रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:
महसुलमध्ये खळबळ
कोल्हापुर:प्रतिनिधी
हातकणंगले येथील रमेश दगडू राठोड (महसुल सहायक,वर्ग -३ ,तहसीलदार कार्यालय, हातकणंगले) याला
तक्रारदार यांची वर्ग २ ची जमिन १ करणेकरिता इनामी जमीन नसलेबाबतचा शेरा देणेकरिता तक्रारदार यांचेकडे तीन हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. तडजोडी अंती २५००/- रूपये मागणी करून ती रक्कम स्वीकारताना त्याना रंगेहाथ पकडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. पुणे,
सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.पूणे
सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली
सतीश मोरे, पोलीस निरीक्षक,
सहा. फौजदार संजीव बम्बर्गेकर,
सुनिल घोसाळकर,
नवनाथ कदम,
कृष्णात पाटील आदींनी या कारवाईत भाग घेतला.

