mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा २८ ते ३० एप्रिल दरम्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथे शिवतीर्थावर उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा २८ ते ३० एप्रिल दरम्यान करण्याचे जनता बँक सभागृहात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

       पुतळा समिती व स्थानिक कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक पार पडली.यावेळी सदर कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापैकी जे कोणी उपलब्ध असतील त्यांना आमंत्रित करण्यांबरोबरच छत्रपती शिवरायांचे वंशज यांना आमंत्रित करण्याचे ठरले. तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

        या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध स्थानिक कमिट्या तयार करण्याचेही ठरले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पुतळा समिती अध्यक्ष बापू टोपले, विजयकुमार पाटील, विजय थोरवत, नाथा देसाई, संदीप पारळे, अभिषेक रोडगी महेश दळवी, श्रीपाद कुलकर्णी,  मारुती मोरे, परशुराम बामणे, जितेंद्र शेलार, बंडोपंत चव्हाण, मंगेश आजरेकर, अनिरुद्ध केसरकर,राजू विभूते आदींनी भाग घेतला व विविध सूचना केल्या.

      कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत नेटका व चांगला करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन मुकुंदराव देसाई यांनी केले.

आजरा अर्बनकडे गुढी पाडव्यानिमित्त १२कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा : अध्यक्ष चराटी यांची माहिती

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल १२ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी दिली.

      सध्या बँकेकडे १०१९ कोटी ७९ लाख रूपयांच्या ठेवी व ६४९ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जे आहेत. त्याबाबत अध्यक्ष चराटी यांच्यासह व्हा.चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मलिग्रे येथे भावेश्वरी मंदिर पायाभरणी शुभारंभ उत्साहात संपन्न…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे ता.आजरा येथील श्री भावेश्वरी या मंदिराचा पाया भरणीचा सोहळा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने संपन्न झाला.

      यापूर्वी रवळनाथ, मल्लिकार्जून, हनुमान , चाळोबा, महादेव गावातील व डोंगरावरील मंदिरांचा, जिर्णोद्धार लोक सहभागाने करण्यात आला आहे. परंतू गावची पांढरी म्हणून ओळखले जाणारे भावेश्वरी देवाचे जुन्या झालेल्या व मागे राहिलेल्या मंदिराचा पुर्नबांधणी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. गावातील माता भगिनी कलश घेऊन शोभा यात्रेने सहभागी झाल्या.

      यावेळी सरपंच शारदा गुरव, उपसरपंच चाळू केंगारे, माझी सरपंच समिर पारदे, दत्ता परिट , शंकर बुगडे, पांडूरंग नेसरीकर, राजू पारदे,बसवंत जाधव सुभाना बुगडे, मारूती ईक्के, नाना नेसरीकर, ऊतम पारदे, विष्णू आसबे याच्या सह वारकरी भजनी मंडळ, श्री भावेश्वरी जिर्णोदार समिती , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कै.रवी शेंडे पुरोगामी चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, आजरा यांच्या वतीने कै.रवी शेंडे पुरोगामी चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे.

        छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आजरा येथे या स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रकमेसह इतर अनेक वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत.

जागतिक जल दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात व्याख्यान…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र भूगोल विभाग पृथ्वी ग्रीन क्लब विज्ञान आणि पर्यावरण मंडळ व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून भारताचे जलतज्ञ रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह राणा यांचे ‘जल संरक्षण, जल संवर्धन व जलसंधारण’ या विषयावरील त्यांच्या व्याख्यानाचे विविध व्हिडिओ दाखवून त्याच्यावर विद्यार्थ्यांची चर्चा करण्यात आली.

      याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी जलदूत बनवून जलसंस्कृती द्वारे जल, जंगल व जमीन यांचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मलिकार्जुन शिंत्रे तर स्वागत डॉ. शिवानंद गजरे व सूत्रसंचालन डॉ. रणजीत पवार यांनी व आभार प्रा.तेजस्विनी जाधव यांनी केले.

      याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक श्री.योगेश पाटील,
डॉ.राम मधाळे,महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यंकटराव प्राथ. वि.मं.चे राज्यस्तरीय ऋणानुबंध टॅलेंट सर्च प्रज्ञा शोध परीक्षेत यश…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      व्यंकटराव प्राथ. वि.मं.चे राज्यस्तरीय ऋणानुबंध टॅलेंट सर्च प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविले. पहिली ते चौथी चे अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हा, राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत अव्वल आले आहेत. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे…

इ. पहिली-

( एकूण विध्यार्थी- १४ )

अविराज दयानंद पाटील, राज्यात पहिला ( १०० पैकी १०० गुण),राजवीर युवराज पोवार, राज्यात तिसरा ( १०० पैकी ९६ गुण),रितुल विवेक चव्हाण – ९२ जिल्ह्यात दुसरा,वरद एकनाथ वंजारे – जिल्ह्यात दुसरा ,स्वराली हणमंत गजरकर – ९२,जिल्ह्यात दुसरी,अन्विता अजित चौगुले – ९२,जिल्ह्यात तिसरी,कनिष्क कुणाल पोतदार – ९० जिल्ह्यात तिसरा, वेणू सचिन इंजल -८८, तालुका प्रथम ,जन्नत जाफर माणगावकर – ८०, स्वराज नितीन गुडूळकर – ७६,प्रन्वी प्रसाद कुंभार -७२ ,फैज नैमुदिन शेख – ७२,
अहद तौसिफ़ तगारे – ६९

इ.दुसरी-

 ( एकूण विध्यार्थी- १४ )

ज्ञाना विलास गवारी ९६,राज्यात तिसरी,
राजनंदिनी सचिन इंदुलकर -९४,,जिल्ह्यात पहिली ,रुद्र विजय कोळी – ९२ जिल्ह्यात दुसरा, मनस्वी मनोज पंडित – ९०,जिल्ह्यात दुसरी ,उर्विता विक्रम देसाई – ८८,तालुका प्रथम,उत्कर्षा अमोल सुतार – ८४,तालुका तिसरी ,काव्या जयदीप दोरूगडे – ८४,तालुका तिसरी, रणवीर रणजित डोंगरे – ८२,हिंदवी विकास सुतार – ८२,सिद्धार्थ अशोक कांबळे – ७८,विहान वसंत मस्कर – ७०,आरोही सुभाष पाटील – ६६,आनस आक्रम मुल्ला – ६२,हर्ष श्रीरंग गजरकर – ६२,

इ.तिसरी-

(एकूण विध्यार्थी ९)

सर्व तालुका स्तरीय गुणवंत दियती धीरज सणगर – १५४,केतकी रामदास होरटे- १५०,स्वराज धीरज सणगर- १४८,विहान सुरज जाधव-१४२,ज्ञानेश अभिजित इंजल- १४०,संचिता संतोष राणे-१४०,
अनन्या युवराज माडभगत- १३२,विठ्ठल नारायण पाष्टे-१२६,देविका श्रीकांत देसाई- १२२,

इ.चौथी-

( एकूण विध्यार्थी ६)

स्वरा मोहन मोटे – १६४,शौर्य जीवन आजगेकर- १५४,रुही राहुल गुडूळकर-१४६,राजवीर दयानंद पाटील- ११८,विराज संजयकुमार पाटील- ११८,
मस्टफिज अमित खेडेकर- ६६,

      या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना,
आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे, अध्यक्ष जयवंतराव शिंपी तसेच सर्व संचालक मंडळ, व मुख्याध्यापिका एस.पी. चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले. शिक्षक.एस. पी. चव्हाण ,एम. के. खोत ,एन. सी. हरेर ,एन. आर. हसबे, आर. व्ही. देसाई,एल. पी. कुंभार,आर. एच. गजरकर,डी. एस. बी. डेळेकर ,एम. वी. सावंत यांनी मार्गदर्शन केले.

सर्वस्वी पाटील हिचे यश

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महावाचन चळवळीमध्ये पंडित दीनदयाळ विद्यालयातील विद्यार्थिनी कु.सर्वस्वी सचिन पाटील हिचा तालुक्यामध्ये व्दितीय क्रमांक आला.

      शुभांगी निर्मळे यांचे तिला मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक श्री.संजीव देसाई, संस्थेचे चेअरमन डाॅ.सुधीर मुंज,सचिव श्री.मलिककुमार बुरुड ,सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

यात्रेच्या पहिल्या दिवशीच पाटील कुटुंबियावर कोसळला दुःखाचा डोंगर…

mrityunjay mahanews

मसोली-रायवाडा परिसरात बिबट्याचा वावर…

mrityunjay mahanews

गडहिंग्लज आजरा चंदगड परिसर वृत्त –मसोली येथे गव्यांचा धुमाकूळ, आवंडी धनगर वाड्यावर बिबट्याचा शेळीवर हल्ला व इतर बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!