mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दिनांक ४ नोव्हेंबर २०२४

गतिमंद महिलेवर अत्याचार…
अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गडहिंग्लज तालुक्यातून आजरा तालुक्याच्या पूर्व  भागातील एका गावामध्ये दीपावली निमित्त मामाच्या घरी आईसोबत आलेल्या ४३ वर्षीय गतीमंद महिलेवर अज्ञाताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

       याबाबत पीडित महिलेच्या मामेभावाने आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सदर घटना घडली.

     पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.

चंदगड मध्ये तुतारी तर राधानगरीत मशालीला पाठिंबा

विष्णुपंत केसरकर यांची दिशा स्पष्ट


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ .नंदाताई बाबुळकर यांना तर आजरा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आजरा पंचायत समितीचे माजी सभापती व आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णूपंत केसरकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे केसरकर यांची दिशा स्पष्ट झाली आहे.

       यावेळी बोलतांना विष्णूपंत केसरकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला मात्र त्याचे खूप परिणाम भोगावे लागले यामुळे यावेळी निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घ्यायचे ठरविले.पक्ष फुटले आहेत.पक्षांची भाऊगर्दी झाली आहे.बंडखोरीही वाढण्याची शक्यता आहे.अशावेळी योग्य निर्णयाची गरज आहे.जिल्हा परिषद सदस्य होण्याची आपली इच्छा असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

       रस्ते,गटारी,लाडकी बहिण योजना म्हणजे विकास नव्हे.महागाई वाढली त्याकडे सरकारचे लक्ष नाही. काॅंग्रेसने जनताभिमुख कारभार केला तर युती शासनाच्या काळात कमिशन घेऊन लोकप्रतिनिधींनी आपला विकास साधला.आता एका पक्षाचे निष्ठेने काम करण्याची गरज असून महाविकास आघाडी सोबत जाण्याचा सल्लाही कार्यकर्त्यांनी दिला. जिल्हा परिषद निवडणूक मध्ये कोणत्याही परिस्थितीत केसरकर यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

       सुरेश बुगडे, सदानंद देसाई, विठ्ठल चव्हाण, संभाजी गडकरी,महेश पाटील, पंडीत पाटील, धनाजी बुगडे, विलास जोशिलकर,राजू होलम यांनी मत व्यक्त केले.

      उदय जोशी म्हणाले, केसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय बळ देणारा आहे. स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या दूरदृष्टी मुळे तालुक्याचा विकास झाला आहे.यावेळच्या उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.या भागाचा विकास करणे हे त्यांचे स्वप्न आहे.ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीर रहावे असे आवाहन केले.

       मुकुंद देसाई म्हणाले,स्व.बळिराम देसाई यांचे केसरकर मानसपुत्र आहेत.परममित्राच्या नादात केसरकर यांना कारखाना निवडणूकीत डावलण्याची एक वेळ चूक झाली. मतमतांतर जरुर होते मात्र केसरकर यांचे संबंध कधीच तोडले नाही.राष्ट्रवादी विभागणी नंतर आमच्यातील कांही मंडळी निष्ठा व तत्वे गुंडाळून बाहेर पडली.त्याचे नुकसान त्यांना दिसून येईल.

       या बैठकीला आप्पासाहेब बुगडे, गणपतराव कानडे, डॉक्टर खवरे,मारुती मयेकर, संभाजी चव्हाण, तानाजी पताडे, दयानंद नाईक, नारायण केसरकर, मारुती जाधव, चंद्रकांत कातकर, एकनाथ बामणे विश्वास गाईंगडे, शिवाजीराव देसाई, उत्तम देसाई, बाळासाहेब घेवडे, मारुती दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ८ कोटी ३५ लाखाच्या ठेवी जमा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल ८ कोटी ३५ लाख ३४ हजार रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्‌या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे ९४९ कोटी ९८ लाख रुप्याच्या ठेवी य ६१९ कोटी २१ लाख रुपये कर्जे आहेत, त्याबाबत बँकेचे संचालक व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी, बँकेचे चेअरमन श्री. रमेशअण्णा कुरुणकर, व्हा. चेअरमन श्री. सुनिल मगदुम व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 

