
लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात:
सूर्यकांत नार्वेकर

लढण्याचा वारसा आपल्या कुटुंबाला असून यापूर्वी माझे वडील श्री. नामदेवराव नार्वेकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेते मंडळींशी लढत दिली आहे. लढण्याचा वारसा असाच पुढे ठेवण्यासाठी प्रभाग १४ च्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपण नगरपंचायत निवडणूकीला अपक्ष म्हणून सामोरे जात आहोत असे प्रतिपादन सूर्यकांत नार्वेकर यांनी केले.
माझे वडील आजरा तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नामदेव नार्वेकर यांनी निस्वार्थीपणे पक्षाचे काम केले, स्व.रविंद्र आपटे यांचे खंदे समर्थक अशी ओळख असणाऱ्या नार्वेकर यांनी कधीही स्वार्थाचे राजकारण केले नाही. चांगल्या संस्कारात आपली जडणघडण झाली असून नगरपंचायतींच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभा आहे. आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराचा विकास व्हावा ही स्वच्छ भावना व विकासाची स्वप्ने घेऊन आपले नशीब निवडणुकीत अजमावत आहे.
व्यक्तिगत फायदा तोटा न पाहता स्व. रवींद्र आपटे यांचे आदेश मानत काम करणाऱ्या व त्यांचे राजकीय संस्कार झालेल्या नार्वेकर यांचा मुलगा म्हणून घेताना आपणाला खूप अभिमान वाटतो.
समाजसेवेची आवड, नवीन करण्याची वृत्ती, उच्चशिक्षित यामुळे एक ओळख निर्माण केली आहे. आपणाला या निवडणुकीत संधी मिळाल्यास निश्चितच प्रभागाचा कायापालट करू. विकास कसा असतो हे प्रभागातील मतदारांना दाखवून देऊ.
‘रोड रोलर’ या चिन्हाच्या माध्यमातून आपण निवडणूक केला सामोरे जात आहोत.
शहराचा विकास साधावयाचा असेल तर सभागृहात अभ्यासू,नवीन टेक्नॉलॉजीची माहिती असणारा, वेळ देवून काम करणारा, जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नगरसेवक हवा आहे.हे सर्व गुण आपल्याकडे आहेत.
प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या प्रश्नांची निर्गत मी नक्की लावेन.मला प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमचा आशिर्वाद मिळावा ही अपेक्षा!
सरिता गावडे यांची प्रचारात आघाडी…

आजारा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग 17 मधून नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जात असणाऱ्या सौ. सरिता अमोल गावडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यात त्या आघाडीवर दिसत आहेत.
विस्थापितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गावडे यांच्या कुटुंबीयांचे सामाजिक योगदान मोठे असल्याने त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी संवाद दौऱ्यावेळी सांगितले. कोणतीही खोटी आश्वासने न देता जे शक्य आहे ते आपण निश्चितच करू किंवा निवडणुकीपुरती आश्वासने देऊन शहर बकाल करणाऱ्या मंडळींना मतदार निश्चितच धडा शिकवतील असे यावेळी सौ. सरिता गावडे यांनी स्पष्ट केले.
गावडे यांच्या या प्रचार फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे प्रभाकर कोरवी यांनी सांगितले.
यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत, अभिषेक शिंपी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग चार मध्ये रशीद पठाण विजयाच्या वाटेवर : अशोकअण्णा चराटी

प्रभाग चार मधून ताराराणी विकास आघाडीचे उमेदवार आजरा साखर कारखान्याचे संचालक रशीद पठाण हे विजयाच्या वाटेवर असून आता त्यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन आघाडी प्रमुख अशोक चराटी यांनी केले.
प्रभाग चार मधील पठाण यांच्या प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते.
राजकारणातले अनुभव संपन्न व्यक्तिमत्व म्हणून पठाण यांच्याकडे पाहिले जाते. समाजकारण व राजकारणातील अत्यंत अनुभवी म्हणून पठाण हे ओळखले जातात. मुस्लिम समाजातील जेष्ठ व सर्वमान्य नेतृत्व म्हणून आपण त्यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागातील मतदारांचा भरघोस प्रतिसाद पाहता पठाण यांचा विजय निश्चित आहे असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी प्रभागातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
प्रभाग आठ मध्ये अपक्ष उमेदवार सुहेल काकतीकर यांचे प्रचाराचे धुमशान




