mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

आजऱ्यात जिल्हा बँकेचा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता….

आजरा तालुक्यात धक्कादायक निकालाची शक्यता : दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा

जिल्हा बँक निवडणूक रणांगण.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके करीता आजरा तालुक्यातून विकास सेवा संस्था गटाकरीता चुरशीने मतदान झाले असून राष्ट्रवादीचे सुधिर देसाई व विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांनी मतदानानंतर विजयाचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीवरून धक्कादायक निकालाचे संकेत मिळत आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी ठेवण्यात आलेल्या मतदारांना आणण्याकरिता दोन्ही गटाकडून अलिशान गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या गटातील संपूर्ण १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उर्दू हायस्कूल येथे पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेवेळी सुधिर देसाई, अशोकअण्णा चराटी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्यासह दोन्ही उमेदवारांचे समर्थक व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चा फुटीची… हमी एकजुटीची…

अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत एक एक मताला महत्त्व प्राप्त झाले होते दोन्ही उमेदवाराकडून शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. मतदानानंतर दोन्ही आघाड्यांचे काही मतदान फुटल्याची चर्चा होताना दिसत होती यामध्ये नेतेमंडळींचा ही अपवाद नव्हता.  मतदार   माात्र  एकजूूटीने मतदान झाल्याची हमी देताना दिसत होते. या मतदानाची मतमोजणी उद्या (शुक्रवारी) होणार आहे.

आज -यात पार्किंगबाबत विशेष बैठक संपन्न

आजऱ्यातील पार्किंग संदर्भात होणाऱ्या कारवाई संबंधि भूमिपुत्र युवा फाउंडेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार विकास अहीर       यांच्या पुढाकाराने  नगरपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आणि भूमिपुत्र युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये नगरपंचायत प्रशासनाने पार्किंग संबंधी विस्तृत असा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. हे करत असताना आजऱ्याचा ग्रामीण भागातून येणारे लोक आणि बाहेरून येणारे पर्यटक यांचा प्रामुख्याने विचार करून हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच जागो जागी पार्किंग संदर्भात माहिती देणारे सुस्पष्ट असे फलक लावणे, पार्कींगसाठी नव्याने जागा उपलब्ध करून देणे यासंदर्भात सूचना झाल्या तसेच या गोष्टींचा अम्मल होईपर्यंत संपुर्ण हायवे ( साळगाव फाटा ते आंबोली रोड) वरील स अशी कारवाई करत असताना नेहमी पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्याकडून सर्वसामान्य लोकांना दिला जाणारा त्रास व अपमानकारक वागणूक ताबडतोब थांबावी व अशी वागणूक देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली. यासंबंधितांच्या तक्रारी वरून अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. तसेच कारवाई दरम्यान वाहनांचे नुकसान झाल्यास संबंधित प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई देण्यावर एकमत झाले..

यावेळी  तहसिलदार श्री. विकास अहिर, पोलिस  सहा. पोलिस निरीक्षक श्री. सुनील हारुगडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. अजिंक्य पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागचे श्री. आर . एन .सावंत तसेच भूमिपुत्र युवा फाउंडेशनचे रणजित सरदेसाई, मंगेश पोतनिस, शैलेश मुळीक, युवराज जाधव, संकेत सावंत, संतोष पाटील, संतोष चौगुले, महेश निर्मळे, सर्जेराव दळवी, महादेव दिवेकर, विश्वास गवळी, अमोल हळवणकर, प्रमोद चौगुले, प्रकाश संकपाळ, अरविंद मिसाळ, शेखर पाटील, विष्णु कुंभार, रुपेश निर्मळे तसेच भारतीय जनता पक्षाचे आजरा तालुका अध्यक्ष श्री. सुधीर परळकर उपस्थीत होते.

कुरकुंदेश्वर यात्रेवर यावर्षीही कोरोनाचे सावट

आजरा तालुक्यातील पेरणोली येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात भरणाऱ्या श्री.कुरकुंदेश्वर यात्रेवर यावर्षीही कोरोनाचे सावट आहे.शनिवार दिनांक ८ व रविवार दिनांक ९ रोजी सदर यात्रा होत असून कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार असल्याने यात्रेच्या उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. संयोजकांनी ही यात्रा साध्या पद्धतीने धार्मिक विधी करून शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

आजरा शहरात दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंग चे नियोजन जाहीर

आजरा नगरपंचायतीकडून शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार दुचाकी पार्किंग करीता श्री. राम मंदिर समोरील परिसर, भाजी मंडई परिसर, छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूची रिकामी जागा, आजरा अर्बन बँकेपासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम विषम पद्धतीने पार्किंग करण्याची नियोजन करण्यात आले आहे. चारचाकी वाहना करीता छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागील जागा, जनावरांचा बाजार परिसर, पंचायत समिती कार्यालयासमोरील रिकामी जागा, भुदरगड पतसंस्थेशेजारील रिकामी जागा व श्री. लक्ष्मी पारकट्टा पटांगण (कुंभार गल्ली) येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त इतरत्र पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!