
फॉरेस्ट डिपार्टमेंट ‘ गो बॅक ‘…
वन विभागाला धनगर बांधवांनी रोखले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चितळे पैकी धनगरवाडा या ठिकाणी गट नंबर ११६ या ठिकाणी गेली पिढ्यान पिढ्या जमीन कसून खात आहेत.काल सकाळी स्नेहा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षकांच्या वनरक्षक, मजूर यांच्या नेतृत्वाखाली आज खेतोबा या ठिकाणी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने आलेल्या वन कर्मचाऱ्यांना चितळे पैकी धनगरवाडा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने येऊन विरोध दर्शवला व त्यांना रोखले.
त्यामुळे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना रिकामी हाताने मागे फिरावे लागले.
अनेक पिढ्यांपासून धनगर वाड्यावर धनगर बांधवांची कुटुंबे उपजीविकेचे साधन म्हणून खेतोबा या ठिकाणी शेती करून जगत आलेली आहेत.
उपजिविकेचे साधन म्हणून अनेक वर्षापासून भात, नाचणा ही पीक घेतली जात आहेत. पारंपारिक वननिवासी वनहक्क कायदा अधिनियम २००८ या नियमानुसार प्रांताधिकारी, गारगोटी यांच्याकडे दिनांक १० जून रोजी चितळे येथील व्यक्तिगत दावे दाखल करण्यात आलेले आहेत.
असे असताना वनविभाग तिथे असणारे सर्वे क्षेत्राची खाचरे उध्वस्त करण्याचे काम करत असल्याचा आरोप करत याला विरोध म्हणून धनगर बांधवांकडून मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष मुलाबाळांसह जाऊन काम थांबवण्यात आलेले आहे.
तालुकावासीयांना टोल मुक्त करा…
अन्याय निवारण समितीची आम. प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर- बांदा महामार्गावर आजरा तालुक्यातील मसोलीनजीक टोल वसुली नाका उभारण्यात येत असून तालुक्याच्या नागरिकांच्या दृष्टीने हा अन्याय आहे.
आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोल पासून शंभर टक्के मुक्ती मिळावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष विजय थोरवत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचा ठाकरे गटही आक्रमक
संपूर्ण आजरा तालुक्याला टोलमुक्त करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.टोलप्रश्नी प्रसंगी अंगावर गुन्हे घेण्याची तयारी शिवसैनिकांनी ठेवली असून कोणत्याही परिस्थितीत टोलमुक्तीसाठी शिवसेना आग्रही राहणार असल्याची भूमिका शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी स्पष्ट केली आहे.
किणे येथे व्यवसायिकांना जिल्हा बँकेतर्फे स्टँडि क्यूआर कोड वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, शाखा किणे च्या माध्यमातून व्यावसायिक संस्था व सभासदांना स्टॅण्डी क्युआर कोड वितरण किणे शाखेचे शाखाधिकारी विजय कांबळे यांच्या हस्ते, गंगाई शाॅपी आजरा व अमरदिप किराणा दुकान किणे याना वितरित करण्यात आले. दुकानात झालेल्या व्यवसाय मध्ये रोख व्यवहार किंवा सुट्या पैशाची अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन सुलभ व्यवहार होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकने प्रत्येक शाखेच्या माध्यमातून स्टॅण्डी म्हणजे क्युआर कोड देण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी श्रीमती सपना नारळकर, केरकरआण्णा, चंद्रकांत घाटगे, कृष्णा तुपट, अविनाश पाटील ,संजय पाटील उपस्थित होते
पंडित दीनदयाळ विद्यालयात स्वागतोत्सव कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिला दिवशी शासनाच्या आदेशानुसार नवागतांचे स्वागत करण्यात आले.
शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात ,औक्षण करून, विद्येची देवता श्री सरस्वती देवीला वंदन करून, प्रत्येक विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन हसतमुखाने विद्यालयातील शिक्षक, संस्थाचालक यांनी स्वागत केले यामध्ये संस्थेचे सचिव श्री. मलिकुमार बुरुड, सुधीर कुंभार, नाथ देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते मुलांना पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर मुलांना अल्पोपहार देण्यात आला.



