mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


झपाटलेले

‘पाणी ‘दूत

                    ज्योतिप्रसाद सावंत

       आजऱ्याची प्रचंड गळत्या लागलेली पाणीपुरवठा योजना, सध्या सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम व त्याकरिता उत्खनन झाल्याने या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे मुख्य शहरासह आजूबाजूला नव्याने वसलेल्या उपनगरांमध्ये पाण्याचा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा शहरवासीयांचा पाणी प्रश्न गंभीर करत असतानाच शहरातील गौरव देशपांडे, विश्वजीत सावंत व राजू विभुते या तीन तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत शहरातील प्रत्येक उंबऱ्याला पाणी पोहोचवायचे हा ध्यास घेऊन गेले तीन महिने सुरू ठेवलेले पाणीपुरवठ्याचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. शहरातील घराघरांमध्ये पाणी म्हटले की या त्रिमूर्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांना एखादा फोन गेल्याशिवाय आपणाला पाणी मिळणार नाही याची खात्री पटू लागली आहे.

     गेली दीड वर्षे आजरेकर पाणी प्रश्नाला सामोरे जात आहेत. महिला वर्गाचे तर मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास पाणी प्रश्न जबाबदार ठरत असतानाच गौरव, विश्वजीत व राजू यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्थानिक अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून वीस हजार लिटर पाण्याचा टँकर व त्याचबरोबर चार हजार लिटर पाण्याचे छोटे टँकर उपलब्ध करून घेतले आहेत. अत्यंत नियोजन पद्धतीने प्रत्येक गल्लीला , प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी ही मंडळी कोणतीही अपेक्षा न ठेवता अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

    यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जाणवत असताना व पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असताना या मंडळींचे योगदान निश्चितच आदर्शवत असेच म्हणावे लागेल.म्हणूनच आज त्यांना शहरवासीय ‘पाणीदूत ‘ म्हणून ओळखू लागले आहेत

नगरपंचायतीचे कर्मचारीही त्यांच्यावरच अवलंबून…

     वास्तविक शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. पण नगरपंचायत अलीकडे ती पूर्णपणे विसरून गेल्याचे दिसत असून नगरपंचायतीचे कर्मचारीही पाण्यासाठी आता या त्रिमूर्तीकडे संपर्क साधू लागले आहेत.

मोबाईल कंपन्यांनी खोदलेल्या चरित गवा अडकला
वनविभागाने केली मुक्तता

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा -आंबोली मार्गावर देवर्डे फाट्याच्या पुढील बाजूस सध्या एका मोबाईल कंपनीची केबल टाकण्याकरता रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. याकरिता खोदलेल्या चरीमध्ये गुरुवारी रात्री एक गवा अडकल्याने सदर गव्याला जीवदान देताना वनखात्याची चांगलीच दमछाक उडाली.

     रात्रीच्या वेळी चुकून यामध्ये गवा पडला. गव्याचा आकार आणि चरीचा आकार एकच असल्याने गव्याला तिथून बाहेर येणे अडचणीचे झाले. रात्रभर गवा तिथेच अडकून होता. सकाळी सदर बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी वनविभागाला या गोष्टीची कल्पना दिली. वनविभागाने मोठ्या कष्टाने जेसीबीच्या साह्याने आजूबाजूचा परिसर रिकामा करून गव्याला बाहेर काढले.

      मोबाईल कंपनीने तातडीने ही खुदाई बंद करावी अशी मागणी होत आहे.

वाटंगी फाट्यावर आग…

पाच एकराचा परिसर जळाला

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा नेसरी रस्त्यावर वाटंगी (ता. आजरा) येथील फाट्‌यावर लागलेल्या वणव्यात सुमारे पाच एकरातील मालकी क्षेत्रातील गवत जळाले. वणव्यात काजू व अन्य झाडे जळाली आहेत. वनपाल संजय निळकंठ, वनसेवक तानाजी खांडेकर, वन्यजीव पथकातील विजय मालव यांनी प्रसंगावधान दाखवत वणवा रोखला. झाडाच्या फांद्‌याच्या सहयाने वणवा भिजवण्याचा सुमारे तासभर प्रयत्न सुरू होता तासाभरानंतर वनवा विझवण्यास यश आले.


हात्तीवडे येथे वणवा निर्मूलन रॅली


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वन‌विभाग व सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्या सहभागाने ‘वणवा निर्मुलन ‘ मोहीमेच्या माध्यमातून जंगलाला आग लागू नये यासाठीचे लोकजागृतीचे उपक्रम गावोगावी सुरु आहेत. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे हात्तिवडे येथे विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली

       सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी.एम.पाटील, गावातील एस.के. हरेर, सरपंच सौ. शकुंतला सुतार यांच्या पुढाकाराने श्री छत्रपती विद्या मंदिर व श्री सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थानी गावामध्ये रॅली काढली.

       रॅलीमध्ये वन विभागाचे वनपाल श्री. बाळेश न्हावी, वनरक्षक. श्री. टी . एस. लटके, वनरक्षक प्रियांका पाटील, वनसेवक पुंडलिक शिंदे, नामदेव पाटील त्याचबरोबर हात्तिवडे गावचे,उपसरपंच पी.के .पाटील. संगिता पंडित, ग्रामपंचायत सदस्य, होनेवाडी गावच्या सरपंच श्रीमती. प्रियांका आजगेकर , मेंढोली- बोलकेवाडी गावचे सरपंच श्री. विलास जोशिलकर,. तातुआण्णा बटकडली, माजी उपअभियंता के.एच पाटील . राजेंद्र पाटील,हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय आमणगी, प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक संजय शिवणे, व हात्तिवडे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

पाण्यासाठी धावाधाव…
बस स्थानकासमोर मात्र तळे

       आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शहरवासीयांना एकीकडे पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून याच गळत्यांमुळे बस स्थानकासमोर शुक्रवारी रात्री तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews

आज-यात किरीट सोमय्या यांचा निषेध…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!