंद पाडेकर रा.झुलपेवाडी ता. आजरा, भगवान विष्णु धामणकर , उत्तूर ता.आजरा व अन्य पाच जणांचा समावेश आहे.

         याबाबतची फिर्याद दीपक सुभाना किल्लेदार यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


बिरेश्वर पतसंस्थेमुळे आजरा तालुक्याच्या सहकार वैभवात भर : आम. प्रकाश आबिटकर

                      आजरा : प्रतिनिधी
     जोल्ले समूहामार्फत चालवल्या जाणाऱ्या श्री बिरेश्वर पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपले वेगळे वलय तयार केले आहे. सहकार आदर्श पद्धतीने चालवणाऱ्या आजरा तालुक्यात सुरू होत असलेली शाखा म्हणजे तालुक्यातील सहकाराच्या लौकिकात पडणारी भर आहे,असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. श्री बिरेश्वर पतसंस्थेच्या १९३ व्या आजरा शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी होते.संस्थेचे डी.जी.एम. एम.के.मंगावते, बी. ए.गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.

     जोल्ले समूहातील भास्करअण्णा पाटील, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, आजरा अर्बनचे संचालक विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उद्घाटन सोहळा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी संस्थेच्या सह संस्थापिका आम.शशिकला जोल्ले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

      यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अशोकअण्णा चराटी, इमारतीसाठी सहकार्य केलेल्या सुभाष मोरजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

      यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, अतिशय चांगल्या पद्धतीने या उद्योग समूहाचे कार्य सुरू असून खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांनी या उद्योग समूहातून अनेकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. तालुक्यातील सहकारामध्ये मार्गदर्शक म्हणून ही संस्था निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वासही व्यक्त केला.

      यावेळी अण्णाभाऊ संस्था प्रमुख अशोकअण्णा चराटी म्हणाले ३६०० कोटी रुपयांच्या ठेवी, पावणेचार लाख सभासद , ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व प्रचंड व्याप असणाऱ्या या संस्थेमार्फत बँकिंग प्रमाणे विविध सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात. आजरा तालुक्यामध्ये संस्थेची शाखा सुरू करून तालुक्याच्या सहकार वैभवात भर घालण्याचे काम जोल्ले उद्योग समूहाने केले आहे. एका चांगल्या संस्थेचे आगमन आजरा तालुक्यात झाले असल्यामुळे तालुका वासियांना याचा निश्चित फायदा होईल असे सांगितले.

     यावेळी सतीशअण्णा पाटील, संस्थेचे अधिकारी ए.बी.नाईक ज्योतिप्रसाद सावंत, मानसिंगराव देसाई, विकास फळणीकर, प्रा. विजय बांदेकर, दत्तात्रय मोहिते, सुधीर कुंभार, अनिरुद्ध केसरकर,अश्विन डोंगरे, शाखा व्यवस्थापक दत्तात्रय सुतार, गणपतराव डोंगरे, समीर मोरजकर, प्रभाकर कोरवी, नाथा देसाई, विजय थोरवत,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रमेश चव्हाण यांनी केले.


हात्तिवडे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

               आजरा : प्रतिनिधी
           स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत हात्तिवडे येथे शिवसेना ठाकरे गट आजरा व अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर पांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर पार पडले.

        या शिवीरामध्ये ह्रदय विकार, मूत्रविकार, मुतखडा, हाडांचे विकार, कैन्सर या रोगांची तपासणी केली. इ.सी.जी, रक्तातील साखर रक्तदाब मासह महालब गडहिंग्लज यांच्याकडून मोफत रक्त तपासणी, आयुष्यमान भारत कार्डची नोदणी केली. या पोजनेचा लाभ हात्तिवडेसह पंचक्रोशीतील नागरीकांनी घेतला.

        शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी ग्रामीण भागात आरोग्य शिबीरांचे महत्व सांगितले. ग्रामीण भागामध्ये सर्वजण शेतीवर अवलंबून असल्याने व आर्थिक सुबत्ता नसल्याने त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते ग्रामीण लोकांसाठी शिवसेनेनेच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले असत्याचे त्यांनी सांगितले

      उपजिल्हासंघटक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, मांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच उपसपंच, सदस्य, ग्रामस्य यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. शिबीर यशस्वीरित्या पार पाहण्यासाठी कृष्णा पाटील, मेशैली- बोलकेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास जोशितकर, सुनील डोंगरे, राजकुमार भोगण, महेश पाटील, सुयश पाटील, अमर डोंगरे यांनी केले.


