सोमवार दि. १४ जुलै २०२५


अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे : ना. हसन मुश्रीफ
आजऱ्यात गोकुळच्या दूध संस्था प्रतिनिधींचा
मेळावा उत्साहात

दूध व जनावरांच्या प्रश्नांबरोबरच अनेक प्रश्नांची जाण असणारे रविंद्र आपटे यांचे गोकुळच्या वाटचालीत मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात श्रीमती पद्मजा आपटे व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालवला आहे त्यांच्या पश्चात आपटे वहिनींना एकाकी सोडणार नाही.जिल्ह्यातील नेत्यांशी बोलून घेतल्यानंतरच त्यांच्या गोकुळच्या उमेदवारीबाबत भाष्य करणे उचित होईल. अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. असे सूचक विधान करत वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी करत गोकुळच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
माजी अध्यक्ष रविंद्र आपटे समर्थक दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा व नूतन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्मजा रविंद्र आपटे होत्या. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांनी श्रीमती आपटे यांच्या उमेदवारीचा मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आग्रह धरला हाच धागा पकडत मंत्री मुश्रीफ बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका संघाचे संचालक संजय शेणगावे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात नामदेव नार्वेकर म्हणाले, यापुढे रविंद्र आपटे यांच्या पश्चात नामदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. रविंद्र आपटे, ना. हसन मुश्रीफ यांचा वसा नूतन अध्यक्ष नाविद मुश्रीफ निश्चितच चालवतील असा विश्वास व्यक्त करत रविंद्र आपटे यांच्या कामाची पोहोच म्हणून येत्या निवडणूकीत पद्मजा आपटे यांना गोकुळमध्ये संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळचे दूध संकलन २५ लाख लिटरपर्यंत जावे यासाठी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य निश्चित करून दूध संस्था व साखर कारखाना या ग्रामीण भागातील आर्थिक वाहिन्या आहेत. आजरा साखर कारखाना इको सेन्सिटीव्ह झोनमधून बाहेर काढण्यात प्रसंगी कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. डिस्टलरी व को-जनरेशन कारखान्याच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी सर्व पातळीवर आपण प्रयत्नशील आहोत. महामार्गाचे काम पूर्णत्वास गेल्याने प्रतिदिन ५ हजार मे.टन गाळप कसे होईल याकिरता संचालक मंडळाशी वेळोवेळी चर्चा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे नूतन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नाविद मुश्रीफ यांनी महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम गोकुळने केले असून भविष्यात संघाची वाटचाल आणखी यशस्वी करण्यासाठी सर्व संचालकांनी सोबत घेऊन प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी राजू होलम, अल्बर्ट डिसोझा, सचिन उत्तूरकर, अजिंक्य आपटे, श्रीमती पद्मजा आपटे यांचीही मनोगते झाली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तालुका संघाचे अध्यक्ष महादेवराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, विठ्ठलराव देसाई, राजू मुरकुटे, माजी सभापती सौ.रचना होलम, अंकुश पाटील, आनंद घाटगे, दिगंबर देसाई, रोहित नार्वेकर, दशरथ होलम, शंकर पावले, दशराज आजगेकर, सौ.प्रियांका जाधव, एम.डी. सावंत , विजय देसाई, जी. एम. पाटील, संभाजी पाटील (हत्तीवडे), पांडूतात्या देसाई, शंकर पावले, आनंदराव कुलकर्णी, के. व्ही. येसणे, जम्बो गोरुले,आनंदा घाटगे यांच्यासह विविध दुध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बुकिंग झाले…
गोकुळच्या रेल्वेचे बुकिंग आठ महिने आधीच करण्यात आले आहे. त्यामुळे आता बुकिंग झाले आहे, पुढचे बघू असे ठराव धारकांना उद्देशून मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांच्या विश्वासावर जनता बँकेची घौडदौड : अध्यक्ष मुकुंदराव देसाई
बँकेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्व सामान्यांचे हित, सेवाभावी वृत्ती, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून बँक समाजाशी नाळ जोडून आहे. बँकेवर असणारा सर्वसामान्यांचा विश्वास सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्मचारी, सहकारी संचालक यांच्या सहकार्याने बँकेच्या प्रगतीची घौडदौड सुरु असून बँकेला ३ कोटी २६ लाख ७५ हजार इतका निव्वळ नफा झाला आहे. असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले.
येथील दुरदुंडेश्वर कार्यालयात जनता बँक, आजराची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात झाली. बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष अमित सामंत यासह संचालक उपस्थित होते.
संचालक रणजीत देसाई यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार झाला. विशेष व्यवसाय केलेल्या व ठेव संकलनात विशेष काम केलेल्या शाखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. अध्यक्ष श्री. देसाई यांनी स्वागत केले. ते म्हणाले, यंदा बँकेच्या व्यवसायामधे ८२ कोटी इतकी वाढ होवून ६६९ कोटी पर्यत व्यवसाय पोहचला आहे. बँकेच्या प्रगतीमधे सभासद व ठेवीदार यांचा सिंहाचा वाटा आहे.

