mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

साधनाताई : प्रभाग सहाच्या विकासाचे नवे पर्व

साधनाताई…
प्रभाग ६ मधील विकासाचे नवे पर्व

आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आजरा नगरपंचायत होऊन सात वर्ष झाल्यानंतरही प्रभाग सहाचा विकास खुंटला आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये नगरपंचायतीच्या एकूणच कारभाराबद्दल नाराजी दिसून येते. आगामी काळात हे चित्र बदलण्यासाठी साधना अमोल मुरुकटे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून साधना ताईंच्या रूपाने प्रभागांमध्ये नवे पर्व उदयास येत आहे

या पार्श्वभूमीवर बोलताना साधना अमोल मुरुकटे म्हणाल्या, आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून परिवर्तन विकास आघाडीतून हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. प्रभागाची प्राथमिक सुविधांअभावी झालेली दुरवस्था सत्तारुढांबाबत असणारी नाराजी यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सात-आठ वर्षांपूर्वी शहराला नगरपंचायत मंजूर झाली, त्यावेळी आमच्या खूप काही अपेक्षा होत्या. मात्र सात-आठ वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर अधिकच भकास झाले आहे. माझा प्रभाग ही त्याला अपवाद राहिलेला नाही. ज्यांनी माझ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी प्रभागाचा कोणताही विकास साधलेला नाही. गेल्या चार वर्षात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा मनस्ताप आम्हा महिला वर्गाला खूप मोठा सहन करावा लागतो. नेहमीच अपुरे पाणी मिळत आले आहे. पाणीही म्हणावे तेवढे चांगले नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मात्र याकडे हेतू पुरस्कार कानाडोळा करण्यात आला. पाणी योजनेच्या नावाखाली रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे धड रस्तेही प्रभागात उपलब्ध नाहीत. रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. सगळेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामुळे धुळीचा देखील मोठा त्रास साऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रभागातील जनता अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. चांगले आरोग्य नाही की दर्जेदार शिक्षण नाही. शहराला नैसर्गिक सौंदर्य असताना देखील कोठेही बाग-बगीच्या निर्माण झाला नाही. कचऱ्याचा प्रश्न तर कायमचाच आहे. कचऱ्याचा वेळेवर उठाव होत नाही. कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया केली जात नाही. यामुळे प्रदूषण देखील वाढले आहे. तसेच शहरात विस्कटून पडलेला कचरा दिसला की मनाला खूपच वाईट वाटते. प्रभागात गटर्स देखील व्यवस्थित नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. प्रभागाचे हे सारे चित्र बदलण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. प्रभागाला नवी दिशा देण्यासाठी आपण सारे जण माझ्या पाठीशी राहाल असा विश्वास आहे.

आगामी काळात नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी, सुव्यवस्थित रस्ते, सांडपाण्याची योग्य व्यवस्था, कचरा उठावाचे योग्य नियोजन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, प्रभागात उद्यान यासाठी काम करून प्रभाग सहा व शहराला एक नवी दिशा देण्यासाठी हात या चिन्हा समोरील बटन दाबून आपणाला संधी द्यावी अशी साधना मुरुकटे यांनी मतदारांना विनंती केली आहे.

संबंधित पोस्ट

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा छडा लागणार कधी….? ऐन निवडणूक तोंडावर सदर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा जनता बँक निवडणूक बिनविरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!