


आज-यात आज(रविवारी) माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव ….
आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित.

आजरा येथील माजी सैनिक, विधवा वीरपत्नी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या , रौप्य महोत्सवानिमित्त आज विशेष कार्यक्रम अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा येथे आज रविवार दि. 18 रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पतसंसथेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
आजरा- भुदरगड- राधानगरी चे विद्यमान आमदार प्रकाशराव आबिटकरसो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास कर्नल विलासराव सुळकुडे, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सहाय्यक वेलफेअर अधिकारी अशोक पोवार, तहसीलदार विकास आहिरे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, गटविकास अधिकारी खोराटे, नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी ,मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक निबंधक एस.व्ही. पाटील,डॉ. श्रद्धानंद ठाकूर, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. अशोक फर्नांडिस, संभाजीराव सावंत यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विलास गुरव, संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील, संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा मार्फत रक्तदान शिबिर उत्साहात

शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा युवा मोर्चा व संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर* येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर पर्यंत सर्व देशभरात भा ज पा कार्यकर्ते सेवा पंधरवडा साजरा करीत आहेत. सदर जन सेवा पंधरवडा मध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छ मोहीम, वृक्षारोपण, मोदी @२० चित्रफीत प्रदर्शन, खादी, व्होकल फॉर लोकल, पुस्तक प्रदर्शन, दिव्यांग वयोश्री कार्ड अशा जनसेवा पोहचविण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आज येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरास भा ज पा कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराची सुरवात भा ज पा नेते आणि शिवस्मारक कमिटी चे अध्यक्ष बापू टोपले यांच्या कडून छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी ,भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष मा. अशोक चराटी ,अरुण देसाई, चेअरमन जितेंद्र टोपले , भा ज पा अध्यक्ष सुधीर कुंभार, नगरसेवक आनंदा कुंभार, धनाजी पारपोलकर , नगरसेविका शुभदा जोशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संतोष बेलवाडे, सरपंच जी.एम. पाटील, संचालक दीपक सातोस्कर, नाथ देसाई, अतिषकुमर देसाई, सुरेश कुंभार, पप्पू कुलकर्णी, संजय जोशी, किरण केसरकर, जयसिंग शेंडरकर, वैभव नार्वेकर, राजेंद्र कालेकर, उदय सरदेसाई, अजित हारेर, बाबू संकपाळ, अभिजित इंजल, अभिजित केसरकर, विलास भादवनकर, हरिश्चंद्र भोगण, सदा सुतार, मधू कुंभार, सुनील पाटील, धोंडीबा कवलिकट्टी इ. सह. कार्यकर्ते उपस्थित होते.

उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत यांचा राजीनामा
सौ. अस्मिता जाधव यांना मिळणार संधी
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी संजय सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी यांच्याकडे सुपूर्त केला आहे. सत्तारूढ आघाडीत या पूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार सदर राजीनामा देण्यात आल्याचे समजते. सौ. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर नूतन उपनगराध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झल्या आहेत. उर्वरित आठ महिन्याकरीता सौ.अस्मिता समीर जाधव यांना संधी देण्यात येणार् असल्याचे समजते.
आठवडाभरात यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात येईल.


उत्तूर परिसरात लंपी लसीकरणाचा वेग वाढला
पेंढारवाडी येथे दोन जनावरांना लंम्पी ची लागण झाल्याचे , निष्पन्न झाल्यानंतर उत्तूर् पंचक्रोशी मध्ये पशुधन विभागाकडून लसीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. या विभागातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लंबीची नर्सया विभागातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लंपीची लस तातडीने द्यावी असे आवाहन पशुधन विभागाने केले आहे.

आजरा महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यात सामंजस्य करार

आजरा महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यात सामंजस्य करा करण्यात आला.
समाजात व विद्यार्थीच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन प्रचार- प्रसार करणे. विद्यार्थ्यांना चिकित्सा संशोधन वृत्ती स्वतंत्र विचार करण्याची क्षमता अभिव्यक्ती कौशल्ये विकसीत करणे. अंधश्रद्धा मुक्त करून वैज्ञानिक दृष्टीकोन देणे.स्त्री पुरुष समांनता, लिंग समभाव. प्लास्टिक बंदी, इंधन वाचवा.फटाके, ध्वनी प्रदुषण मुक्त असे पर्यावरणपूरक सण-उत्सव या बाबत जाणीव जागृती निर्माण करणे. शारीरिक मानसिक आरोग्य समजून घेणे. व्यसन मुक्ती प्रबोधन करून, व्यसनामुळे होणार्या आजारांबाबत जागृती निर्माण करणे. या दृष्टीकोनातून अभ्यास संशोधन प्रसार करणे. विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याबाबतचा सदर करार आहे.
आजरा महाविद्यालय प्राचार्य डाॅ. ए. एन. साद्ळे व समन्वयक प्रा.मिना मंगळूरकर, अंनिस आजरा तालूका कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे,प्रधान सचिव संजय घाटगे यांच्या उपस्थित हा करार करणेत आला.

⏰⏰राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; कोणाला मिळालं स्थान?
राष्ट्रवादीने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये काही जुन्या पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आलाय. तर काही नवी चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड झाली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीनुसार, राजीव झा, हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती आली आहे. याशिवाय प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय पदाधिकारी 1. शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष 2. प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष 3. सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस 4. योगानंद शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस 5. के. के. शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस 6. पीपी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस 7. नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस 8. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस 9. वाय. पी. त्रिवेदी – राष्ट्रीय कोषाध्यक्ष 10. एस. आर. कोहली – स्थायी सचिव

🏹🏹आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्री गणपतीत गरागरा फिरले पण…

♦️शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतील पुढील टप्प्याची सुरुवात रत्नागिरीतून केली. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळं फिरले. आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळी फिरायचे असेल. मात्र, त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत आदित्य यांनी हल्लाबोल केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आताच्या उद्योगमंत्र्यांना या प्रकल्पाबाबत काहीच माहित नव्हते. या प्रकल्पासाठी मविआ सरकारकडून प्रयत्न सुरू होते असेही आदित्य यांनी म्हटले. जूनमध्ये वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने तळेगावची जागा पाहिली. राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती. त्याशिवाय, एक लाख रोजगार येणार होते. वेदांता-फॉक्सकॉन तळेगावात येणार होते. गद्दारांनी सरकार पाडल्यानंतरही एमआयडीसीने प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, या सरकारने काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांना याबाबत विचारल्यावर माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी म्हटले. मी 32 वर्षाचा तरूण असून या प्रकल्पाबाबत माहिती देतो. मात्र, तुम्ही काहीच माहिती देऊ शकत नाही का, असा सवाल आदित्य यांनी केला.
रायगडमध्ये येऊ घातलेला बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यामुळे 80 हजार तरुणांचा रोजगार गेला असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बल्क ड्र्ग्ज प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला. त्याचीही त्यांनाही माहिती नव्हती हे धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रान्सहार्बर लिंकला भेट दिली. मात्र, त्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी फाइल पाहण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत काही माहिती नाही असेही आदित्य यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखान्यांची योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही योजना मुंबई महापालिकेच्या निधीवर सुरू करण्यात आल्याची आठवणही आदित्य यांनी करून दिली.
(Source:chat.whatsapp.com. )