संत निरंकारी मिशन चाफवडे तर्फे दिवाळी निमित्त मिठाई वाटप


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      नविन चाफवडे येथे संत निरंकारी मिशन चाफवडे तर्फे प्रत्येक घरी जावून दिवाळी निमित्त मिठाई वाटप व प्रत्येक घरी ‘देवाची ओळख ‘ या अध्यात्मिक पुस्तकाचे वाटप करण्यात आले. समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा, देव व अध्यात्म यावरील विश्वास दृढ होवून समाजामध्ये प्रेम भावना वाढावी. मानवता हाच खरा धर्म असून आपण प्रत्येकाने माणूसकी जपावी हाच त्यामागील उद्देश आहे.

       या उपक्रमामध्ये  पांडुरंग धडाम, राजू घुरे, विजय पाटील, प्रकाश मस्कर, जानबा देवलकर, नारायण सुपल, विष्णू चव्हाण, जानबा‌ धडाम, नारायण देवलकर, तुकाराम समगीस्कर, राजाराम सुपल, सुनिल धडाम, नवनाथ मांजरेकर, महेश धडाम, अभिषेक धडाम आदिंनी सहभाग घेतला.

कुरणीतील ग्रामस्थांसह मंडळांचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा

           चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना कुरणी येथील ग्रामस्थ, युवक, आणि महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. श्री रवळनाथ महिला भजनी मंडळाच्या प्रमुख आणि सदस्यांसह तसेच युवक मंडळाने शिवाजीराव पाटील यांची कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.

महिला भजनी मंडळाचा सक्रिय सहभाग

     श्री रवळनाथ महिला भजनी मंडळाच्या मेघा अनिल जाधव, वनिता विजय गावडे, अनिता अर्जुन पाटील, अर्चना अनंत केरकर, निता ज्ञानेश्वर केरकर, आणि चांगुणा शिवाजी गावडे यांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी भेट घेऊन त्यांना चंदगड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. महिलांनी समाजातील योगदानावर चर्चा केली आणि पाटील यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त केला .

     युवक मंडळातील प्रमुख सदस्य राजेंद्र जोतिबा गावडे, अनंत तानाजी केरकर, अशोक पावणोजी गावडे, संतोष रवळू पाटील, ठाणू रघुनाथ पाटील, रविंद्र लाड, विठ्ठल पाटील, अनिकेत पाटील, गणपत पाटील, आणि प्रकाश केरकर यांनी एकत्रितपणे शिवाजीराव पाटील यांना समर्थन देण्याचा निर्धार केला. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यात ग्रामीण विकास, शिक्षण, आणि युवक सक्षमीकरणाला विशेष महत्त्व दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     शिवाजीराव पाटील यांनी कुरणीतील युवक आणि महिलांना धन्यवाद देत त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले आणि चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी युवकांच्या योगदानाची भूमिका निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन केले.

आम.आबिटकर यांना पाठिंबा

     राधानगरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       तारळे खुर्द, ता.राधानगरी येथील एस.बी.पौंडकर व श्री.वसंतराव पाटील गटाने राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये गेली १० वर्षामध्ये केलेल्या विकास कामांच्यामुळे आम. प्रकाश आबिटकर यांना पाठींबा दिला.

        तारळे खुर्द गावातील अनेक विकास कामे मार्गी लावलेली असून यापुढे ही गावातील विकास कामांना भरीव निधी देणार असल्याची ग्वाही दिली.

        यावेळी सदाशिव पौंडकर, शिवाजीराव पाटील, बाबुराव पाटील, गणपती गायकवाड, विश्वास पाटील, सरपंच युवराज पौंडकर, युवराज किरोळकर, शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, बाजीराव कांबळे, वसंत चौगले, अभिजित पाटील, अभिजित गायकवाड, अनिल पाटील, बंडोपंत पौंडकर, अक्षय पाटील, उदय पाटील, शिवाजी मगदूम, केरबा चौगले, संजय बोचाटे, बाजीराव पाटील, अनिल पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकामध्ये चराटी- शिंपी गटाचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मसोली-रायवाडा परिसरात बिबट्याचा वावर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!