पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद.
आजरा:विशेष प्रतिनिधी
आजरा येथे पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांवर आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये योगेश ईराण्णा पाटील ( वय ३२ रा.आजरा), आशिष रमेश सावंत (वय. ३२ रा. आजरा) तसेच मल्लिकार्जुन गंगाधर पट्टणशेट्टी (वय २९ रा. संकेश्वर) या तिघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आजरा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज जाधव व प्रशांत पाटील आणि प्रशांत चौधरी हे दोन पोलिस कर्मचारी
मंगळवार दि. ९ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास आजरा येथील एच.डी.एफ.सी बँकेचे समोरील वाहतुकीची झालेली कोंडी दूर करण्यामध्ये व्यस्त होते. दरम्यान वरील तिघेजण एका मोटरसायकल वरून जात असताना या तिघाना उपनिरीक्षक जाधव व पोलीस कर्मचा-यानी थांबण्यास सांगितले.यावेळी तिघांनी त्यांच्यासोबत वाद घालत धक्काबुक्की करून मारहाण केली.यावेळी संबंधीत पोलिस कर्मचारी त्यांना आपले ओळखपत्रही दाखवत होते असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची रीतसर फिर्याद पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी आजरा पोलिसात दिली असून या तिघांविरुद्ध आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास स.पो.नि. सुनिल हारुगडे करीत आहेत.


पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद.