mrityunjaymahanews
अन्य

रामतीर्थ यात्रेसाठी मुस्लिम बांधवही सरसावले… यात्रेला परवानगीची मागणी

रामतीर्थ यात्रेसाठी मुस्लिम बांधवही सरसावले… यात्रा घेण्याची तहसिलदाराकडे मागणी

 

आजरा येथील रामतीर्थ यात्रा हा सर्वधर्मीय बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून यावर्षी यात्रेवर कोरोनाचे आलेले निर्बंध विचारात घेता प्रशासनाने मोजके मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत यात्रा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु याबाबत आजरा तालुक्यातील सर्वधर्मिय बांधव मात्र नाराज दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी रामतीर्थ यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आता मुस्लिम बांधवांकडूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम  तहसीलदार, आजरा यांना आजऱ्यातील रामतीर्थ यात्रा भरण्यास परवानगी घ्यावी अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस व आजरा मुस्लिम समाज यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस नौशादभाई बुद्देखान, बशीर मुराद, निसार लाडजी,नईम तकीलदार, बबलू लतीफ,अबू बुद्देखान यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…..

 

दोन दिवसात तिघांवर पिसाळलेल्या रानटी कुत्र्याचा हल्ला. 

महागोंड येथील महिलेसह सोहाळे(ता.आजरा) येथील शेताकडे जाणारी महिला व तिला सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा रानटी कुत्र्याने(वाघाटी) चावा घेतल्याची घटना बुधवार सायंकाळी व गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. बुधवारी दुपारी महागोंड येथील नंदाताई अशोक कांबळे या शेळ्या चारण्यासाठी वानरांग नावाच्या शेतात गेल्या होत्या. यावेळी अचानक आलेल्या रानटी कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. दरम्यान आज सकाळी सोहाळे गावाच्या सीमेवर येवून अचानकपणे याच कुत्र्याने दोघांवर हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास सोहाळे येथील महिला सुप्रिया राजेंद्र देसाई (वय ३५) या शेताकडे जात होत्या. घरापासून काही अंतरावर जाताच गावाच्या सीमेवरच जंगलातून येवून त्यांच्यावर झाडीतून आलेल्या रानटी कुत्र्याने हल्ला केला. बाजूलाच घरात असणारे शामराव भाऊ देसाई (वय ६०) हे सौ. देसाई यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही हल्ला केला. या रानटी कुत्र्याच्या तावडीतून सौ. देसाई यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापुर्वीच सुप्रिया यांच्या पायाला व हाताला कुत्र्याने चावा घेतला. तसेच शामराव देसाई यांच्याही पायाला कुत्र्याने चावा घेतला.

दरम्यान घटनास्थळी आरडाओरड सुरु झाल्याने परिसरातील व रस्त्यावून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच एक दुचाकीवाला त्या ठिकाणाहून जात असताना त्याच्यावरही कुत्र्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी कुत्र्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. तातडीने जखमींना उपचाराकरिता गडहिंग्लज येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. हल्ला झाल्याचे समजताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरच्या घटनेची माहिती घेवून जखमींची विचारपूस केली. तिघांवर रानटी कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने सदर हल्ला हा रानटी कुत्र्याकडून (वाघाटी) झाल्याचे सांगण्यात आले.

रानटी कुत्रा की कोल्हा याबाबत संभ्रमावस्था…

दोन दिवसात झालेला हल्ला हा पिसाळलेल्या कोल्हा कडून झाला आहे असे नागरिकात बोलले जात आहे. वन विभागाने मात्र हा हल्ला रानटी  कुत्र्याकडून झाल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे कोल्हा की कुत्रा याबाबत संभ्रमावस्था आहे.

आजरा नगरपंचायतीचे ९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक जाहीर

आज गुरुवारी आजरा नगर पंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सन २०२१-२२करिता सुधारीत व सन २०२२-२३ चे संभाव्य जमा खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. सदर अंदाजपत्रकातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे:

सन २०२२-२३ चे अनुमानित अंदाजपत्रकात महसुली जमा रक्कम रूपये २,९७,१७,४८६/ इतकी अपेक्षीत असुन महसुली खर्च रक्कम रूपये २,९४,२७,५०० /- इतकी आहे व शिल्लक रक्कम रूपये २,८९,९८६/- इतकी राहणार आहे. तसेच सन २०२२-२३ चे भांडवली जमा रक्कम रूपये १३,६७,४८,७६० /- इतके अपेक्षीत असुन भांडवली खर्च रक्कम रूपये १४,५७,७२,2२६०/- इतकी अपेक्षीत आहे व शिल्लक रक्कम रूपये ९,७६,५००/- इतकी राहणार आहे. त्यामध्ये शिक्षण, कला व क्रीडा, दुर्बल घटक कल्याण निधी, दिव्यांग कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती अंतर्गत योजनांसाठी ५% रक्कम रु.४,७५,०००/- इतकी प्रत्येकी तरतूद करण्यात आलेल्या आहेत. तरी सदर वेळी नगरपंचायतीचे उत्पन्न वाढ व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर पत संस्थेची निवडणूक बिनविरोध

पेरणोली येथील श्री बळीराजा कुरकुंदेश्वर
पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक एस.व्ही.पाटील यांनी काम पाहीले. सन २०२२-२७ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. एकूण ११ जागेसाठी प्रत्येकी १० अर्ज आलेने निवडणूक बिनविरोध करणेत आली.

सर्वसाधारण गटामध्ये श्री. शिवाजी श्रीपतराव देसाई, सुभाष दिनकर देसाई, इनास डुमींग फर्नांडिस, पांडुरंग विठोबा गुरव, यशवंत रावसाहेब देसाई, यशवंत धोंडीबा पाटील यांची तर महीला राखीव मध्ये श्रीमती वंदना पांडुरंग चव्हाण, सौ. सुजाता विश्वास कोडक यांची तसेच इतर मागास गटातून श्री. चंद्रकांत लक्ष्मण गुरव घ व अनूसुचीत जाती- जमातीमधून (मागासवर्गीय) दिनकर विष्णु कांबळे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. श्रीपतराव बचाराम देसाई ,सुरेश कालेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

संबंधित पोस्ट

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!