श्री. विठठलदेव सह. सेवा संस्था, चाफवडे यांचे मार्फत ४ टक्के डेव्हिडंट वाटप.

                   आजरा:प्रतिनिधी

       श्री. विठठलदेव सह सेवा संस्था चाफवडे यांच्यामार्फत सर्व सभासदांना दिवाळी च्या शुभमुहूर्तावर दिवाळी भेट म्हणून सभासद शेअर्स रक्कमेवर ४ टक्के प्रमाणे डेव्हिडंट वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री विठठलदेव सह सेवा संस्था चाफवडे चे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या या निर्णयामुळे संस्थेच्या सर्व सभासदांची यावर्षीची दिवाळी आनंदाची व गोड होण्यास मदत झाली.

         या प्रोत्साहनामत्क बक्षिस वितरण कार्यकम प्रसंगी संस्थेचे चेअरमन धनाजी आप्पा दळवी, व्हा. चेअरमन विष्णूपंत आप्पा मांजरेकर, सदस्य गोपाळ अर्जुन ठाकर, विजय नारायण भडांगे, विष्णू कृष्णा ठाकर, हणमंत कृष्णा गावडे, शिवाजी कृष्णा पाटील, प्रकाश आप्पा मनकेकर, प्रकाश आप्पा मस्कर, सौ. संयोगिता संभाजी बापट, सौ. राधिका कृष्णा विरजे, त्याचवरोवर संस्थेचे सेकेटरी बसवराज उत्तूरे व विष्णू सावंत
उपस्थित होते.


२ वर्षांहून लहान मुलाच्या हातात स्मार्टफोन दिल्यास बाळ गतिमंद होऊ शकते?

जाणून घ्या बालरोगतज्ज्ञांचं मत

         सध्याच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या हातात स्मार्टफोन असतो.

त्यातच घरी लहान मुले रडत असताना किंवा आई-वडिलांना काम करत असताना त्रास देत असतील तर लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊन त्यांना शांत केले जाते. पण हेच स्मार्टफोन आरोग्यासाठी घाकत असते आणि त्याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. या संदर्भात बालरोगतज्ज्ञांचं मत नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

        बालरोगतज्ज्ञांच्या मते, अनेकदा आपल्या बाळाला जेवण भरवताना ते खात नसेल तर अशा परिस्थितीत आई त्याच्या हातात स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देतात. पण हे चुकीचे आहे. कारण, या स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन हे तुमच्या बाळासाठी घातक ठरु शकतात. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन हे तुमच्या बाळाच्या शरीरातील सर्व अवयव आणि त्वचेवर परिणाम करु शकतात. लहान बाळाचे सर्व अवयव आणि त्वचा नाजूक असल्याने त्यांना अधिक धोका असतो.

        लहान बाळ हे प्रौढांच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक रेडिएशन शोषतात. बाळ जन्मल्यावर त्यांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा काळ लागतो. या काळात मज्जासंस्था, मेंदू आणि डोळे विकसित होतात.

रेडिएशनचे दुष्परिणाम…

        लहान बाळ हे मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात आल्याने त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात. तात्काळ याचे परिणाम दिसले नाही तरी भविष्यात त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. अनेक अभ्यासात असे समोर आले आहे की, मोबाईलमधून निघणारे रेडिएशनमुळे मुलांच्या वर्तनाच्या संबंधित समस्या, अस्वस्थता यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

        गरोदर महिलांसाठी सुद्धा घातक
गर्भवती महिलांनी सुद्धा मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर कमी करावा. कारण, यामधून निघणाऱ्या रेडिएशनचा गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतो. सेंटर फॉर डिसिज अँण्ड प्रिव्हेंशनच्या मते, रेडिएशनच्या संपर्कात आल्याने गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर बाळाच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

News :Source https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq


संबंधित पोस्ट

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

शाहू छत्रपतींसाठी ‘ वंचित ‘ चे कार्यकर्ते सरसावले

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews
error: Content is protected !!