mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार  दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४

अखेर सुधीर देसाई यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन के.पीं.ना पाठिंबा...

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी राष्ट्रवादी आजरा तालुका (अजितदादा पवार ) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना ( उ.बा.ठा. ) गटाचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या गवसे येथे झालेल्या मेळाव्यात घेतला आहे.

       मेळाव्यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबत जाण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजितदादा) अध्यक्षपदावरुन बाजूला होऊन या मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील यांचे काम करणार असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.

प्रशासनावर वचक ठेवून सर्वसामांन्यांचे प्रश्न सोडवण्यात अन्याय निवारण समिती बांधिल : परशुराम बामणे

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      नगरपंचायत करवाढीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अन्याय निवारण समितीने वर्षभरामध्ये सर्व सामान्यांन्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश मिळवले. अन्याय निवांत समितीचे एक वेगळे वलय तयार झाले असून यापुढेही सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास अन्याय निवारण समिती कटिबद्ध आहे असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी केले. गेल्या वर्षभरात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी समितीचे संस्थापक प्रा. डॉ. सुधीर मुंज व ॲड. शैलेश देशपांडे व उपस्थित होते.

     यावेळी परशुराम बामणे यांनी समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात कशा पद्धतीने काम करण्यात आले याची सविस्तर माहिती दिली. डॉ. सुधीर मुंज म्हणाले शहरवासीयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात सर्वसामान्यांना ते प्रश्न मार्गी लावण्याची कला अवगत नसल्याने त्यांची फरफट होत राहते अशावेळी समितीने पुढाकार घेऊन अनेक प्रश्न आपल्या हातघ घेतले व ते सोडवले. अन्याय निवारण समितीची आता प्रशासनावर चांगली पकड निर्माण झाली आहे.यापुढेही समितीच्या माध्यमातून नगरपंचायतीसह अन्य शासकीय कार्यालयामध्ये सुरू असणाऱ्या भोंगळ कारभारावर बचत बसवण्यासाठी प्रयत्न करावेत ,त्यासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले.

     ॲड. शैलेश देशपांडे म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी एकत्र येऊन निस्वार्थी भावनेने संघटनेचे काम करत आहेत. कोणत्याही अमिषाला बळी न पडता समितीचे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे.भविष्यात असेच विधायक कामाला प्राधान्य दिले जाईल त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी सी.डी. सरदेसाई , सुनील शिंदे, सुधीर कुंभार, ज्योतिप्रसाद सावंत,नाथा देसाई, विजय थोरवत, दयानंद भोपळे, आदींनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

      नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी पांडुरंग सावरतकर, वाय.बी. चव्हाण,जोतिबा आजगेकर जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण,दिनकर जाधव, रौनक कारेकर, राजू विभूते, गौरव देशपांडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

रेशनकार्ड E-KYC करण्यासाठी घेत असलेल्या रकमेबाबत मडिलगे ग्रामस्थ दक्षता कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मडिलगे ता. आजरा येथील भावेश्वरी स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्ड E-KYC करण्यासाठी रेशन कार्ड वरील प्रत्येक नावापोटी २० रुपये दर आकारून E-KYC करत असलेबाबत आजरा तहसीलदार यांना मडिलगे ग्रामस्थ व दक्षता कमिटी सदस्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
मौजे मडिलगे येथे शासनाकडून मिळणाऱ्या रेशनकार्ड धारकांची E-KYC करणे हे काम चालू आहे. पण सदर कामासाठी मानसी २०/- रुपये या प्रमाणे आकारणी संबधित दुकानदार ग्राहकाकडून घेतले जात आहे. असा कोणताही पैसे घेण्याबाबतचा शासन निर्णय नसतानाही गोरगरीब जनतेकडून लुट होत आहे.

       वारंवार दक्षता कमिटीने मासिक मिटिंग लावण्याची सूचना देवून सुद्धा दक्षता कमिटीची मिटिंग घेतली जात नाही व रेशन वाटप करण्याचा वेळ स्वतः च्या मनमानीने चालू आहे. ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये त्या दुकानदाराला E-KYC च्या पैशाच्या विषयी विचारले असता उद्घट उत्तरे देण्यात आली तरी सदर कामाची E-KYC मोफत करून मिळावी व ज्या रेशन धारकांकडून पैसे घेतले आहेत त्यांना पैसे परत मिळावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सचिन कातकर, विश्वजीत मुंज, बबन कातकर, नितीन कातकर सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

बाबुरावजींचा स्मृतिदिन उत्साहात


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पंडित दीनदयाळ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.बाबुरावजी कुंभार यांचा आठवा स्मृतिदिन पं.दीनदयाळ हायस्कूलमध्ये संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुधीर मुंज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

      या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.मलिककुमार बुरुड,संचालक श्री.भिकाजी पाटील, श्री.नाथा देसाई.नगरसेवक श्री.आनंदा कुंभार,डाॅ.सौ.स्मिता सुधीर कुंभार ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक श्री.मुकुंद कांबळे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन महागावकर,सदस्य श्री.सुरेश गुरव,श्री.रामदास मिसाळ तसेच श्री.गुरु गोवेकर, श्री.उदय चव्हाण,श्री.सुरेश सावंत, श्री.विनोद जाधव सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

आजऱ्यात आज ‘आजरा चॅम्पियन्स’ ट्रॉफी एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     प्रॅक्टिस क्लब,आजरा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आजरा चॅम्पियन ट्रॉफी – २०२४ या एक दिवशीय क्रिकेट स्पर्धेचे आज गुरुवार दिनांक ३१ रोजी आजरा क्रीडा संकुल, गांधीनगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती सतीश बामणे यांनी दिली आहे.

      स्पर्धेतील विजेत्या संघाला दहा हजार रुपये रोख व ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे बामणे यांनी सांगितले.

निधन वार्ता
केरबा घाटगे

          आजरा  : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

        मडिलगे ता.आजरा येथील केरबा हरी घाटगे यांचे दि. ३० रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. ते मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

       रक्षा विसर्जन दि ३१ रोजी सकाळी ९ वा. आहे.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

मुलाच्या हल्ल्यात वडिलांच्या निधनानंतर जखमी आईचेही निधन…

mrityunjay mahanews

बेलेवाडी घाटातील तो प्रकार हत्येचा कट… अखेर गूढ उकलले..दोघे ताब्यात

mrityunjay mahanews

कारखान्याची निवडणूक दणक्यात होणार… आजरा साखर कारखाना वार्षिक सभेत गोंधळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!