

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक

चितळे (ता. आजरा) व परिसरामध्ये हत्ती कडून शेती पिकांचे नुकसान सुरूच आहे. सोमवारी रात्री रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सला जोरदार धडक देत ती फरफटत नेली. यामध्ये ट्रॅक्सचे मोठे नुकसान झाले आहे. भावेवाडी येथील नार्वेकर यांची सदर ट्रॅक्स असल्याचे समजते. हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक. चितळे (ता. आजरा) व परिसरामध्ये हत्ती कडून शेती पिकांचे नुकसान सुरूच आहे. सोमवारी रात्री रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सला जोरदार धडक देत ती फरफटत नेली. यामध्ये ट्रॅक्सचे मोठे नुकसान झाले आहे. भावेवाडी येथील नार्वेकर यांची सदर ट्रॅक्स असल्याचे समजते.
यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमानाही परवानगी देऊ नका… आजरेकरांची मागणी
. 
आजरा तालुक्यातील सर्वात मोठी सुप्रसिद्ध आणि वर्षानुवर्षे चालत आलेली राम तीर्थ यात्रा कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंद आहे. यावर्षीही या यात्रेस परवानगी मिळणार नाही असे सांगण्यात येत आले. रामतीर्थ येथील यात्रा फक्त धार्मिक विषय नसून यात्रेमुळे गेले दोन वर्षात कोरोणामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी , छोटे दुकानदार वाहतूकदार यांना आर्थिक घडी सावरण्यासाठी मदत होणार आहे. आपल्याजवळील याच सौंदत्ती देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. त्याचप्रमाणे राज्यात आणि आपल्या तालुक्यात ही विविध राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येच्या उपस्थित पार पडत आहेत. अशा परिस्थितीत रामतीर्थ यात्रेला ही मोठ्या उत्साहात पार पडण्यासाठी परवानगी मिळणेस कोणतीही अडचण नसावी. रामतीर्थ येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पाहिजे अशी तालुक्यातील सर्व लोकांच्यासह व्यापारी व छोटे दुकानदार यांचीही भावना आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आपण यात्रा पार पडण्यास परवानगीची कोणतीही अडचण येणार नाही.
वरील सर्व गोष्टींचा विचार करूनही रामतीर्थ यात्रा करण्यास प्रशासनाची परवानगी नसेल तर इथून पुढे कोणत्याही शासकीय अथवा राजकीय अथवा कुठल्याही मंत्र्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही कार्यक्रमास कोणत्याही प्रकारची परवानगी आपण देऊ नये आणि ति आपण देणार नाही असे मत संतोष बेलवाडे यांनी मांडले.
सदर निवेदन हे आजरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले. दिगंबर मिसाळ, विनायक चिटणीस, विराज बिल्ले,बाबुराव संकपाळ,सुभाष रामाणे, अभिषेक रोडगी हे उपस्थित होते.
आज शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
यात्रेच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज (बुधवार)प्रमुख कार्यकर्त्यांची सकाळी ११ वाजता रवळनाथ मंदिर आजरा येथे बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारी
हालेवाडी (ता. आजरा) येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी संचालक मंडळाने आपले वर्चस्व कायम ठेवले. चार संचालकांची बिनविरोध निवड झाली. निवडून आलेले संचालक मंडळ असे : रवींद्र गणपती खोराटे, सुनील मारुती पाटील, अशोक अंतू पाटील, सदाशिव दादू पाटील, विलास तातेराव पाटील, दीपक दत्तात्रेय येसादे. बिनविरोध संचालक असे : रेखा रामचंद्र कटाळे, शोभा विलास येजरे, रमेश भैरव कांबळे, अरुण गणपती पाथरवट,

निधन वार्ता .. बसवराज स्वामी

श्री बसवराज शिवानंद स्वामी, ऐनापूर (स्वामी गुरुजी) यांचे सोमवार दिनांक २१ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
आजरा साखर कारखान्यातील साखरेची खुल्या बाजारात विक्री सुरू
आजरा साखर कारखान्याने अनेक अडचणीतून मार्ग काढत जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखाना चालवला आहे. कारखान्याने आज आखेर चांगले ऊस गाळप करून पांढरीशुभ्र साखर उत्पादित केली आहे. कारखाना व्यवस्थापनाने सदर उत्पादित साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक त्याचप्रमाणे व्यापारी व किराणा दुकानदार यांना मिळावी व आपल्या लोकांना या साखर विक्रीचा आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने एक नवीन संकल्पना संचालक मंडळाने आखली आहे. आज भागात पिकणारा घनसाळ जसा विकला जातो तशी आज जरा साखरेची विक्री केली जाणार आहे. सदर साखरे करिता संबंधितांना एक क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त मागणी करणे आहे. यासाठी कारखाना गेट वरती साखर विक्रीचे नियोजन कारखान्यामार्फत करण्यात आले आहे कारखाना चा आजचा भाव एस.३० साखरेचा भाव रु. ३१९० अधिक ५ टक्के जीएसटी प्रति क्विंटल मोठी साखर एम. ३० चा भाव ३२७० अधिक ५ टक्के जी. एस. टी. याप्रमाणे ओपन दरात विक्री करण्यात येत आहे. याकरता इच्छुक सभासद व व्यापारी कंत्राटदार अथवा पर्यटक यांनी कारखाना विक्री विभागाशी संपर्क साधून साखर खरेदी करता येईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री सुनील शिंत्रे यांनी दिली व दर हे प्रत्येक आठवड्यात बदलत असतात त्यामुळे आपण कारखान्याची संपर्क साधून दराची खात्री करून साखरेची उचल करावी असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

मार्च महिन्यात राज्याला गुडन्यूज देणार : राजेश टोपे
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती बघून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध १०० टक्के हटवण्यात येतील. निर्बंध हटवावे अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मार्च महिन्यानंतर राज्यात १०० टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. टाक्स फोर्सच्या भूमिकेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध सरकार आता कमी करू शकतं, असं पत्र केंद्रानेच राज्याला पाठवलं असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात लसीकरण बऱ्यापैकी झालं असून याचा परिणाम निर्बंध शिथिल करण्यावर होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आणखी निर्बंध शिथिल केले जातील आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे, असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितलं.
आता राज्यात फार दिवस निर्बंध राहणार नसून सध्या काही प्रमाणात निर्बंध असलेले हॉटेल व्यवसाय, लग्न, थिएटर तसेच इतर निर्बंध १०० टक्के परिस्थिती बघून हटवण्यात येतील अशी माहितीही टोपे यांनी दिली.