ठेवी संकलनात विशेष काम केलेल्या शाखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. अध्यक्ष श्री. देसाई यांनी स्वागत केले. ते म्हणाले, यंदा बँकेच्या व्यवसायामधे ८२ कोटी इतकी वाढ होवून ६६९ कोटी पर्यंत व्यवसाय पोहचला आहे. बँकेच्या प्रगतीमधे सभासद व ठेवीदार यांचा सिंहाचा वाटा आहे, आज जनता बँक ही आदर्श सहकारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. याचे सारे श्रेय सभासद, ठेवीदारांना जाते. याची जाणीव सर्व संचालकांना आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी अहवाल, आर्थिक पत्रके, ताळेबंद व नफा तोटा पत्रकांचे वाचन केले. आर्थिक पत्रकावर तानाजी देसाई यांनी प्रश्न विचारले व सूचना केली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष श्री. देसाई, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी उत्तरे दिली.
सभेस महादेव टोपले, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, शशिकांत नार्वेकर, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई,सौ. रेखा देसाई,सौ. नंदा केसरकर, महेश कांबळे, पाडुरंग तोरगले, सचिव यांच्यासह संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तर संचालक संतोष पाटील यांनी आभार मानले.

रवळनाथ संस्था समुहातर्फे काळभैरी डोंगर परिसरात वृक्षारोपण

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त येथील रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी, ज्ञानदीप प्रबोधिनी व श्री महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी, गडहिंग्लज या श्री रवळनाथ संस्था समुहामार्फत डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन संचलित ‘चांगुलपणाची चळवळ’ अंतर्गत गडहिंग्लज येथील काळभैरी डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. श्री रवळनाथ संस्था समुहाचे प्रमुख श्री. एम. एल. चौगुले यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला. गडहिंग्लज वनविभागाचे निवृत्त अधिकारी श्री. डी. बी. काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीपासून मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन आवश्यक असल्याचे श्री. एम. एल. चौगुले यांनी यावेळी सांगितले.
संचालक प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील म्हणाले, वृक्षवल्ली हेच आपले सगेसोयरे आहेत असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, त्याची प्रचिती आपल्याला आज जाणवते. त्यामुळे आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्यामुळे रवळनाथतर्फे हा उपक्रम राबविला जातो.
याप्रसंगी काळभैरी डोंगर परिसरात अर्जुन, आवळा, माहारुप, आपटा, बहावा, वड, पिंपळ, करंज, कडूलिंब, पाटल या जातीची ५० झाडे लावण्यात आली. वनसंवर्धनासाठी सेवानिवृत्तीनंतर देखील सक्रीय कार्यरत असलेले श्री. डी. बी. काटकर यांचा श्री रवळनाथ संस्था समुहातर्फे श्री. एम. एल. चौगुले यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. संचालक प्राचार्य एस. एन. देसाई यांनी आभार मानले.
यावेळी रवळनाथचे संचालक श्री. महेश मजती, प्रा. डॉ. मनोहर पुजारी, महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या मानद सचिव गौरी बेळगुद्री यांच्यासह रवळनाथ संस्था समुहातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भोसले बंधूंच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले यांच्या परिवारामार्फत रुग्णवाहिकेचे वीर शिवा काशीद यांच्या जयंतीच्या औचित्य साधून काल समारंभ पूर्वक लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले, देव पाचवडेकर, विलास नाईक, अनिकेत चराटी, सागर पाचवडेकर, बाळासाहेब पाचवडेकर, कृष्णा यादव, आकाश शिंदे, सतीश शिंदे, तातुअण्णा बटकडली, ऋषिकेश भोसले, कुणाल भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्यांसाठी २४ तास सदर रुग्णवाहीका उपलब्ध असेल असे यावेळी गौतम भोसले यांनी सांगितले.

