
२० जूनला आजरा येथे खा.शाहू छत्रपतींचा आभार दौरा…
जनतेशी साधणार संवाद…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार छत्रपती शाहू महाराज व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ सतेज पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी गुरुवार दि. २० जून रोजी आजरा येथे येणार आहेत. यावेळी ते आजरा तालुक्यतील जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत.
या भेटीच्या तयारीसाठी आजरा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची नियोजनाची बैठक झाली. तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी ३.०० वाजता गंगामाई वाचनालयात उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी केले आहे.
यावेळी मुकुंददादा देसाई, उमेश आपटे, संपत देसाई, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, नौशाद बुड्ढेखान, रशिद पठाण, संजयभाऊ सावंत, महेश करबंळी, रणजीत देसाई, विक्रम देसाई , संकेत सावंत , कृष्णा सावंत ,
विलास पाटील, विश्र्वास जाधव, इकबाल शेख उपस्थित होते.

शाळा गजबजल्या…
ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उन्हाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने शाळा गजबजून गेल्या.
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्या मंदिर वाटंगी येथे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, माजी केंद्रप्रमुख शिवाजी गिलबिले, चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापक सुनील कामत, भिकले , उत्तम कुंभार शाळा समितीचे सदस्य सदस्य आणि पालक यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
मलिग्रे येथे शालेय साहित्य वाटप

महात्मा जोतीबा फुले विद्या मंदिर, मलिग्रे या प्राथमिक शाळेच्या नवीन विद्यार्थीचे स्वागत व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
मलिग्रे हायस्कूलच्या सन २००-०९ च्या दहावी च्या वर्ग मित्रांनी बालवाडी ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्र्यांचे वाटप केले. यावेळी किशोर जाधव यांनी शाळा टिकाव्यात व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी साहित्य वाटपाचे नियोजन, वर्गमित्रांनी केलेचे सांगितले.
मुख्याध्यापिका सौ.मनिषा सुतार यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या उपक्रमाला सहकार्य केले बद्दल आभार मानले.
यावेळी माजी सरपंच समिर पारदे, शाळा समिती अध्यक्ष शिवाजी भगुत्रे, बाळू कांबळे, डाॅ.सुदाम हारेर, विश्वास बुगडे, याच्या सह पालक उपस्थित होते. आभार कल्पना कोरवी यानी मानले.

पारपोलकर बंधूंचे यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील सुशांत श्रीकांत पारपोलकर यांची सहाय्यक संशोधन अधिकारी वर्ग दोन व प्रा. तेजस गणपती पारपोलकर सांख्यिकी अधिकारी, नियोजन विभाग दिल्ली व सांख्यिकी अन्वेशक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन या पदासाठी निवड झाली आहे.
पारपोलकर बंधूंच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




