mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

धनंजय महाडिकांनी केला महाविकास आघाडीच्या पवार यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ …पुतणीचा विनयभंग करुन मारहाण… चुलत्यासह चुलत भावावर गुन्हा..आजरा जनता बँकेच्या बालिंगा शाखेचे आज उद्घाटन…

भाजपाकडून ‘म विआ ‘चा  करेक्ट कार्यक्रम …

धनंजय महाडिक विजयी

राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांच्यापेक्षा तब्बल 8 मते जादा मिळवत घसघशीत विजय मिळवत मविआ चा करेक्ट कार्यक्रम केला.महाडिक यांना 41 मते पडली तर पवार यांना 33 मते पडली.

मतमोजणीनंतर महाविकास आघाडीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले.या विजयाने राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते रिचार्ज् झाले आहेत.तर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक पर्वाचा नव्याने उदय झाला आहे.

कोल्हापुरात पुन्हा ‘कमळ ‘फुलले 

कोल्हापूर जिल्ह्यात धनंजय महाडिक यांच्या विजयाने पुन्हा एकदा कमळ फुलले आहे.समोर असणाऱ्या जि.प. व पं. स. निवडणुकांच्या दृष्टीने महाविकास आघाडीला धोक्याचा इशारा समजला जातो.

 

आजरा जनता बँकेच्या बालिंगा शाखेचे आज उद्घाटन…


‘बहुजनांची बँक’ अशी ओळख असणार्‍या आजरा तालुक्यातील जनता सहकारी बँकेच्या बालिंगा शाखेचे उद्घाटन आज शनिवारी(दि.११) दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सदर कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य मधुकर जांभळे यांच्यासह गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.


यावेळी बोलताना अध्यक्ष देसाई म्हणाले, तालुक्यातील बहुजन समाजाच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या या बँकेच्या सोळा शाखा ठिकठिकाणी कार्यरत आहेत. सुमारे 29 हजार सभासद असणा -या या बँकेचे 11 कोटी 31 लाख रुपये इतके भागभांडवल असून राखीव निधी 23 कोटी 70 लाख इतका आहे. 31 मार्च 2022 अखेर बँकेजवळ 277 कोटी 69 लाखांच्या ठेवी तर 122 कोटी 91 लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. बँकेने सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी यांच्यासह गरजू मंडळींना 180 कोटी रुपये इतके कर्जवाटप केले आहे. 31 मार्च 2022 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 457 कोटी 99 लाख रुपये इतका झाला असून नेट एनपीए शून्य टक्के इतका आहे. बँकेचे स्वतःचे डाटा सेंटर व डी.आर.साइट असून तंत्रज्ञानयुक्त सेवा देण्याकरिता सुसज्ज असा आय.टी. विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाद्वारे विविध प्रकारच्या बँकिंग सेवा एकाच छताखाली सभासद व ठेवीदारांना पुरवल्या जातात.


बँकेकडे ई पेमेंट सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेअंतर्गत मोबाइल बँकिंग, आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी. आय.एम.पी.एस. ही रिसायकल एटीएम मशीन, पॉज, फास्टॅग, सी.टी.एस. चेक सुविधा मायक्रो एटीएम ,एस. एम. एस. बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरबांधणी, घर दुरुस्ती, घर खरेदी, प्लॉट खरेदी याकरिता अल्प दरात कर्जपुरवठा करण्याबरोबरच नोकरदार वर्गास पगार तारणावर बँक सुलभ कर्ज उपलब्ध करून देते. कार लोन, टू व्हीलर, वाहन तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोने तारण कर्ज, मालतारण कर्ज, सरकारी कर्जरोखे, एलआयसी व ठेव तारण कर्ज इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सभासदांचा विश्वास व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बँकेचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील शाखाधिकारी व्ही. वाय. वडर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

पुतणीचा विनयभंग करुन मारहाण… चुलत्यासह चुलत भावावर गुन्हा नोंद

पेरणोली (ता. आजरा) येथील वीस वर्षीय महाविद्यालयीन पुतणीचा विनयभंग कडून तिला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चुलता अशोक रघुनाथ सासुलकर व चुलत भाऊ अभिजित अशोक सासूलकर (दोघे रा.पेरणोली ता. आजरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पीडित तरुणी जनावरांना चारा घालण्यासाठी गोठ्यामध्ये गेली असता वरील दोघांनी तिचा विनयभंग करून तिला मारहाण आहे.. त्याचबरोबर तिला मारण्याची धमकीही दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

शेतकर्‍यांमध्ये धडकी भरवणारे कळप


कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात बळिराजा खरिपाच्या शेतीकामात व्यस्त असतांनाच गव्यासह हत्तिने धुमाकूळ घातल्याने शेत जमिनी यावर्षी कसायच्या का ? असा प्रश्न सतावू लागला आहे. तालूक्यामध्ये सर्वच ठिकाणी गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. सद्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर तालूक्यात नुकसान सुरु आहे. शेतकरी भात, भूईमुग, नाचणा इत्यादी पिकाच्या पूर्व तयारित गुंतला असताना दिवसाठवळ्या शेतामध्ये गवे हजेरी लावत आहेत. गव्याचे कळप निश्चितच धडकी भरवणारे आहेत. स्थानिक वनविभाग आणखी किती दिवस ठोस उपाय योजना करण्याऐवजी पिकांचे पचनामे करुन जुजबी नुकसान भरपाई देत रहाणार? असा प्रश्न तालूकावासीय उपस्थित करत आहेत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

संबंधितांकडून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ‘त्या’ प्रकरणावर पडदा…नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्हीक्टोरिया पुलावरील खुदाई बंद

mrityunjay mahanews

प्रभाग आठ मधून माझा विजय निश्चित…सुहेल काकतीकर

mrityunjay mahanews

विधानपरिषद निवडणुकांमुळे आज-याच्या राजकीय पटलावर सावळागोंधळ… नगरपंचायत कारभा-यांसमोर धर्मसंकट

mrityunjay mahanews

BIG BREAKING

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!