mrityunjaymahanews
अन्य

हत्तीचा वाटंगीत धुमाकूळ…

 


वाटंगीत हत्तीचा धुमाकूळ
बैलगाडीसह मोटरसायकली केल्या आडव्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वाटंगी ता. आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घालत बैलगाडीसह मोटरसायकलींचे नुकसान केले. यामध्ये पुंडलिक नाईक, संभाजी देसाई यांच्या गाड्यांचा समावेश आहे.

      रात्री अडीच वाजता हत्तीने वाटंगी- मोरेवाडी मार्गावर पुंडलिक नाईक यांच्या घराजवळ येऊन तेथील बैलगाडीसह मोटरसायकलींचे नुकसान केले. रात्रभर धुमाकूळ घालून पहाटेच्या दरम्यान हत्ती मोरेवाडीच्या दिशेने निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

     शेतकरी वर्ग शेतीकामात व्यस्त असतानाच हत्तीने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

अंगणवाडी इमारत पाडली…?
दाभिल येथील ग्रामस्थांचा आरोप

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मौजे-दाभिल गावातील अंगणवाडी क्र. ३० ची इमारत ही सन २००६ साली बांधण्यात आलेली इमारत ग्रामपंचायतीने पाडली असून या सर्व प्रकाराला स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत जबाबदार अस असल्याचा आरोप करत सरपंच, ग्रामपंचायतीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दाभिल ग्रामस्थांकडून तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     अंगणवाडीची सर्व सोयीयुक्त इमारत होती. मात्र सत्तेचा गैरवापर करुन दि. २५ एप्रिल २०२४ मध्ये जेसिबीच्या साहाय्याने अंगणवाडी पूर्ण पाडून इमारत व अंगणवाडीच्या सर्व साहित्याचे नुकसान करून कधीही न भरून येणार नुकसान केलेले आहे व अंगणवाडीतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. अंगणवाडी इमारत पाडल्यापासून लहान मूले व मुली जिथे आसरा मिळेल तेथे बसवले जात आहे. अंगणवाडी सेविका मुलांना शिकवण्यासाठी आज शाळा या ठिकाणी तर उ‌द्या दुसऱ्या ठिकाणी बसवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत, जर शिक्षणाचा पाया अंगणवाडी असेल आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडी इमारत व त्यामध्ये मिळणाऱ्या सुख सुविधा मिळत नसतील तर त्यांचे शिक्षण व भविष्य खूप अंधकारमय होईल, त्यामुळे विद्यमान सरपंच यांनी दाभिल गावाचे खूप मोठे नुकसान केलेले आहे.

     एप्रिल मध्ये इमारत पाडल्यापासून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न व महत्वाचा म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर पद्धतीने त्यांना भेडसावत असून त्या मुलांच्या आयुष्यांशी खेळण्याचा प्रयत्न सरपंच करत आहेत तेव्हा याबाबत सरपंच व ग्रामपंचायत दाभिल यांची तातडीने लवकरात चौकशी करावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

     निवेदनावर अनिल नार्वेकर, ज्ञानदेव गुरव, शांताराम पाटील , श्रावण मस्कर आदींच्या सह्या आहेत.

आज लोकशाहीर द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ…
डॉ.पाटणकरांसह आम. सतेज पाटील उपस्थित राहणार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      लोकशाहीर द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार आज प्रतिभा शिंदे यांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमास डॉ. भारत पाटणकर आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर सभागृहात सदर कार्यक्रम दुपारी बारा वाजता आहे करण्यात आला आहे ची माहिती लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार व स्मारक समिती, आजरा यांच्या वतीने देण्यात आली आहे.

रस्ता की डर्ट ट्रॅक…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील भारत नगर येथे सर्वत्र चिखलाची साम्राज्य पसरले असून येथून वाहने नेण्याबरोबरच चालतानाही नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

      पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना ही परिस्थिती असल्याने पावसाळभर नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. किमान येथे मुरुम टाकून रस्ता चालण्यापुरता तरी तयार करावा अशी मागणी या भागातील शहरवासीय करत आहेत.

सृष्टी फोटो स्टुडिओ नव्या रूपात ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा शहरातील सुप्रसिद्ध सृष्टी फोटो स्टुडिओ नव्या रूपामध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाला असून नुकताच नवीन जागेत स्थलांतर कार्यक्रम पार पडला.

    नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांच्या हस्ते नूतन स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. वातानुकूलित सेवा असणारा हा आजरा शहरातील एकमेव स्टुडिओ आहे.

      उद्घाटन प्रसंगी मालक श्रीकांत देसाई, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, संभाजीराव पाटील, ॲड. धनंजय देसाई, युवराज पोवार, म्हाळसाकांत देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!