अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मुंबई भाजपाकडून दहन.
मुंबई :- प्रतिनिधी
मुंबई भाजपाकडून नरिमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसरात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केली.
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मंत्री नवाब मलिक यांच्यासह आघाडी सरकारमधिल मंत्र्याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसर दणाणून सोडला.मंगलजी म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर मंत्री नवाब मलिक बिनबुडाचे आरोप करत आहेत. अशी टीका लोढा यांनी केली.यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडल अध्यक्ष नितीन बनकर तसेच इतर भाजपा नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

