आजऱ्यात एकाच दिवशी तीन मुस्लिम बांधवांचा मृत्यू
आजरा शहरामध्ये एकाच दिवशी रफिक समीरसाब मुल्ला, आदम मोहम्मद सोनेखान व अब्दुलवहाब आयुब बुड्डेखान या तीन मुस्लिम बांधवांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. या घटनेमुळे आजरा शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.
रफिक समीरसाब मुल्ला (रा .गांधीनगर) हे गांधीनगर परिसरात असणाऱ्या विहिरी मध्ये बुडून मृत्यू पावले .दरवाजकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आठळला.ते सेंट्रींग कामगार होते.

आदम सोनेखान (रा. नाईक गल्ली, आजरा, वय 72) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात , दोन मुले, मुलगी, पत्नी , यांच्यासह मोठा परिवार आहे.

अब्दुलवहाब आयुब बुड्डेखान (वय 70) हे गेले कांही दिवस कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व तीन मुली नातवंडे असा परिवार आहे. येथील सायकल व्यावसायिक जहीर बुड्डेखान यांचे ते वडील होत. एकाच दिवशी तीन मुस्लिम बांधवांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्यामुळे आजरा परिसरात मुस्लिम बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.










