आजरा छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक. –
दोन दिवसांची पोलीस कोठडी
आजरा येथील एका मुलीशी केलेल्या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्याना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पत्रकार बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. राजीव नवले यांनी माहिती दिली. ताहिर कुदरत माणगावकर (वय २४, रा.आजरा) व इम्रान मूनाफ जमादार (वय. २५ रा.आजरा) अशी संशयितांची नावे असुन त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या तपासकामी गडहिंग्लज उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील , सुनील हारुगडे, चंदगड, नेसरी,गडहिंग्लज, भुदरगड येथील अधिकारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.





