
आज आजरा येथील रामतीर्थ यात्रा

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी आजरा येथील रामतीर्थ यात्रा आज दिनांक रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, आरोग्य, पोलीस प्रशासन व एस.टी. महामंडळाने जय्यत तयारी केली आहे.
काल शनिवार दिनांक १८ रोजी महाशिवरात्री निमित्त अनेक भाविकांनी रामतीर्थ येथील महादेव मंदिरासह परिसराला भेट देऊन दर्शन घेतले.
रामतीर्थ परिसरातील मंदिरांचे रंगरंगोटी व स्वच्छतेला नगरपंचायतीने प्राधान्य दिले आहे. मिठाई,शीतपेये, खेळण्यांसह विविध प्रकारची दुकानेही या परिसरात थाटण्यात आली आहेत. दुपारी आजरा येथून पालखी निघणार असून ती तीन वाजण्याचा सुमारास रामतीर्थ येथे पोहचेल.
आज दिवसभर एस.टी. महामंडळाकडून विशेष बस फेऱ्या आजरा बसस्थानकातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री आठ वाजेपर्यंत इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. सुमारे सव्वा किलोमीटर अंतरावर चार चाकी व दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शक्यतो वाहनधारकांनी यात्रास्थळी वाहने आणण्याऐवजी एस.टी. महामंडळाच्या गाड्यांना प्राधान्य द्यावे असेही सुचवण्यात आले आहे.
आज-याच्या नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, तहसीलदार विकास अहिर,सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यात्रा व्यवस्थित पार पाडण्याकरता विशेष प्रयत्न सुरू आहेत.
हुल्लडबाजांवर विशेष लक्ष
पोलीस प्रशासनाने यात्रा स्थळी हुल्लडबाजी होणार नाही याकरिता विशेष लक्ष ठेवले आहे. हुल्लडबाजी करणा-यांची गय केली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

छायावृत्त:-

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल प्रशालेचे कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त खडूने फळ्यावर रेखाटलेले महाराजांचे छायाचित्र…




