
आज-याजवळील अपघातामध्ये मोटारसायकलस्वार ठार

आजरा: प्रतिनिधी
येथील पारेवाडी तिठ्या नजिक झालेल्या विचित्र अपघातमध्ये दत्तात्रय बाळू गोवेकर (वय ४२) रा. हाळोली (ता. आजरा) हा मोटारसायकस्वार ठार झाला. आज सायंकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. आजरा पोलीसात याची नोंद केली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, दत्तात्रय गोवेकर हा गवंडी काम करतात. ते आज-याहून हाळोलीच्या दिशेन जात होते. त्यांची दुचाकी पारेवाडी फाट्यावर आली असता समोरून जाणाऱ्या मारुती ईको (एम एच ०९ बीएच २८१६) या गाडीला जोराची धडक बसली. या गाडीला धडकल्यावर ते दुचाकीसह समोरून आजऱ्याच्या दिशेने काजू फॅक्टरीमधील कामगारांना घेवून येणाऱ्या क्रुजर (एम एच ०८. डब्ल्यू १७८२) या गाडीला पुन्हा जोराने जवून धडकले. यामध्ये ते दुचाकीवरून उडून बाजूला पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जागीच त्यांच्या मृत्यू झाला.
गोवेकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.


