mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरगुन्हाठळक बातम्या

आजरा- चंदगड- गडहिंग्लज परिसर वृत्त

आजरा- चंदगड- गडहिंग्लज परिसर

वृत्त

 

 

चंदगड तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने छापा टाकून एमडी ड्रग्स बनवणारा कारखान्यातून तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या कांही दिवसापासून ढोलगरवाडी येथे सदर कारखाना सुरू होता. याची कुणकुण मुंबई येथील एका एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या महिलेची झडती घेतल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचला लागली. यातूनच सदर कारवाई झाली. यामध्ये निखिल रामचंद्र लोहार (वय २९ रा. ढोलगरवाडी) याच्यासह दोघांना अटक केली आहे. कारखान्याचा मालक राजकुमार अर्जुनराव राजहंस याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणाने गडहिंग्लज उपविभाग हादरून गेला आहे.

जुगार अड्डा -मटक्यावर छाप्याचे  सत्र सुरू

गडहिंग्लज- चंदगड भागामध्ये पोलिसांकडून मटका अड्ड्यावर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील डुक्‍करवाडी येथे मटका अड्ड्यावर छापा मारुन २०८२ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चंदगड येथील कुमार विद्यामंदिर समोर असणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २००२ रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. गडहिंग्लज येथील मार्केट यार्ड परिसरात कल्याण मटका घेताना पोलिसांनी दिड हजार रुपये व मटका घेण्याच्या साहित्यासह एकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

चंदगड जवळ चारचाकी अपघातात बेळगावचा तरुण ठार

चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील औद्योगिक वसाहतींच्या परिसरामध्ये चार चाकी वरील ताबा सुटून रवी गंगाराम लंगोटी (वय ३० रा. केदनूर बेळगाव) हा तरुण ठार झाला तर या अपघातामध्ये विनायक अनंत कंग्राळकर ज्योतिबा वसंत कोवाडकर जयेश बेमन्ना भोगूलकर (सर्व.रा.बेळगाव )हे तिघे जण जखमी झाले आहेत.

निंगुडगे येथे शुक्रवारी कार्तिक स्वामींची यात्रा

गडहिंग्लज ,आजरा व  चंदगड तालुक्यासह विविध भागातील भाविकांचे आकर्षण असणारी निंगुडगे येथे अमृतेश्वर मंदिरातील कार्तिक स्वामी दर्शन यात्रा शुक्रवार दिनांक १९ रोजी होत आहे . यात्रेसाठी निंगुडगे ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार वितरण २८ नोव्हेंबर रोजी

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्काराचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक वाहरू सोनवणे यांना पद्मश्री गणेश मुर्ती यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर रोजी महागोंड येथे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

आजरा परिसरात पावसाचा धुमाकूळ भातासह नाचणी पिक अडचणीत.ऊस तोडीतही व्यत्यय

आजरा शहरासह तालुक्याला बुधवारी रात्री जोरदार पावसाने झोडपले असून गेले आठवडाभर वारंवार लागणारी पावसाची जोरदार हजेरी तालुक्यातील भात व नाचणी उत्पादकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे सुगीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने धुमाकूळ घातल्याने सुगीवर पावसाचे सावट कायम आहे. ऊस तोडी वरही याचा परिणाम दिसत असून जोरदार पावसामुळे ऊस तोडणी यंत्रणा ठप्प होऊ लागली आहे. ऊस तोडणीस ह वाहतुकीमध्येही अडथळे येऊ लागले आहेत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!