
चिरा वहातूक करणारा डंपर आंबोली घाटात कोसळला.

कोकणातून , आज-याच्या दिशेने चिरा वाहतूक करणारा डंपर आंबोली घाटात १०० फूट दरीत खोल दरीत कोसळला असून या अपघातात चालक शब्बीर शेख (रा. माणगाव ता. कुडाळ ) किरकोळ जखमी झाले आहेत. डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

…….
चंद्रशेखर फडणीस शासनाच्या प्रो रेटा परीगणना समितीवर

आण्णा -भाऊ आजरा सूत गिरणीचे सल्लागार चंद्रशेखर फडणीस यांची राज्य शासनाच्या चस्त्रोद्योग विभागामार्फत स्थापन करणेत आलेल्या प्रो रेटा परीगणना समितीवर सदस्य म्हणून नुकतीच निवड करणेत आली याबददल सूत गिरणीचे कार्यस्थळावर अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी यांचे हस्ते व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करणेत आला. संपूर्ण राज्यभरातील सूत गिरण्यांमधून या महत्वपुर्ण समितीवर फक्त दोन सदस्य निवडणेत आले आहेत त्यामध्ये फडणीस हे आहेत .
यानिमित्त आजरा सूतगिरणीयानिमित्त आजरा सूतगिरणी च्या वतीने फडणीस यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सूत गिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे म्हणाले, फडणीस यांना यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील समितीवर देखील जबाबदारी सोपविली होती व आता राज्यस्तरावरील या समितीवर निवड करणेत आली आहे व यामूळे आजरा तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. सूत गिरणीस अत्यावश्यक कच्चा माल कापूस ज्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत व यामूळे सूत गिरण्या चालविणे कठीण बनले आहे व या परीस्थितीमध्ये फडणीस या समितीचे माध्यमातून वस्त्रोद्योगा समोरील अडचणी शासनाकडे मांडून संपूर्ण वस्त्रोद्योगासाठी आवश्यकते सहकार्य मिळवून देतीलअसा विश्वास आहे.
याप्रसंगी फडणीस म्हणाले कै. आण्णा व भाऊ यांनी माझेवर विश्वास टाकून या संस्थेची जबाबदारी सोपविली होती. संस्थेचे मार्गदर्शक संचालक अशोक आण्णा चराटी यांचे धडाडीचे नेतृत्व धाडसी निर्णय घेणेची क्षमता, व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांचे कल्पक मार्गदर्शन सर्व संचालक यांनी टाकलेला विश्वास यामुळे संस्था प्रगतीपथावर नेता आली यापुढेही आवश्यकता भासेल तेंव्हा मार्गदर्शन करत राहणार आहे.
तसेच याप्रसंगी आजरा तालुका मेडीकल असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झालेबददल डॉ. संदीप देशपांडे यांचा तसेच हसन शेख यांची सूत गिरणीवर तज्ञ संचालक पदी निवड झालेबददल सत्कार करणेत आला.
सूत गिरणीचे संचालक शंकर टोपले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सूत गिरणीचे संचालक जयसिंग देसाई नारायण मुरूकटे राजू पोतनीस, जी. एम. पाटील शशिकांत सावंत मालुताई शेवाळे यांचेसह जनरल मॅनेजर अमोघ वाघ चीफ अकौंटंट विष्णू पोवार तसेच अधिकारी सचिन सटाले, राजेंद्र धुमाळ आर.ए.पाटील शामली वाघ उपस्थित होत्या.

………..
उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत यांचा आंतरराज्य पुरस्काराने सन्मान

नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन , बेळगाव व हेल्थ अॅन्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी तर्फे , आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत यांना आंतरराज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तिमध्ये सौ. सावंत यांचा समावेश आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देणेत आला.पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी श्री. अमरसिंह पाटील मा. खासदार, बेळगाव,श्रीमती रत्नमाला सावनूर मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार श्री. महेश मेघण्णावर,जिल्हा पोलिस प्रमुख, एस.पी. (एसीबी) गुलबर्गा, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

……………
आगामी निवडणूकीत देवर्डे विभागाला संधी : मुकुंदराव देसाई
माद्याळ येथे सुधीर देसाई, सचिन शेळके यांचा सत्कार

आजरा तालूक्यातील आगामी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकीत देवर्डे विभागाला संधी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले.
देवर्डेपैकी माद्याळ ता आजरा येथील शंभु महादेव महिला दूध संस्थेच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई व पोलिस सहाय्यक निरिक्षक सचिन शेळके यांच्या सत्कारप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
देसाई म्हणाले, माद्याळ व परिसरातील कार्यकर्ते तालूकास्तरातील राजकारणापासून वंचित आहेत. याची आगामी निवडणूकीत दखल घेतली जाईल. सचिन शेळके यांच्या प्रमाणे तरूणांनी जिद्द ठेवली पाहिजे. सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्यम मुदतीचे कर्ज सुरु करणार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेत काम करणार आहे.यावेळी शेळके, जनता बँकेचे उपाध्यक्ष जोतिबा चाळके,कृष्णा सावंत, गणपती जाधव, विलास बोलके यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास बोलके,महादेव शेळके, तुकाराम बोलके,यशवंत बोलके,शिवाजी बोलके,दिपक जाधव,निवृत्ती देवेकर,एम डी जाधव,आनंदा बोलके ,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
………
आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट

आजरा महाविद्यालयाच्या अभिषेक देवकाते, कोहीमा नागालँड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय 20 वर्षा खालील क्रॉस कंट्री स्पर्धा मध्ये महाराष्ट्र राज्य प्राप्त केले.त्याची निवड रामराजे कॉलेज, जत येथे झालेल्या राज्य अजिंक्य निवड चाचणी स्पर्धा मधून झाली होती.
सिद्धांत पुजारी मूडबिद्री, मंगलोर येथे अखिल भारतीय क्रॉस कंट्री स्पर्धामध्ये शिवाजी विद्यापीठ संघात समाविष्ट होत कास्य पदक पटकावले व खेलो इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धा साठी निवड झाली.
महाविद्यालयची आंतरराष्ट्रीय तलवारबाज खेळाडू ज्योती अरुण सुतार हिला गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय फेनसिंग ( तलवारबाजी) स्पर्धा मध्ये फॉइल क्रीडा प्रकार मध्ये महाराष्ट्र महिला संघातून खेळत कास्य पदक प्राप्त केले.
तिची निवड औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्य संघ निवड चाचणी मधून महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती.



