mrityunjaymahanews
अन्य

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

 

कारखान्याच्या बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण

अटकेत

 

धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’

आजरा कारखान्याच्या बेरिंग्ज चोरीप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश  चव्हाण(रा.पेद्रेवाडी,ता.आजरा),  सुरक्षा अधिकारी भरत गणपती तानवडे(रा.देवर्डे ता.आजरा) ,स्टोअर किपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे,सुरक्षा रक्षक मनोहर यशवंत हसबे(दोघे रा.चांदेवाडी ता.आजरा) या अधिकाऱ्यांसह स्क्रॅप ठेकेदार जैनूल समशाद खान (रा. इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक केली आहे. .

आजरा साखर कारखान्याच्या बहुचर्चित 6 बेरिंग चोरी प्रकरणावरील पडदा अखेर बाजूला करण्यात आजरा पोलिसांना यश आले असून या कारखान्याच्या स्क्रॅप ठेकेदाराशी हातमिळवणी करून कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने या बेरिंग्स कारखान्याबाहेर काढून त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट झाले आहे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती स.पो.नि. सुनील हारूगडे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

कारखाना बंद कालावधित (17.2.19 ते 26.7. 21) सदर प्रकार घडला असून कारखाना लवकर सुरू होणार नाही असा विचार करून कारखान्याच्या सुरक्षा विभागासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी स्क्रॅप ठेकेदाराला हाताशी धरून व कागदोपत्री खाडाखोड करून सदर प्रकार केला आहे. दोन वर्षानंतर कारखाना  स्वबळावर चालवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर सदर बेरिंग्ज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.कारखाना व्यवस्थापनाने या प्रकरणाबाबत चौकशी करण्याकरता आजरा पोलिसात फिर्याद देण्याबरोबरच स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती.कारखाना बंद कालावधीत सदर प्रकरण घडले असल्याने तत्कालीन 34 कर्मचाऱ्यांवर या चोरी प्रकरणचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता.हजर असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याने याबाबत कारखाना कर्मचारी, सभासद व तालुका वासीयांकडून कडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 60 जणांची चौकशी केली.

 

रक्षकच बनले संशयित….

या चोरी प्रकरणात प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या संशयितामध्ये कारखान्याच्या मुख्य अधिकाऱ्यांसह तत्कालीन कार्यकारी संचालक चव्हाण, सुरक्षा अधिकारी भरत तानवडे यांचाही समावेश आहे.त्यामुळे रक्षकच संशयीत निघाल्याने तालुक्‍यात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

फिर्यादीचाही आरोपीत समावेश

सदर चोरी प्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. परंतु पोलीस तपासात चव्हाण यांचाही आरोपींमध्ये समावेश झाल्याने सदर बाब कारखाना हिताच्या दृष्टीने धक्कादायक समजली जाते.

दोन दिवस पोलीस कोठडी

या प्रकरणातील सर्व संशयिताना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेद्रेवाडी येथे मारामारी..परस्पर विरोधी गुन्हे  दाखल

 

पेद्रेवाडी तालुका आजरा येथे शेतामध्ये काम करणाऱ्या भावजयीचा विनयभंग केल्याप्रकरणी संग्राम विष्णू चव्हाण (रा. पेद्रेवाडी ता. आजरा) यांच्याविरोधात भावजयीनेआजरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दिनांक आठ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पेद्रेवाडी येथील रांग नावाच्या शेतांमध्ये पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले या प्रकरणी भावजयिने दिलेल्या फिर्यादीवरून संग्राम विष्णू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

दरम्यान संग्राम चव्हाण यांनी प्रभाकर चव्हाण, सिंधुताई चव्हाण व निरंजन चव्हाण यांनी आपणाला खुरप्याने व लाथाबुक्कयांनी मारहाण केल्याची फिर्याद दिल्याने या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात ? स्क्रॅप ठेकेदारासह सहा जणांची पोलिसांकडून कसून चौकशी…….

 

आजरा साखर कारखान्याच्या चोरीस गेलेल्या बेरिंग्जचा तपास तातडीने करण्यात यावा असा तगादा सभासद व कर्मचारी यांच्याकडून सुरू झाल्यानंतर पोलीसांनी आपला तपास गतिमान केला असून याप्रकरणी कारखाना स्क्रॅप ठेकेदारास सहा जणांची गेल्या दोन दिवसात कसून चौकशी केली आहे.यातून बऱ्यापैकी सकारात्मक बाबी पुढे आल्या असून लवकरच बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा पर्दाफाश होणार असे दिसू लागले आहे. कारखाना बंद कालावधीत कारखानया मध्ये असणाऱ्या बेरिंग्ज चोरीला गेल्या होत्या लाखो रुपयांच्या बेरिंग्ज केल्या कशा? असा प्रश्न गेले काही दिवस उपस्थित केला जात होता. कारखाना निवडणूक तोंडावर असताना हा प्रश्न सर्वांनीच उचलून धरल्याने या बेरिंग्जच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.साखर कारखाना कामगार संघटनेने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या प्रकरणातील संशयितांना वरिष्ठांचे अभय असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. अखेर सर्वांनी या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी कोणाचाही मुलाहीजा न ठेवता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. येत्या दोन दिवसात बऱ्यापैकी हालचाली झाल्या असून यातून लवकरच या प्रकरणात गुंतलेल्या मंडळींचे चेहरे समोर येतील असे दिसू लागले आहे.

 

या प्रकरणांमध्ये कारखान्याचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचे पुढे येत असून कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

mrityunjay mahanews

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील… उपाध्यक्षपदी दौलती पाटील

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात चोरी… सोन्या चांदीचे दागिने लंपास

mrityunjay mahanews
error: Content is protected !!