mrityunjaymahanews
कोल्हापूर

आजरा येथे विकास कामासाठी भरीव निधी: आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती

आजरा शहरातील गंगामाई वाचन मंदीराचे रुप पालटणार : आमदार प्रकाश आबिटकरनगरविकास विभागाकडून नगरपंचायत आजरा येथील विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

आजरा प्रतिनिधी :-

इचलकरंजी संस्थानचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी वाचनाचीच आवड असणाऱ्या आपल्या पत्नीच्या नावे गंगामाई वाचन मंदीराची स्थापना केली होती. या वाचन मंदीरातून लोकशाहीर द.ना.गव्हाणकर यांच्या सारखे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे साहित्यीक. मृत्युजंय, छावा, युगंधर अशा कादंबऱ्यातून संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या लेखणीतून भूरळ घालणारे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांसारखे नामवंत साहित्यीक याच गंगामाई वाचन मंदीरात घडले. समाजिक, सांस्कृतिक व साहित्यीक चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या गंगामाई वाचन मंदीरास 131 वर्षांची परंपरा असून आजरा शहराचे वैचारीक व्यासपीठ म्हणून या वाचन मंदीराची ओळख आहे. या वाचन मंदीराचे अध्ययावतीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी २.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आजरा शहाराच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन स्तरावर पाठपुरावा करून नगरविकास विभागाकडून आजरा शहरातील विविध विकास कामांकरीता नव्याने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये गंगामाई वाचन मंदीर इमारत परीसरासह सुशोभिकरण करणे २.५० कोटी मंजूर करण्यात आला असून यामध्ये सुसज्ज व अद्यावत असे वाचन मंदीर, सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच आजरा तालुका क्रीडा संकुलामध्ये सुधारणा करण्याकरिता १.५० कोटी मंजूर करण्यात आले असून खेळाडूंकरिता ४०० मिटर लांबीची अद्ययावत धावपट्टी निर्मिती करण्यात येणार असून जिल्ह्यातील अद्ययावत धावपट्टी आजरा येथे साकारण्यात येणार आहे. तसेच क्रिडांगणाच्या सुरक्षेकरीता संरक्षण भिंत बांधणे यासह आजरा शहरातील विविध विकास कामांकरीता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये अंतर्गत रस्ते, आर.सी.सी.गटर्स, बंधीस्त गटर्स, सामाजिक सभागृह, संरक्षण भींत, परिसर सुशोभिकरण इ. कामे करण्यात येणार आहेत.

तसेच यापूर्वी मंजूर केलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने आजरा शहरामध्ये नाट्यगृह बांधणे 3.35 कोटी, हिंदू समाजासाठी स्मशानभूमी बांधणे 20 लाख, जिजामाता कॉलनी येथील मशिदीजवळ संरक्षण भिंत बांधणे, व्यायामशाळा बांधणे 20 लक्ष, ख्रिश्चन समाजासाठी स्मशानभूमी बांधणे 10 लक्ष, शहरातील उद्यान विकसीत करणे 30 लक्ष यासह विविध कामांसाठी मिळून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.

आजरा शहाराच्या विकासाकरीता मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेबद्दल त्यांचे आभार आमदार आबिटकर यांनी मानले. सदर निधीसाठी आजऱ्याच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगसेवक यांनी पाठपुरावा केला आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याजवळ लक्झरी व तवेरा अपघातात दहा जखमी…अण्णाभाऊ सूतगिरणीच्या अध्यक्षपदी अन्नपूर्णा चराटी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

होण्याळी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता…आजरा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात…सोमवारी आजरा येथे शिवप्रेमींची बैठक

mrityunjay mahanews

गव्याच्या हल्ल्यात बुरुडे येथील दोघे जखमी… अंगणवाडी सेविकांविरोधात बदनामीकारक संदेश व्हायरल…आज-यात तीव्र संताप

mrityunjay mahanews
error: Content is protected !!