१० एचपीच्या कृषी पंपासाठी सवलत मिळावी…
सरपंच परिषदेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडून शेतकऱ्यांसाठी साडेसात एच. पी. च्या कृषी पंपासाठी सर्वत्र विद्युत सवलत देण्यात आली आहे. परंतु आजरा, चंदगड, राधानगरी आणि भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या तालुक्यांचा विचार करता येथील भौगोलिक परिस्थिती फार विपरीत आहे. नदीपात्रातील पाणी शेतापर्यंत नेताना जादा हॉर्स पॉवरच्या कृषीपंपांची गरज भासते. त्यामुळे या तालुक्यामधून ७.५ एच पी. च्या पंपाने गरज भागत असली तरी शेतापर्यंत पाणी पोहचत नसलेने तांत्रिक बाबींमुळे १० एच. पी. पंप बसवणे शेतकऱ्यांना अनिवार्य बनले आहे.
त्यामुळे ७.५ एच. पी. च्या अटीमुळे शेतकऱ्यांना या वीजसवलतीच्या योजनेचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे १० एच. पी. च्या कृषी पंपासाठही ७.५ एच. पी. प्रमाणे विद्युत सवलत योजनेचा लाभ मिळावा असे निवेदन वीज वितरण कंपनीचे अधिकारी व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना आजरा तालुका सरपंच परिषद मुंबई यांनी दिले आहे.
यावेळी सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजऱ्यात वीर शिवा काशिद जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे वीर शिवाजी काशीद जयंती सोहळा उत्साहात पार पडला.
आजरा तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष, गौतम भोसले,उपाध्यक्ष, देव पाचवडेकर श्री. अभिषेक शिंपी, श्री. विलास नाईक, श्री अनिकेत चराटी, श्री. अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर, श्री. बाळासाहेब पाचवडेकर,श्री. रामचंद्र शिंदे, श्री. अशोक पाचवडेकर, श्री. आनंदा इंगळे, श्री. दत्ता पोवार, श्री. कृष्णा यादव, श्री. रामा पाचवडेकर, श्री. संजय पाचवडेकर श्री.सागर पाचवडेकर, श्री. संजय यादव, श्री. प्रकाश यादव, श्री. आकाश शिंदे उपस्थित होते.

महाराष्ट्र टॅलेंट सर्च [एमटीएस ] परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नौरोजी वाडिया कॉलेज,पुणे यांचे मार्फत एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या तब्बल १८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. राज्य,जिल्हा,तालुका,विशेष प्राविण्य व प्रशस्तीपत्रधारक विद्यार्थी अशा सर्वच गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे…
दळवी कार्तिक रमेश राज्यात ३ रा, गिरी आयुष ओंकार जिल्ह्यात पहिला,
पुंडपळ सौश्रुती अमित जिल्ह्यात दुसरी, जावळे विभावरी विक्रम जिल्ह्यात तिसरी,
निंबाळकर स्वराज प्रवीण जिल्ह्यात तिसरा ,कांबळे सुमेध दशरथ, जिल्ह्यात चौथा, तेजम संस्कार संजय जिल्ह्यात सहावा, पाटील विवेक धनाजी, जिल्ह्यात सहावा, चौगुले सानवी लक्ष्मण,गुरव रुद्र विशाल यांना विशेष पारितोषिक तर भिकले सृष्टी सुनील तालुकास्तरीय प्रथम, कांबळे आर्या अशोक उत्तेजनार्थ
प्रमाणपत्रधारक विद्यार्थी…
हरमळकर ध्रुव राजाराम ,जाधव राजवीर सुरज, इलगे संस्कृती धनाजी ,हरेर तेज किरण,सय्यद हाजीक मोहम्मद इरफान ,गुरव आस्था सचिन
या विद्यार्थ्यांना सौ.ए.डी.पाटील, श्री. पी.एस.गुरव, श्री.व्ही.ए.चौगुले, सौ.एम.व्ही.बिल्ले, सौ. ए. एस. गुरव, श्री पी. व्ही. पाटील, श्री के. बी. खोत, श्रीमती एस.टी.पाटील (विभाग प्रमुख) यांचे मार्गदर्शन लाभले.






