mrityunjaymahanews
कोल्हापूर

केबीसी मधून उत्तूर येथील तरुणास २५ लाख…? आजरा येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी १७.५० कोटींचा निधी

केबीसी कडून उत्तूरच्या तरुणास २५ लाख…?सावधान…. आपली होऊ शकते फसवणूक

संदीप देऊस्कर (उत्तूर प्रतिनिधी)

कौन बनेगा करोडपतीची अलीकडे क्रेझ प्रचंड वाढली आहे. घरबसल्या देखील या स्वरूपाच्या प्रश्न मालिकेवर आधारित अनेक स्पर्धा मोबाइलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आकर्षित करताना दिसतात. अतिशय साधे व सोपे प्रश्न सहजरित्या देता येणारी उत्तरे सोपी असल्यामुळे नकळतपणे पुढच्या प्रश्नांना दिला जाणारा प्रतिसाद व अचानकपणे तुम्ही २५ लाखाचे मानकरी झाल्याचा येणारा मॅसेज कदाचित तुम्हाला अडचणीत आणू शकतो. उत्तूर (ता.आजरा)येथील एका तरुणाला अशाच प्रश्नांचा मालिकेला सामोरे जावे लागले. झटपट उत्तर देण्याच्या नादात अनेक प्रश्नांना संबंधित तरुण सामोरा गेला आणि अचानक त्याने चक्क २५ लाख रुपये जिंकल्याचा मेसेज येऊन धडकला. मेसेज बरोबर पंचवीस लाख रुपयांच्या चेकचा फोटो हि पाठवला गेला.संबंधित तरुणाने ठराविक रक्कम भरल्यानंतर तो २५ लाख रुपये आपल्या बँक खात्यावर चेकच्या माध्यमातून वर्ग करू शकतो असे सांगण्यात आले २५ लाखाचे स्वप्न समोर दिसू लागल्यानंतर तरुणाने मेसेजला अनुसरून भरावयास सांगितलेले रक्कम देखील भरली. सदर रक्कम संबंधितांना पोहचल्याची खात्री झाल्यानंतर मात्र संबंधितांचा फोन ‘स्विच ऑफ’ झाला गेले दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने आपली शुद्ध फसवणूक झाली आहे हे लक्षात आले. परंतु झटपट मिळणाऱ्या २५ लाखाच्या मोहापायी काही रक्कम फुकट वाया घालवण्याची वेळ या तरुणावर आली आहे. अलीकडे मोबाईल वर असे मेसेज वारंवार येत असल्याने अनेक जण या प्रकारांना बळी पडत असल्याचे समजते.

आजरा येथे उपजिल्हा रुग्णालय बांधकामास१७ कोटी २५ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता : आम. आबिटकर

आजरा: विशेष  प्रतिनिधी

आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजरा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असणाऱ्या ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयावर प्रचंड ताण निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीमध्ये १७ कोटी २५ लक्ष रुपयांचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
कोल्हापूर-गोवा महामार्गावरील आजरा हे महत्वाचे व मध्यवर्ती शहर असून शहराची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच शहराच्या भोवती सुमारे ३० ते ४० गावे आहेत. सध्या या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना व परिसरातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून सदर ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणेची मागणी वारंवार होत होती. आजरा शहरात उपजिल्हा रुग्णालय सुरू झालेस येथील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. सचिव समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामुळे आजरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामास गती आली असून लवकरच रुग्णलयाच्या बांधकामास सुरवात करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे दिली आहे.

दिवटे फाउंडेशन तर्फे ‘ई श्रम ‘कार्ड वाटप

वडकशिवाले(ता. आजरा) येथील शांता पांडुरंग दिवटे प्रतिष्ठानच्यावतीने मोफत ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू सावंत होते.
फाउंडेशनचे संस्थापक सुनील दिवटे यांनी प्रास्तविकात ईश्रम कार्डचे महत्व सांगितले . यावेळी आॕन लाईन हयातीच्या दाखल्यांचेही वितरण शशिकांत लोखंडे,सागर सावंत, नितीन सावंत,विश्वनाथ काळे,विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शिवाजी पाटील,माणिक दिवटे,उत्तम पाटील उपस्थित होते. आभार सागर सावंत यांनी मानले.

साळगाव शाळेस ट्राॅली स्यिकर सेट भेट

विद्या मंदिर साळगाव शाळेचे माजी विद्यार्थी मा सुखदेव गुरव यांनी शैक्षणिक उठाव उपक्रमाअंतर्गत शाळेची गरज ओळखुन परिपाठ, विविध उपक्रमासाठी ट्राॅली स्पिकर , काॅडलेस माईक शाळेला भेट दिली. यावेळी प्रगतिशिल शेतकरी  पांडुरंग पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक सौ. मंजिरी यमगेकर यांनी शाळेने शैक्षणिक ऊठावातुन शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी समाज सहभागातुन करत असलेल्या प्रयत्नाला गावकर्‍यांचे मोठे पाठबळ मिळत आहे हे या मदतीतुन दिसुन येते असे स्पष्ट केेेेले. यावेळी संजय मोहिते , निवृत्ती मिटके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सत्यवान सोले यांनी केले.

इतर महत्त्वाचे…

आजरा साखर कारखान्याचा एक लाख पोती साखर उत्पादनाचा टप्पा पूर्ण.

 

धामणे  ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी तीन अर्ज दाखल.

 

आजरा आगाराचे एसटी वेळापत्रक अद्यापही सुरळीत नाही.

 

पावसाच्या विश्रांतीनंतर आजऱ्यात थंडीचे आगमन

 

स्थानिक बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-

…9637598866………….

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा.. बैलांसह तिघे झाले जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!