दि. ११ सप्टेबर २०२४



ह.भ.प.हणमंत केरकर महाराज यांचे अपघाती निधन

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दर्डेवाडी ता. आजरा येथील ह. भ. प. हणमंत नारायण केरकर महाराज यांचे दुचाकी अपघातात निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
केरकर महाराज हे उदय दशरथ केरकर यांच्यासोबत दुचाकीवरून नेसरी येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना नेसरी ते किणे दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या उतारावर मागून चार चाकीने दुचाकीला जोरात धडक दिल्याने ते दुचाकीवरून बाजूला फेकले गेले व गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना प्रथम नेसरी व त्यानंतर गडहिंग्लज येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांचे निधन झाले. तर उदय केरकर (वय २७ वर्षे) हे जखमी झाले आहेत. महाराजांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ- भावजय असा परिवार आहे.
दर्डेवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी नऊ वाजता दर्डेवाडी येथे आहे.


‘आजरा’च्या शासन नियुक्त संचालक पदी दिगंबर देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त संचालक पदी शिरसंगी येथील दिगंबर यशवंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देसाई यांनी यापूर्वी आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदासह साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या पाठीशी ते राहिले होते.


विसर्जनासाठी जायचे कसे…?
बाप्पाच्या निरोपाला खड्ड्यांचे विघ्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील उपनगरे व नवीन वसाहतींसह गल्लीबोळामध्ये ठीक- ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांना डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातून वाहनांची येजा होत असल्याने सर्वत्र चिखल व पाण्याचे साम्राज्य आहे. उद्या घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन असल्याने यातून गणेश मूर्ती नेताना बरीच कसरत भाविकांना करावी लागणार आहे.
आज दिवसभरात नगरपंचायत याबाबत काय कार्यवाही करते याकडे शहरवाशीयांचे लक्ष लागून आहे.

देवर्डे सरपंचांच्या कारभाराची चौकशी करा…
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे ता. आजारा येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील रस्ते, दळणवळण आधी सुविधांची जबाबदारी ग्रामपंचायतची असताना ग्रामपंचायत हद्दीतील कित्येक वर्षापासून असणारे रस्ते बंद करून अतिक्रमण करणाऱ्यांना सरपंच व त्याचे पती राजकीय पाठबळ देत असून रस्ता खुला करून देण्याबरोबरच सरपंचांच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी अशी मागणी देवर्डे येथील संतोष शिवगंड, संजय तेजम, अनंत सुतार, प्रकाश तेजम, पांडुरंग शिवगंड यांच्यासह पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरपंच व सरपंच महोदयांचे पती ग्रामपंचायत ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दरडावून बेकायदेशीररित्या कारभार करत आहेत. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष येळणे यांनी या कारभाराला विरोध केल्याने त्यांची बदली होण्यासाठी व आपल्या अखत्यारीतील ग्रामसेवक मिळावा यासाठी ग्रामस्थांची सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याचीही चौकशी व्हावी असेही निवेदनात म्हटले आहे.


निधन वार्ता
सुरेश मराठे

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पारपोलकर कॉलनी, आजरा येथील सुरेश बाबू मराठे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


गणेश दर्शन
१.लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा

अध्यक्ष : निलेश निपाणी
उपाध्यक्ष : शिवकुमार गुंजाटी
सचिव : अभिषेक रोडगी, अनुप चराटी खजिनदार : अनिकेत शिंत्रे
२.संघर्ष कला क्रीडा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सरोळी

अध्यक्ष : प्रकाश देसाई उपाध्यक्ष : शिवाजी नलवडे
सचिव : रवी नलवडे खजिनदार :बाबासाहेब पाटील
मूर्ती देणगीदार : रवींद्र नलवडे व शिवाजी नलवडे
३.नवयुग तरुण मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मसोली

अध्यक्ष : तानाजी शिवाजी तेजम
उपाध्यक्ष : सागर मसनू कसलकर
सचिव : संजय शंकर तेजम
खजिनदार : प्रवीण जाणबा गुरव
मूर्तीकार : सुनील कुंभार वेळवट्टी
मूर्ती देणगीदार :कु स्वरूप सागर तेजम
४.ब्ल्यू स्टार युवा मंच बुरुडे प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुरुडे

अध्यक्ष-अनिल आप्पा कांबळे. उपाध्यक्ष-नंदकुमार अर्जुन कांबळे. उपाध्यक्ष-बाबुराव उत्तम कांबळे. सचिव-संतोष सदाशिव कांबळे. खजिनदार -शरद अशोक कांबळे



