


आजऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा विराट जन आक्रोश मोर्चा

आजरा शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या जन आक्रोश मोर्चास प्रचंड प्रतिसाद मिळाला.तालुकाभरातील नागरिकांनी सदर मोर्चात सहभागी होऊन लव जिहादसह गोहत्येस आपला विरोध दर्शविला.

सकाळी नऊ वाजल्यापासून पंचायत समिती समोरील मार्गावर तालुकावासीयांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी केली होती. पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. लवजिहाद विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंदी करण्यात यावी यासह विविध मागण्या दर्शवणारे फलक मोर्चामध्ये घेऊन नागरिक सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झालेला जनसमुदाय विविध घोषणा देत येथील आजरा अर्बन बँकेसमोर आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करुन सभेस सुरुवात झाली.

यावेळी मोर्चास मिलिंद एकबोटे यांच्यासह राजश्री तिवारी व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मोर्चामध्ये युवा व महिला वर्गांची उपस्थिती प्रचंड होती.
मोर्चावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोर्चात सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चा कालावधीत सुमारे अडीच तास आजरा- आंबोली व आजरा – गडहिंग्लज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
…
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.



