



पावसामुळे घराची भिंत कोसळली…
महिलेसह चार जनावरे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे ता. आजरा येथे पावसामुळे घराची भिंत गोठ्यावर कोसळून सौ. भारती संजय भाटले (वय ५२ वर्षे) यांच्यासह घराशेजारी असणाऱ्या गोठ्यातील चार जनावरे जखमी झाली आहेत. रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संजय रामू भाटले यांच्या राहत्या घराशेजारी पडवी/गोठ्यामध्ये जनावरे बांधली होती. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सौ. भारती या दूध काढण्यासाठी गोठ्यामध्ये गेल्या असता अचानकपणे घराची भिंत कोसळली भिंतीखाली सौ. भारती अडकल्या. दरम्यान घरच्यांनी व आजूबाजूच्या नागरिकांनी सौ. भारती या नेमक्या गेल्या कुठे म्हणून शोध सुरू केला. त्या कुठेही न आढळल्याने स्थानिक नागरिकांनी पडलेल्या भिंतीचे साहित्य बाजूला करण्यास सुरुवात केली असता सुरुवात केली भिंतीच्या ढिगार्याखाली जखमी अवस्थेत त्या आढळून आल्या. तातडीने स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमध्ये जनावरे देखील जखमी झाली आहेत.




