


शिंपी व चराटी यांची मिठी किती दिवस टिकणार..? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल.

जिल्हा परिषदेमध्ये जयवंतराव शिंपी यांना उपाध्यक्ष मी केले. जिल्हा बँकेकरीता ते स्वतः इच्छुक होते. ज्याच्याजवळ ठरावधारक मतदार जादा त्याला उमेदवारी असा साधा निकष आपल्याकडून लावण्यात आला. सुधिर देसाई व मुकुंदराव देसाई यांनी जादा ठराव धारक दाखवून उमेदवारी मिळवली. दरम्यानच्या काळात शिंपी यांनी आपला फोन घेण्याचे सौजन्यही दाखवले नाही.अशोक चराटी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला चितपट करून सुधीर देसाई यांनी वादळात दिवा लावण्याचे काम केले. शिंपी यांनी अचानकपणे चराटी यांना मिठी मारून नेमके काय साध्य केले ? ही मिठी किती दिवस टिकणार ? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई यांच्या वेळवट्टी येथे आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
वेळवट्टी येथे नूतन संचालक देसाई यांच्यासह त्यांना मतदान करणाऱ्या ठराव धारकांचा सत्कार करण्यात आला. आमदार राजेश पाटील म्हणाले, जिल्हा बँकेला वैभव प्राप्त करून देण्यात ना. हसन मुश्रीफ यांचा मोठा वाटा आहे येत्या पाच वर्ष करत आहे बँकेचे हित डोळ्यासमोर ठेवून ना. मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी त्याला आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबवण्याचा आपला मानस आहे नामदार मुश्रीफ यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त योजना तालुक्यात राबवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे संचालक सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन बामणे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी मुकुंदराव देसाई,एम.के. देसाई, विष्णुपंत केसरकर, अनिरुद्ध रेडेकर, भैय्या माने,सौ.रचना होलम,राजू होलम, महादेव पाटील( धामणेकर), अबूताहेर तकिलदार, वसंत धुरे, रणजित देसाई, अनिकेत कवळेकर, अल्बर्ट डिसोजा, शिवाजी नांदवडेकर, अनिल फडके, मधुकर येल्गार, सरपंच सौ. मनीषा देसाई, प्रकाश पोवार, जयवंत प्रभू, आनंदा कुंभार,जयवंत मिटके, शिवाजी कुंभार यांच्यासह मान्यवर व वेळवट्टी ग्रामस्थ उपस्थित होते.



हारुर येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू
हारुर (ता. आजरा)येथील महादेव दत्तू सावंत( वय ५५) यांचा विहिरीतील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. महादेव हे १४ जानेवारी रोजी कामावर जातो म्हणून घरातून निघून गेले होते ते न परतल्याने त्यांचा शोध कुटुंबीयांकडून सुरू होता दरम्यान रविवारी त्यांचा मृतदेह बाबू खंडू कुपटे यांचे शेतातील विहिरीमध्ये आढळून आला. याबाबतची वर्दी तानाजी दत्तू सावंत यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास आजरा पोलीस स्टेशनचे पी. जी. गुरव करीत आहेत.



थोडक्यात महत्वाचे…
⚡मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये घट..कोरोना बाधितांची संख्या दहा हजाराच्या खाली
⚡ज्या ठिकाणी रूग्ण नाहीत तेथील शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु
⚡ ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीरच
⚡कोरोनाचा ठरविणा-या गुणसुत्रांचा शोध
⚡अर्थसंकल्पात कौशल्य विकासावर विशेष लक्ष
⚡थंडीचा कडाका वाढला





