mrityunjaymahanews
महाराष्ट्र

जिल्हा बँक निवडणुकीतील चुरस वाढली निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप…

कौन बनेगा संचालक… ? मतदारांचे वजन वाढले.

ज्योतिप्रसाद सावंत

जिल्हा बँक निवडणुकीचे  धुमशान आजरा  तालुक्यात जोरदार सुरू असून विकास सेवा संस्था गटाची आजरा तालुक्यातील होणारी निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची बनल्याने ठरावधारक मतदारांचे वजन वाढले आहे. या निवडणुकीतील घडामोडी पाहता  निवडणुकीला  विधानसभा निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसू लागले आहे. विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक मध्यंतरी कार्यक्रमात खंड पडल्याने अडचणीची बनली आहे. याउलट चराटी यांच्या विरोधात असणारे आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई यांनी लावलेल्या जोडण्या पहाता चराटी यांच्या दृष्टीने एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाल्यामुळे मतदारांचा भाव चांगलाच वधारत चालला आहे. प्राधान्याने नोकर-यांसह आर्थिक मागण्याही आता ठरावधारक मतदारांकडून होऊ लागल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाला महिन्याभराचा कालावधी अद्यापही बाकी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही उमेदवारांच्या मतदारांना कडेकोट बंदोबस्तात सहलीवर पाठवण्यात आले आहे. त्यातूनही मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्या बाजूने वळवण्याकरी ता दोन्हीही आघाड्यांचे प्रमुख समर्थक परस्परविरोधी मतदारांशी संपर्क साधण्याकरिता प्रयत्नशील आहेत. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक, आजरा साखर कारखाना व अन्य प्रमुख सहकारी संस्थांमध्ये संधी देण्याची आश्वासनेही ठरावधारकांना दिली जात आहेत. निवडणूक लांबल्याने मतदारांची हट्ट पुरवताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. विधानसभेच्या निवडणुकीची खर्चाची गणिते जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत दिसू लागल्याने उमेदवार या निवडणुकीतून नेमके काय साध्य करणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य तालुकावासिय उपस्थित करू लागले आहेत.  निवडणुकीकरता ५ जानेवारी रोजी मतदान होणार असून ७ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

आजरा तालुक्यात दोन जागांसाठी

पोटनिवडणूक

 

आजरा तालुक्यात चव्हाणवाडी व खोराटवाडी या ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. दहा जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाले होते.  माघारीच्या दिवशी आठ जणांनी माघार घेतली. त्यामूळे दहा अर्ज शिल्लक राहीले. यामध्ये चव्हाणवाडी व खोराटवाडी येथे प्रत्येकी एका जागेसाठी दोन अर्ज शिल्लक राहील्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. हाजगोळी बुll , लाकूडवाडी, एरंडोळ, गजरगाव, धामणे येथे प्रत्येकी एक अर्ज शिल्लक राहील्याने येथील निवडणूक बिनविरोध झाली आहे. लाटगाव व देऊळवाडी येथे अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे येथील जागा रिक्त राहील्या आहेत. कासारकांडगाव येथे निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. दोन जागांसाठी (ता. २१) मतदान होणार आहे.

ग्रामीण भागात एसटी लवकरात लवकर चालू करा.. मनसेचे तहसीलदारांना निवेदन

सध्या चालू असलेल्या एसटी कर्मचारी संपाबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. गेले महिनाभर एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून एसटी नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शाळा चालू असूनही घरीच बसावे लागत आहे. सध्या चालू असलेल्या चार बसगाड्या पुरेशा नसून ग्रामीण भागात एसटी बसेस लवकरात लवकर चालू कराव्यात. तहसीलदारांनी आपल्या अधिकारात शासनाशी पत्रव्यवहार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आजरा तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल व तालुकाध्यक्ष अनिल निउंगरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना यांच्या वतीने आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदारांची भेट घेऊन स्वतंत्र निवेदनही देण्यात आले असून या निवेदनावर ओंकार माडभगत, वैष्णव दळवी, अश्विन राणे, शुभम पाटील, विलास येसणे, राहुल पेंडसे, आदींच्या सह्या आहेत.

.

‘आजरा’च्या कामगार संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध

अध्यक्षपदी प्रकाश सरदेसाई  


आजरा कारखान्याच्या कामगार संघटनेची नुकतीच कार्यकारणी बिनविरोध निवड केली गेली आहे. ती खालील प्रमाणे आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणेत आला. कामगार आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून कामगारांच्या आणि कारखान्याच्या हितासाठी काम करणार असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई यांनी सांगितले. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- श्री. विजय बाजीराव देसाई (कार्याध्यक्ष), श्री. रामचंद्र गणपती सावंत (उपाध्यक्ष),श्री. रविंद्र सखाराम पाटील (उपाध्यक्ष),
श्री. बाळु दत्तु दळवी जनरल (सेक्रेटरी),
श्री. गणपती पांडुरंग पेडणेकर (सह सेक्रेटरी),
श्री. सिलेमान बाबालाल पठाण (खजिनदार) व कार्यकारणी सदस्य पुढीलप्रमाणे-
श्री. नज्जबुल्ला सुलतान वाडीकर ,श्री. पांडुरंग गणपती जाधव,श्री. शंकर भिमा कुंभार,श्री. अरुण निवृत्ती डोंगरे,श्री. प्रमोद शंकर होडगे,श्री.अशोक महादेव गुरव,श्री. प्रभाकर जनार्दन चव्हाण,श्री. सुरेश लक्ष्मण ढोकरेश्री. दशरथ गणपती कांबळे
श्री. श्रीपती कृष्णा पोवार

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथे जुगार अड्ड्यावर छापा… पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती.. अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!