mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. २७ सप्टेबर २०२४


कायदेशीर बाबींची पूर्तता करून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करा : तहसीलदार समीर माने

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      नवरात्र उत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांनी मंडपासह विविध बाबींच्या कायदेशीर परवान्यांची पूर्तता करून उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन आजरा तहसीलदार समीर माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले.

      नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी मंडळांना विविध सूचना करण्यात आल्या.

    शक्यतो हुल्लडबाजीला फाटा देऊन विधायक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. उत्सव कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या मुर्त्यांच्या मंडप परिसरामध्ये उत्सवाच्या पावित्र्याला बाधा येईल असे कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी. दुर्गामाता आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे व उत्साहात हा सण साजरा करावा असेही यावेळी तहसीलदार माने व स.पो.नी. नागेश यमगर यांनी स्पष्ट केले.

    बैठकीस रवी तळेवाडीकर, गौरव देशपांडे, संदीप खवरे, किरण पोवार, ओंकार माद्याळकर, सूर्यकांत केसरकर, संजय माने यांच्यासह विविध मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते.

जनता सहकारी गृहतारण संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने मार्च २०२४ अखेर ८२ कोटी ८४ लाख १८ हजारांच्या ठेवी जमा केल्या असून संस्थेने ५८ कोटी ४१ लाख ९८ हजार इतके कर्ज वाटप केलेने संस्था विश्वास व पारदर्शक कारभाराचे द्योतकथय असल्याचे मत संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. गणपतराव आरळगुंडकर यांनी संस्थेच्या २३ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.

        संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ४३ लाख ९१ हजार ७३४ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लांभाश देण्यात आल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गणपतराव आरळगुंडकर यांनी सांगितले .

        स्वागत व प्रास्ताविक संस्था उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांनी करुन संस्थेच्या आजपर्यंतच्या सांपत्तीक स्थितीचा आढावा सभासदासमोर सादर केला. यावेळी सेवानिवृत्त, बढती मिळालेबद्दल व विविध  क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव  करण्यात आला. संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन मधुकर खवरे यांनी केले. श्री. बंडोपंत चव्हाण, संभाजीराव इंजल, हंबीरराव आडकूरकर, कृष्णा येसणे यांनी चर्चेत सभेत सहभाग घेतला.

      संस्था स्व-भांडवलावर सुरु असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरु आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. सभासदांनी यापुढिल काळातही सहकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांनी केले.

       सभेचे सुत्रसंचालन प्रा. विनायक चव्हाण व आभार डॉ. सौ. अंजनी देशपांडे यांनी मानले. यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, डॉ . अशोक बाचूळकर, प्रा. डॉ. तानाजी कावळे, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, प्रा.सौ. लता शेटे, प्रा. नेहा पेडणेकर उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर मधुकर खबरे व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखाचे चेअरमन, संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

दिनकर गुरव यांचे निधन


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      मडिलगे येथील माजी पं.स.सभापती श्री. भिकाजीराव गुरव  व व्यंकटराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व मडीलगेचे माजी सरपंच श्री. शिवाजीराव गुरव  यांचे बंधू कै.श्री.दिनकर(बापू) भिमा गुरव (वय ६३ वर्षे)  यांचे गुरुवारी रात्री  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार असून अंत्यविधी सकाळी दहा वाजता मडिलगे येथे होणार आहेत.

बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने  खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी विरोधात आज धरणे आंदोलन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जेव्हा सलग सुट्ट्या येतात अथवा सण येतात त्यावेळी  मोठ्या प्रमाणावर मुंबई- पुणेकर गावी जात असतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स धारक गाड्यांचे दर दुप्पटी तिप्पटीने वाढवतात. जे अतिशय चुकीचे आहे. थोडीफार वाढ सहन करणे ठीक आहे, परंतु जेव्हा हेच तिकीट दुप्पट किंवा तिप्पट वाढते त्यावेळी निश्चितच त्याचा भुर्दंड सर्व नागरिकांना बसत असतो. याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलेले आहे.

       बहुजन मुक्ती पार्टीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एनसीसी च्या वतीने आज-यात जागतिक नदी दिन साजरा..


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी तर्फे जागतिक नदी दिन साजरा करण्यात आला. यामध्ये आजरा शहराजवळील रामतीर्थ परिसर स्वच्छ करण्यात आला. एनसीसी कॅडेटच्या वतीने परिसरातील नागरिकांमध्ये नदी स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

      या उपक्रमास आजरा हायस्कूल, आजरा महाविद्यालय व व्यंकटराव हायस्कूलचे सर्व एनसीसी कॅडेट्स व अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन लेफ्टनंट- डॉ. संजय चव्हाण, सेकंड ऑफिसर महेश पाटील व सीटीओ एस.जी. नाईक यांनी केले. ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया यांचे मार्गदर्शन तर आजरा महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी.पी. संकपाळ तसेच आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. होलम उपमुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर आणि व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक  श्री. आर.जी.कुंभार उपमुख्याध्यापिका सौ. शेलार यांचे सहकार्य लाभले.

छाया वृत्त

        श्री राम विकास सेवा संस्था, गवसे या संस्थेचे अपघाती मयत सभासद स्व. विलास रामु पाटील यांचे वारसांना जिल्हा बँकेमार्फत जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये २ लाखाची विमा संरक्षित मंजूर रकमेचे पत्र जिल्हा बँक संचालक श्री. सुधीर देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

निवड…


      सौ. साधना एकनाथ जाधव यांची महिला आजरा तालुकाध्यक्ष रिपब्लिकन सेना पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुरेश दिवेकर यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
    ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969

 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!