mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

जिल्हा बँक निवडणुकीत सुधीर देसाई यांचा विजय…. चराटी यांना धक्का

आजऱ्यात सुधिर देसाई ठरले ‘जायंट किलर’… विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी पराभूत

 

जिल्हा बँक निवडणूक निकाल.

आजरा तालुक्यातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करिता विकास सेवा संस्था गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर राजाराम देसाई यांनी अशोक अण्णा चराटी  यांचा पराभव करत तालुक्याचा राजकीय घडामोडीत बदलाचे संकेत दिले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर चराटी यांच्या दृष्टीने एकतर्फी असणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची होऊन अशोकअण्णा चराटी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव देसाई यांनी केल्याने ते ‘जायंट किलर ‘ ठरले आहेत. या निवडणुकीत सुधीर देसाई यांना ५७ इतकी  मते पडली. जिल्हा परिषद, विधानसभा व जिल्हा बँकेतील चराटी यांचा हा सलग तिसरा पराभव आहे. चराटी यांच्या या पराभवामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, तालुका खरेदी विक्री संघासह आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस चा वरचष्मा राहणार आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. सुधीर देसाई यांच्या निवडीचे वृत्त सकाळी ९.४५ वाजता आजरा तालुक्यात धडकताच देसाई समर्थकांनी आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.

 

मतदान फुटले ही केवळ चर्चाच..

 

मतदानावेळी देसाई यांनी ५५ ठरावधारक मतदारांचे एकत्र मतदान करून घेतले होते मतदानानंतर मात्र देसाई यांचे काही मतदान फूटले असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र निकालानंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे फुटीची केवळ चर्चाच होती हे देखील स्पष्ट झाले.

 

जयवंतराव शिंपी यांनाही राजकीय धक्का

 

जिल्हा बँक निवडणूकित अशोक अण्णा चराटी यांच्या पाठीशी जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी ताकद लावली होती. परंतु शिंपी यांना मानणाऱ्या काही ठराव धारकांना शिंपी यांची भूमिका मान्य न झाल्याने त्यांनी आपला कौल देसाई यांच्या बाजूने दिला. शिंपी व चराटी प्रचारासाठी एकत्र येऊनही चराटी यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने हा शिंपी गटाच्या दृष्टीने राजकीय धक्का समजला जातो.

 

मंत्री मुश्रीफ यांची खेळी यशस्वी…

 

गेल्या काही दिवसापासून जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील संबंध बरेच ताणले आहेत. अशोकअण्णा चराटी यांनी नामदार मुश्रीफ विरोधी विधाने वेळोवेळी करून आपल्या अडचणी वाढवून घेतल्या एकाच वेळी दोघांचा ‘राजकीय गेम’ करण्याची चालून आलेली संधी मंत्री मुश्रीफ यांनी साधली. शेवटच्या तीन दिवसात आजरा तालुक्यातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले. सुधीर देसाई यांना सर्वतोपरी सहकार्य करून एकाच वेळी शिंपी व चराटी यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात ते यशस्वी झाले.

केसरकर, तकीलदार व संभाजी पाटील यांची भूमिका ठरली निर्णायक…

 

निवडणूक अत्यंत अटीतटीची असल्यामुळे प्रत्येक ठराव धारकाला महत्त्व निर्माण झाले होते. सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेत आजरा साखर कारखान्याचे संचालक माजी सभापती विष्णुपंत केसरकर, अबुताहेर तकीलदार शिवसेनेचे संभाजी पाटील यांनी सुधीर देसाई यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेऊन देसाई यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

कोल्हापूर जिल्हा बँकेचा निकाल आज..निकालाकडे तालुकावासियांचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक निकाल आज जाहीर होत असून या निकालाकडे तालुकावासियांचे विशेष लक्ष लागून आहे.विशेषतः आजरा तालुक्यात विकास सेवा संस्था गटातून चुरशीने पार पडलेल्या विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी व राष्ट्रवादीचे सुधीर देसाई यांच्यातील लढतीच्या निकालाकडे आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागून आहे. आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आजरा तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातील लढतीचा निकाल हाती येईल असे मतमोजणी प्रक्रियेच्या नियोजनावरून स्पष्ट होत आहे. मतदानानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

राज्यातील २ लाख शेतकरी वीजबिलांतून मुक्त, सवलत मिळविण्यासाठी आता ‘इतके’ दिवस शिल्लक

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आतापर्यंत या योजनेत पश्‍चिम महाराष्ट्रातील ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी २ लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीजबिलांतून थकबाकीमुक्ती व स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात आतापर्यंत कृषिपंपाच्या ३५ हजार ६१९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तर चालू व थकीत वीजबिल भरण्यातून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३३ टक्के असा एकूण ७५५ कोटी ८८ लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. या निधीमधील वीज यंत्रणेच्या स्थानिक कामांसाठी आतापर्यंत २०२ कोटी ६७ लाख रुपये खर्चाचे ५७५७ कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ८१३ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण ९२८ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच ४३२ कोटी ३० लाख रुपयांची माफी तसेच निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलतीचे १२३९ कोटी असे एकूण १६१७ कोटी ३० लाख रुपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चात वाढ : मोदी सरकारचा निर्णय

आगामी पाच राज्यांच्या निवडणूका काही दिवसांवरच येऊ घातलेल्या असतानाच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार नव्या खर्चाच्या मर्यादेचे नोटिफिकेशन हे केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांसाठी या नव्या घोषणेचा मोठा फायदा होईल असे बोलले जाते आहे. याआधी लोकसभा निवडणूकीसाठी निवडणकू खर्चाची मर्यादा ही ७० लाख इतकी होती. ही मर्यादा आता ९५ लाख इतकी करण्यात आली आहे. तर विधानसभा निवडणूकांसाठी आधीची निवडणूक खर्चाची मर्यादा ही २८ लाख होती, या मर्यादेत वाढ करत ही मर्यादा ४० लाख इतकी करण्यात आली आहे. केंद्राने एका परिपत्रकाच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली आहे.*

लोकसभा

आधीची उत्पन्न मर्यादा ७० लाख

नवीन उत्पन्न मर्यादा ९० लाख

विधानसभा

आधाची उत्पन्न मर्यादा २८ लाख

नवीन उत्पन्न मर्यादा ४० लाख.

तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी कांबळे

होन्याळी गावचे गावकामगार पोलिस पाटील शिवाजी कांबळे यांची आजरा तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

निधन वार्ता….गोविंद भोईटे

सरंबळवाडी (ता. आजरा) येथील गोविंद आप्पाजी भोईटे (वय८१)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे विवाहित मुलगी असा परिवार आहे. येथील राजारामबापू पत संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन,सेवा संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. रणजित भोईटे व
आजरा कारखाना मिल फोरमन जनार्दन भोईटे यांचे ते वडील होत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बाप्पांच्या मुर्त्यांचे विसर्जन शांततेत व डॉल्बीमुक्त पद्धतीने करा : राजीव नवले….आजरा महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा…बारामतीवर झेंडा फडकवण्याची भाजपची तयारी, शरद पवारांच्या ‘दिल्ली ’काबीज करण्यासाठी हालचाली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!