
चाफवडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

चाफवडे (ता.आजरा) येथे घरातील साहित्य स्थलांतर करताना चक्कर येवून पडल्याने रंजना अशोक धडाम (वय ४८) या धरणग्रस्त महिलेचा मृत्यू झाला.
उचंगी प्रकल्पात यंदा पाणीसाठा होणार असलेने प्रकल्पग्रस्तांचे घरातील साहित्याचे स्थलांतर सुरु आहे. अशोक धडाम व त्यांच्या पत्नी रंजना जुन्या घरातील पत्रे नवीन वसाहती मध्ये नेत होते.सकाळीही त्यांना चक्कर आली होती. सायंकाळी पत्रे ट्रॅक्टर मध्ये चढवताना पुन्हा चक्कर आली त्यात त्या ट्रॅक्टर वरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार बसला. उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात आणले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


विवाहितेच्या छळप्रकरणी खेडगे येथील पाच जणांविरोधात गुन्हा नोंद
खेडगे उज्ज्वला प्रकाश राणे (रा.मानखुर्द, मुंबई) यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु, सासरे, नणंद यांच्यावर आजरा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
उज्ज्वला या मुंबईत खासगी कंपनीत नोकरी करतात. सासरी त्या घरखर्चासाठी पैसे पाठवत होत्या.मात्र घरचे काम जमत नाही अशी गावात त्यांची संबंधितांनी बदनामी केली. उज्वला व त्यांच्या मुलाचा मानसिक व शारीरिक छळ केला.याशिवाय त्यांच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होते.या कारणावरुन उज्वला यांनी पती प्रकाश वसंत राणे,सासु रुक्मिणी वसंत राणे, सासरे वसंत तुकाराम राणे (तिघे रा खेडगे, ता. आजरा),नणंद शर्मिला किशोर मेगुलकर, नणंदेचे सासरे लक्ष्मण धोंडीबा मेगुलकर यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जनता बँकेच्या बालिंगा शाखेचा शनिवारी उदघाट्न समारंभ

आजरा आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या बालिंगा (ता.करवीर) शाखेच् उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 11 जून दुपारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सदर शाखा उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मधुकर जांभळे,गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.



